Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, October 12, 2021

राज्य कर्मचारी/शिक्षक यांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.

*राज्य कर्मचारी/शिक्षक यांच्या माहे- ऑक्टोबर 2021(पेड इन नोव्हेंबर2021) च्या वेतनात होणारे 3 महत्वपूर्ण बदल.*

राज्य शासकीय कर्मच्यार्‍यांचा महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात आला. | DA INCREASED FROM 17 % TO 28 %


दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात यावा.


सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२० दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७% इतकाच राहील.
सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी.
दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील.


त्याचप्रमाणे मागील 5 महीन्यांची म्हणजेच 1 जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर 2019  या कालावधीतील 5 टक्के ची थकबाकी अदा करण्याचा शासन निर्णय देखील निर्गमीत करण्यात आलेला आहे.
👇👇👇👇👇
५ महिन्यांच्या कालावधीतील ५% महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीची रक्कम देखील मिळणार
ऑक्टोबर 2021 च्या पगारात घरभाडे भत्ता देखील वाढीव दराने मिळणार ?

1) *माहे- ऑक्टोबर 2021पासून महागाई भत्ता(DA) 17% वरुन  28% करणे..* 
(वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-2019/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021(शासन निर्णय संकेतांक 202110071550585405)


2) *1जुलै 2019 ते 30 नोव्हेंबर2019 या 5 महिन्यांचा 5% महागाई भत्ता वाढी चा फरक माहे ऑक्टोबर च्या वेतना सोबत रोखीने अदा करणे..*
(संदर्भ- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- मभवा-1319/ प्र. क्र. 30/सेवा-9 , दिनांक- 7 ऑक्टोबर 2021 (शासन निर्णय संकेतांक 202110071602270505 )

*3)घरभाड़े भत्ता दरात वाढ करणे* 
●  8 % वरुन 9 % (ग्रामीण भाग/ Z कैटेगरी)
● 16 % वरुन 18% (Y कैटेगरी शहरी क्षेत्र )
●24 % वरुन 27% (X कैटेगरी महानगर क्षेत्र)

(संदर्भ :- वित्त विभाग , शासन निर्णय क्रमांक- घभाभ-2019 / प्र. क्र. 2 /सेवा-5 , दिनांक- 5 फेब्रुवारी 2019)

5फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयात स्पष्ट नमूद केलेले आहे की, जेव्हा प्रचलित महगाई भत्ता DA- दर 25% च्या वर जाईल तेव्हा घरभाड़े भत्ता(HRA) दरात X, Y, Z या प्रकारा नूसार अनुक्रमे 3% , 2% व 1% ची वाढ होईल..
त्यामुळे ज्या अर्थी आज महागाई भत्ता(DA) 17% वरुन 28% झाला आहे, म्हणजे महागाई भत्त्याची 25% मर्यादा ओलांडली गेली आहे, त्या अर्थी ऑक्टोबर महिन्या पासून घरभाड़े भत्ता (HRA) दरात देखील वरील प्रमाणे आपोआपच वाढ होईल..


https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*तरि सर्व शाळा/ कार्यालय यांनी शिक्षक / कर्मचाऱ्यांच्या वेतन बिलात या प्रमाणे बदल करून सुधारित बिले तयार करणे आवश्यक आहे, व त्यासाठी लागणारा आवश्यक निधि वरिष्ठ स्तरावर मागणी करणे देखील आवश्यक आहे...*

घरभाड़े भत्ता वाढ  5फेब्रूवारी2019शासन निर्णयात नमूद असल्याने आता त्यासाठी स्वतंत्र परिपत्र किंवा निर्णय निघण्याची शक्यता नसल्याचे मंत्रालयीन सूत्रांकडून कळाले आहे, तथापि जर शासना कडे निधि ची अनुपलब्धता असेल तर शासन घरभाड़े भत्ता वाढ थांबवणे बाबत स्वतंत्र पत्र काढू शकते...
परंतु जर तसे पत्र निघाले नाही तर पूर्वीच्याच शासन निर्णयांनूसार सुधारित बदल करून घरभाड़े भत्ता मागणी नोंदवणे आवश्यक आहे..

माहितीस्तव...

No comments:

Post a Comment