" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

मराठी वाचन कसे शिकवावे.

ज्ञानरचनावाद

*मराठी वाचन कसे शिकवावे?*

(एकही मुल अप्रगत राहणार नाही याची गँरंटी)
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

*ज्ञानरचनावाद पध्दतीने वाचन ढोबळमानाने एकूण सात टप्यात शिकविले जाते-* 
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

1. वाचन पुर्वतयारी 
2. अक्षर ओळख 
3. स्वरचिन्हे ओळख 
4. जोड शब्द ओळख 
5. वाक्यवाचन 
6. परिच्छेद वाचन 
7. आकलन 

*अक्षर ओळख*  

या टप्प्यात खालील प्रकारे अक्षर परिचय व त्याचे दृढीकरण करुन द्यावे. 

1📗.चित्राआधारे शब्दाचे अंदाजे वाचन करणे. 

2📗. चित्राशिवाय शब्दाचे सरावाने वाचन करणे. 
[कमीत कमी ८ दिवस सराव आवश्यक, विविध पध्दतींचा अवलंब] 

3📗. परिचीत शब्दाचे सावकाशपणे वाचन करणे.
[४ दिवसात सरावाने वाचन] 

4📗. त्या शब्दातील प्रत्येक अक्षर सुटे करुन वाचणे. 
[पुढील ५-६ दिवस] 

5📗. अक्षराच्या आकारातील साम्यभेद ओळखून मुळ अक्षराचे अंदाजाने वाचन करणे. 
[किमान ८ दिवस सराव आवश्यक] 

*यासाठी खालील उपक्रम राबविता येतील.* 

वर्गातील प्रत्येक मुलाला स्वतःचे नाव खुप आवडते व ते ७-८ दिवसात त्याच्या नाम पट्यावरील प्रत्येक अक्षर वेगवेगळे करुन वाचते. ते त्याला हाताळण्यास व वाचण्यास प्रोत्साहन द्या. नंतर त्याच्या जिवलग मित्रांच्या नामपट्यातील अक्षरे सुटे वाचण्याचा सराव व नंतर इतर विद्यार्थ्यांच्या नामपट्या वाचनाचा सराव घेणे. अवघड वाटणारे नाव टाळावे. 

यानंतर वर्गातील वस्तूंच्या नाम पट्ट्यांचा सराव घ्या. वस्तूंना अडकावलेल्या शब्दातील सोप्या अक्षराचे वाचन करण्यास प्रोत्साहीत करा. 

यानंतर परिचीत व आवडणारे शब्दपट्या हाताळण्यास देऊन त्यातील अक्षराचे वाचन घ्यावे. 

आता प्रत्येक मुळाक्षराची अक्षरकार्डांची २-३ संच बनवावीत.व ती हाताळण्यास आणि वाचावयास द्यावीत. एकाच मुळाक्षरांच्या दोन अक्षर कार्डे शोधणे. त्यांचे वाचन करणे. 

विद्यार्थ्यांच्या ज्ञानविश्वातील सहज सोपे भासणारेच शब्द घ्यावेत.याटप्प्यात आपणास फक्त मुळाअक्षरओळख शिकवायची असल्याने त्याला अवघड वाटणारा शब्द नको. शब्दातील अक्षर वाचन करताना त्याच्या स्वरचिन्ह वाचनाकडे लक्ष देऊ नये. फक्त मुळाक्षर वाचनच घ्यावे. 
उदा- *“शाळा”* शब्द वाचताना पहिल्या अक्षरसास ‘श’ म्हटले की ‘शा’ हे पाहू नका. या टप्यात हे दोन्ही बरोबरच. 

6📗. अक्षराचे दृढीकरण. 
वरील प्रत्येक टप्यात आपापल्या कल्पकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे विविध उपक्रम घेता येतात. 

