Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, March 31, 2022

माहे- मार्च पेड़ इन एप्रिल 2022 च्या वेतन बिलात करावयाचे 4 मुख्य बदल..updated

*माहे- मार्च पेड़ इन एप्रिल 2022 च्या वेतन बिलात  करावयाचे 4 मुख्य बदल..updated*

दि. 30 मार्च 2022 च्या वित्त विभागाच्या  शासन निर्णया नुसार  माहे मार्च 2022 च्या वेतन बिलात खालील बदल करणे / फरक समाविष्ट करणे आवश्यक आहे..

१. *माहे-मार्च 2022 च्या वेतनात 31% DA नुसार वेतन निश्चिती करणे..*
 DA 31% करण्यात आला आहे, त्यानुसार नियमित मार्च चे वेतन 31% DA नुसार कैलक्यूलेट करावे...

२. *3 महिन्याचा 11% DA फरक add करणे...*
1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता(DA) 17% वरून 28% लागू करण्यात आला होता पण जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत चा फरक आदेश तेव्हा नव्हता तो आता निघाला आहे.. त्यामुळे *1जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 अखेर 3महिन्याचा (17% वरुन 28% या प्रमाणे) 11% DA फरक आता देण्यात येईल त्यामुळे तो 11% फरक आता add करावा...*

३.  *8 महिन्याचा 3% DA फरक add करणे..*

माहे- 1जुलै 2021 पासून पुन्हा 28% वरून 31% असा DA वाढवण्यात आला आहे.. त्यामुळे *1 जुलै 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 अखेर चा 3% DA फरक* (28% वरुन 31% ) ही पुन्हा या पगारात add करावा..

४. *जुलै 2021 ते सप्टें 2021 पर्यंत चा 3 महिन्याचा HRA फरक add करणे..*

*शासन निर्णय* - *3% महागाई भत्ता वाढ | मागील तीन महिण्याचा 11% फरक देणेबाबत*
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
शहराच्या कैटेगिरी नुसार मेट्रो मध्यम, सर्वसामान्य शहर/ग्रामीण करीता अनुक्रमे
*1% , 2% व 3% HRA हा माहे- जुलै2021 ते सप्टें 2021  अखेर गणना करून तो फरक या मार्च महिन्याच्या वेतनात  add करावा..*

कारण 1 जुलाई 2021 पासून महागाई भत्ता( DA) 28% झाला आहे म्हणजेच तो  25% लिमिट च्या वर गेल्याने वेतन आयोगाच्या नियमानुसार माहे जुलै2021 पासून घरभाड़े भत्त्यात(HRA) 1% , 2% , 3% अशी नैसर्गिक वाढ अपेक्षित आहे... आणि ऑक्टोबर2021 पासून आपण ती प्रत्यक्ष घेतली आहे, तथापि आता जुलै 2021 ते सप्टें 2021 पर्यंत ती वाढ घ्यायची आहे...
(तथापि जर नोव्हे2021 पासून HRA बदल केलेला असेल तर आपला HRA फरक हा जुलै2021 ते ऑक्टोबर2021 पर्यंत असेल...)

