*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे यांची भेट*
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज 8/9/2021 रोजी सकाळी 10.30 वाजता अचानक शाळेस भेट दिली. भेटी दरम्यान तोंडार केंद्राचे साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे यांनी कोविड कॅप्टन गटातील विद्यार्थाशी सूसंवाद साधला. दैनंदिन आॅफलाईन व आॅनलाईन दिलेल्या अभ्यासाविषयी चर्चा केली. विद्यार्थ्यांना अनेक प्रश्न विचारले व बोलते केले. शाळा बंद आहे पण नियमित अभ्यास तसेच स्वाध्याय सोडवावे असे सांगितले. अनेक विद्यार्थ्यांचे अभ्यास तपासून पाहिले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कोरोना महामारीच्या काळात आपण कशी काळजी घ्यावी हे विद्यार्थ्याकडून माहिती घेतली व सविस्तर शोशल डिष्टंश, mask, sanitizer या विषयी सविस्तर माहिती दिली. तसेच आज 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले व या साक्षरता दिना विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच आज शाळेतील एका विद्यार्थीनी कु. श्रावणी शिवराज पाटील हिचा वाढदिवस असल्याने श्री ज्ञानोबा मुंढे यांच्या हस्ते भेट वस्तू देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की अतिथी देवो भव असे म्हणतात आपल्या भारतीय संस्कृती प्रमाणे पाहुण्यांचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे सांगितले व कोविड कॅप्टन गटातील विद्यार्थानी साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे यांनी शाळेतील परिसर, वृक्षलागवड व कोविड कॅप्टन गटातील आॅनलाईन व आॅफलाईन शिक्षण घेत असलेले पाहून समाधान व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शालेय प्रगती व गुणवत्ता वाढीसाठी शुभेच्छा दिल्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी साधन व्यक्ती श्री ज्ञानोबा मुंढे यांचे विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती दिल्याबद्दल आभार मानले*
No comments:
Post a Comment