*उदा- [खालील उदाहरणे याप्रमाणे अनेक उपक्रम घेता येतात.]* 

अक्षर कार्डाच्या मदतीने अक्षर कार्ड व शब्दाशी जुळवणे. 
उदा- “शाळा” या शब्दकार्डाशी जुळविण्यासाठी ‘श’ व ‘ळ’ अक्षरकार्डे शोधून ती त्याखाली मांडणे व वाचन करणे. या ठिकाणी प्रथम  ‘श’ ‘ळ’ अक्षरकार्डास ‘शाळा’ असेच वाचण्याची शक्यता असते. त्यास येथे थांबवू नका. चूक सांगू नका. काही दिवसाच्या सरावानंतर इतरांचे अनुकरण करत तो आपोआप त्यास ‘श’ व ‘ळ’ म्हणू लागेल. असे नाही घडल्यास त्यास नंतर ‘श’ व ‘ळ’ असे वाचण्यास प्रोत्साहित करा. 

चित्रकार्डाशी अक्षरकार्डाच्या जोड्या लावणे. 
यात एक अक्षरकार्ड देऊन त्याचे वाचन करणे. 
-अक्षरापासून सुरु होणारे चित्रकार्ड शोधणे. 
-अक्षराने शेवट होणारे चित्रकार्डे शोधून काढणे. 
-अक्षर मध्ये असणारे चित्रकार्डे शोधणे. 

अक्षराचे मोठे आकार वर्गात काढा. व त्यावर विविध वस्तू [चिंचोके, दगड, फुले,इ.] ठेऊन आकार पुर्ण करणे. 

शिक्षकाने हवेत अक्षराचे आकार काढणे व विद्यार्थ्यांनी ओळखणे, नंतर स्वतः अक्षर सांगणे व विद्यार्थ्यांना त्याचे हवेतील आकार काढण्यास सांगणे. दोन विद्यार्थी किंवा गटामध्येही असा सराव घेता येतो. 

पाटीवर/जमीनीवर माती/वाळू पसरणे व त्यावरील अक्षराचा आकार ओळखणे. नंतर तसे आकार बोटाने काढण्याचा सराव घेणे. 

अक्षरकार्डे जोडून शब्द [फक्त स्वरचिन्ह विरहीत शब्द] बनविणे व त्याचे वाचन. यात विद्यार्थी प्रथम अर्थहीन शब्द बनवतील व वाचतील, हळूहळू अर्थपुर्ण शब्द बनविण्यास प्रोत्साहन देणे. 

असे अनेक चित्र-शब्द खेळ/उपक्रम घेता येतात. शब्द मर्यादेमुळे सर्व येथे मांडणे शक्य नाही. 

वरील टप्यांचा उपयोग करताना घाई करु नये. एखाद्या टप्यात घाई झाल्यास विद्यार्थी त्यापुढील टप्यात गोंधळतात. याठिकाणी एकही अपरिचित शब्द नको. 

पुरेसा सराव व विविध पध्दतीचा अवलंब जेणेकरुन मुले कंटाळणार नाहीत व उत्स्फुर्तपणे सहभाग नोंदवतील. 

7📗. हळूहळू शब्दवाचनासोबत वाक्यवाचन सुरु करावे. 
उदा- ‘मगर’ ही शब्दपट्टी आहे. शब्दाचे वाचन करुन नंतर त्या शब्दापासून वाक्य बनविण्याचा सराव घेणे. 
-ही मगर आहे. 
-मगर मोठी आहे. इ. 

8📗. प्रत्यक्ष शब्दवाचनाचा सराव सुरु झाल्यानंतर सुरुवातीस परिचीत व नंतर अपरिचित शब्दवाचनाकडे जावे. [मुर्ताकडून अमुर्ताकडे] 

*_9📗. *‘अक्षरओळख’_* *_या टप्प्यात किमान २५-३० अक्षरांचे वाचन मुले करु लागली की शिल्लक_* *_अक्षरांचा सराव घ्यावा.परंतु त्याच अक्षरांच्या ओळखीमध्येच न_* *_अडकता आपला पुढील टप्पा “स्वरचिन्ह ओळख” सुरु करावा. हळूहळू_* *_स्वरचिन्हासह वाचनात मुले इतर अक्षरे वाचन करण्यास शिकतात_*.

No comments:

Post a Comment

मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची नोकरीच्या सेवेतील 28 वर्षे पूर्ण निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कंपास पेटी वाटप

*मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची नोकरीच्या सेवेतील 28 वर्षे पूर्ण  निमित्ताने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य कंपास पेटी वाटप* ---------...