माहितीस्तव...
➖➖➖➖➖➖➖➖➖

कार्योत्तर परवानगीसाठी प्रस्ताव जिल्हा परिषद लातूर















सन 2022 -23 उन्हाळी सुट्टी बाबत शासकीय परीपत्रक



Saturday, March 26, 2022

होळी या सणा निमित्ताने लिहलेला लेख


*गावातल्या होळीची मजाच वेगळी*


होळीचा दिवस उगवला की आम्हाला होळी खणायचे वेध लागायचे. दुपारी त्या जागेवर पाणी शिंपडून होळी खणायची तयारी सुरू व्हायची.त्याचवेळी आम्हा मुलांपैकी एक गट होळीसाठी लाकडं आणि गवर्‍या गोळा करायला आजूबाजूच्या घरांमध्ये जात असे. या गटात माझा समावेश असे. आमच्या आगमनाची वर्दी हातातली डबडी देत असत. कुणाच्याही घरी गेल्यानंतर दडा दडा डबडी वाजवत सामुदायिकरित्या एक परवलीचं वाक्य म्हटलं जायचं. 'पाच लाकडं पाच गवर्‍या दिल्याच पाहिजेत.' खणखणीत आवाजात मागणी मांडल्यानंतर घरातील बाई बाहेर येऊन आम्हाला लाकडं आणि गवर्‍या जे काही उपलब्ध असेल ते देत असे. गावात बहुतांश घरांत किमानपक्षी पाणी तापवायला तरी चुलीचाच वापर होत असल्याने लाकडं आणि गवर्‍या जवळपास सगळ्यांच्याच घरी सायच्या. ज्या घरात लाकडं नसत. ती मंडळी गावात लाकडाचे भारे घेऊन येणार्‍या मंडळी कडून भारे घेऊन होळीला देत असत. ही सगळी लाकडे आणि गवर्‍या घेऊन आम्ही मंडळी होळीच्या तिथे यायचो. तोपर्यंत खणण्याचं काम पूर्ण झालेलं असायचं. मधल्या काळात मोठी मंडळी काम कुठवर चाललंय ते बघायसाठी येऊन जायची. मग संध्याकाळी हातातली काठी टेकत टेकत जेष्ठ काका यायचे. हे आमच्या गल्लीत रहाणारे. हे  मग मोठ्यांच्या मदतीने होळी रचायचे. होळी रचण्याचीही शास्त्रीय पद्धत आहे. आधी होळीच्या खड्ड्यात मध्ये मोठठं लाकूड ठेवायचं. मग त्याला आधाराला खाली जड छोटी लाकडं रचायची आणि त्याच्या बाजूला गवर्‍या रचायच्या. त्यामुळे मधलं लाकूड हलायचं नाही. मग हळूहळू इतर लाकडं रचत जायची. असं करत करत होळी रचण्याचे काम पूर्ण व्हायचे.

मग आजूबाजूच्या बायका येऊन होळीभोवती रांगोळी काढायच्या. छानपैकी होळीची तयारी पूर्ण व्हायची. त्यानंतर अप्पाकाका होळीची पूजा करायचे. आम्ही सगळे त्यांना हवं नको ते बघत असू. त्यानंतर होळी पेटवायचा कार्यक्रम असायचा. मान्यवरांकडुन एका जळत्या लाकडाच्या सहाय्याने होळी पेटवायचे. मग आम्ही बच्चेमंडळी होळी सगळ्या बाजूंनी पेटवायचो. मग धडधडणार्‍या ज्वालांशी स्पर्धा करत आम्ही जोरदार 'बोंब' ठोकायचो.

होळी पेटली की मग आजूबाजूची मंडळी होळीला नैवेद्य दाखवायला यायची. या नैवेद्यावेळी होळीत आख्खा नारळ वहायचे. हा नारळ थोडा भाजला गेल्यानंतर होळीतून बाहेर काढला जायचा. आणि मग तो फोडून त्यातलं खोबरं खायचं. या खोबर्‍याची चव निव्वळ अप्रतिम. होळीच्या धुराचा सुगंधही या खोबर्‍यात मिसळलेला असायचा. तो गंध आजही आठवण काढली तरी नाकात येतोय.होळी एकदा पेटली. सगळयांची जेवणं झाली, की आजूबाजूच्या घरची सगळी मंडळी होळीच्या आसपास येऊन बसायची. मग एक छानपैकी गप्पांची मैफल रंगायची. याची त्याची गंमत, टर उडविणे. किस्से सांगणे यात मजा यायची. मूळची गावातली पण नोकरीनिमित्त बाहेरगावी गेलेली मंडळीही या निमित्ताने गावात यायची. तीही मग होळीवर यायची. यानिमित्ताने सगळ्यांच्या भेटी व्हायच्या. त्यामुळे गप्पांना बहर यायचा.काही मुलं गावातल्या सगळ्या होळींचा फेरफटका मारत असत. मग जातांना प्रत्येक होळीवर थांबून गप्पा मारल्या जायच्या. शिवाय प्रत्येक होळीवर गेल्यावर कचकचीत शिव्या देणं ही प्रथाही आवर्जून पाळली जायची. लहानपणी शिव्यांची एवढी 'दोस्ती' नसल्याने अनेक शिव्यांचे अर्थ कळायचे नाही. मग कधी कधी त्या शिव्या दिल्या की घरातल्यांचा पाठीवर सणसणीत धपाटा बसायचा.

