Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, September 21, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण कोविशील्ड दुसरा डोस लस मोहीम आयोजित


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण कोविशील्ड दुसरा डोस लस मोहीम आयोजित*

                   *जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 20/9/2021 रोजी  कोविड लसीकरण मोहीम आयोजित करून कोविशील्ड  ची दुसरी लस वय वर्ष 18 ते पुढील वर्षीपर्यंत तिवटग्याळ गावातील तरुण व जेष्ठांना असे एकूण 150 जणांना कोविशील्ड लस देण्यात आली. तद्नंतर दुपार वेळी उपस्थित सर्व कर्मचारी यांना पोलीस पाटील श्री   धनराज पाटील यांनी स्व खर्चाने सर्वाना  भोजनाची व्यवस्था केली. यावेळी डॉ. अंंतेश्वर हावण्णा, आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती येलमटे एस. पी., श्री खटके परमेश्वर,श्रीमती तवर सिस्टर श्रीमती अंजली लोहारकर व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी  मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, गावचे पोलीस पाटील   धनराज पाटील, सरपंच उज्ज्वला ताई नरहरे,ग्राम पंचायत सदस्य श्री कैलास तवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे आदी जण यांनी  उपस्थित होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना social distance, sanitizer,, Handwash  व mask याचा अनिवार्य वापर करावा असे सांगितले व गावातील 18 वर्षांवरील व त्यापेक्षा जास्त जेष्ठांना लस घेण्यासाठी जन जाग्रती केली. आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे यांनी गावात घरोघरी जाऊन पात्र लोकांना बोलावून दुसरी घेस प्रवृत्त केले. कोविड - 19 नियमांचे पालन करुन उपस्थित सर्व पात्र नागरीकांनी कोविशील्ड लस घेतली. उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*












No comments:

Post a Comment