होळी म्हटलं की ही सगळी मजा आठवते. लहानपणी केलेल्या गमती-जमती, करामती, पराक्रम सगळं काही आठवतं. त्यावेळी लोकांना जो त्रास दिलं त्याविषयी आज वाईट वाटत असलं तरी ती त्यावेळची मजा होती. सगळे लोक एकत्र यायचे. आनंदाने होळी साजरी करायचे. 'आमची होळी' असा एक अभिमानही असायचा. पुढे वयाने मोठे व नोकरी निमित्ताने बाहेर गेल्यावर हे सगळं संपलं. होळी म्हणजे बिल्डिंगच्या पुढे एक खड्डा खणून चार दोन लाकडं आणून थोड्यावेळासाठी आग निर्माण करणं एवढंच राहिलं. ते ठीक आहे, पण त्या गप्पा, गंमत-जंमत हे सगळं सगळं गावाबरोबर गावातच राहिलं. तेव्हा पासून ज्या ठिकाणी आम्ही होळी साजरी करायची त्या ठिकाणच्या स्थळाला होळी चौक म्हणून ओळखतात. आजता गायत हा होळी चौक ब्राह्मण गल्ली उदगीर सर्वांना माहित व हा चौक परिचित आहे. 

*होळीचे महत्व*

हिंदू संस्कृतीत सणांची काही कमतरता नाही. आपले विविध सण जितके आनंदी, उत्साही तितकेच अर्थपूर्णही. असाच एक रंगाचा सण दोन दिवसांवर येऊन ठेपलाय तो म्हणजे होळी. शेवटचा मराठी महिना फाल्गुन आणि या महिन्यातील पौर्णिमेला येणारा सण म्हणजे 'होळी.' देशभरात विविध ठिकाणी हा सण साजरी करण्याची परंपरा, पद्धत वेगळी. पण तितकीच खास आणि आकर्षक. पहिल्या दिवशी होळी दहन केली जाते आणि दुसऱ्या दिवशी एकमेकांवर रंग उडवून रंगांची होळी खेळली जाते ज्याला धुलिवंदन असे म्हटले जाते. होळीला शिमगाही म्हटले जाते. भगवान शंकराची लीला, याला शिव-शिमगासुद्धा म्हटले जाते.

दृष्ट प्रवृत्ती, वाईट, अमंगल विचार यांचा नाश करुन चांगली वृत्ती, चांगले विचार अंगी बाळगावे, हा या सणामागील उद्देश. होळीनिमित्त पुरळपोळी, रंग, धुडवड या सगळ्याचे आकर्षण तर असतेच.

जसे प्रत्येक सणाची कहाणी आहे तसेच, होळी साजरी करण्या मागे देखील एक प्राचीन इतिहास आहे. हिरण्यकश्यपू नावाचा एक राजा होता जो स्वतःला खूप बलवान समजायचा. स्वतःच्या अहंकारामुळे तो देवतांची घृणा करायचा तसेच त्याला देवांचा देव भगवान विष्णूचे नाव ऐकणे देखील पसंत नव्हते. परंतु त्याचा पुत्र प्रल्हाद हा भगवान विष्णू चा परम भक्त होता. आणि हे हिरण्यकश्यपूला अजिबात पसंत नव्हते. तो वेगवेगळ्या प्रकारे त्याला घाबरवण्याचा प्रयत्न करत असे जेणे करून पुत्र प्रह्लाद भगवान विष्णूची उपासना करणे सोडून देईल. परंतु भक्त प्रह्लाद त्यांना न डगमगता त्याच्या भगवान विष्णूच्या भक्तीत लीन होत असे. ह्या सगळ्याला कंटाळून राजाने एक योजना बनवली, आणि त्यानुसार आपली बहीण होलिका जिला वरदान मिळाले होते कि ती आगीवर विजय प्राप्त करू शकते तसेच कोणतीही आग तिला जाळू शकत नाही. राजाने होलिकेला भक्त प्रह्लादला घेऊन अग्नीच्या चितेवर बसण्यास सांगितले. प्रह्लाद आपल्या आत्यासोबत अग्नीच्या चितेवर बसला व भगवान विष्णूच्या नामस्मरणात लीन झाला आणि थोड्याच वेळात होलिका जळायला लागली आणि एक आकाशवाणी झाली आणि ज्यानुसार होलिकेला आठवलं की, तिला वरदानात असेही सांगितले होते कि ज्यावेळी ती तिच्या वरदानाचा दुरुपयोग करेल तेव्हा ती स्वतः जळून राख होईल. भक्त प्रह्लादाला अग्नी काहीही करू शकला नाही मात्र होलिका त्या अग्नीत जळून भस्म झाली. अशा प्रकारे त्या दिवशी लोकांनी उत्सव साजरा केला आणि तो दिवस होळी दहन म्हणून ओळखला जाऊ लागला. दुसऱ्या दिवशी रंगाने हा सण उत्सवात साजरा करू लागले.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*मुख्याध्यापक*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖

Wednesday, March 23, 2022

ज्यांनी सेवेत असताना आपली शैक्षणिक अर्हता वाढवीत असताना आपल्या कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता ज्यांनी आपली शैक्षणिक अर्हता वाढवीली आहे अशा शिक्षक कार्योत्तर परवानगीचे प्रस्ताव दि.10/4/2022 पर्यंत सादर करावेत

 ज्यांनी सेवेत असताना आपली शैक्षणिक अर्हता वाढवीत असताना आपल्या कार्यालयाची पूर्वपरवानगी न घेता ज्यांनी आपली शैक्षणिक अर्हता वाढवीली आहे अशा शिक्षक बंधू-भगीनींना कार्योत्तर परवानगीसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी शेवटची संधी देण्यात येत असून त्यांनी आपले कार्योत्तर परवानगीचे प्रस्ताव दि.10/4/2022 पर्यंत सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. तेंव्हा अशा शिक्षक बंधू-भगीनींनी आपले प्रस्ताव तात्काळ सादर करावेत 



*दिनांक 22/3/2022 पासून लातूर जिल्ह्यातील शाळेची सकाळ सत्राचे वेळापत्रक.*



Friday, March 18, 2022

*जिल्हा परिषद लातूर, वरिष्ठ विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी मान्य पदाच्या 25%पदे भरण्यासाठी पदोन्नतीसाठी निकष किमान सेवा 3 वर्षे, शैक्षणिक पात्रता पदवी व बी. एड. 50%गुण घेऊन उत्तिर्ण. सर्व मु.अ के प्रा शा / जि प प्रशाला याना कळविण्यात येते की वरिल पत्रातील सुचनेनुसार माहिती दि 21/03/2022 रोजी कार्यालयात सादर करावी विलब होणार नाही याची काळजी घ्यावी*👆



22 मार्च 2022 रोजीची सुट्टी रद्द बाबत पत्र



Friday, March 11, 2022

शा. पो. आ. मेनु मार्च ते एप्रिल 2022



तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार*

तिवटग्याळ - तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 8/3/2022 रोजी जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श मातांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. .या सत्कार सोहळा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावच्या महिला सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे व प्रमुख पाहुणे इंजिनिअर निलेश फटाळे, गजानन नरहरे, तेलंगपुरे दिलीप, श्रीमती अंजली लोहारकर, पूजा बिरादार, श्रीदेवी कोरे, भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते.प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते   पुष्पहार अर्पण करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात आज 8 मार्च जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आपल्या गावातील कर्तुत्ववान व आदर्श महीलांचा आदर्श माता म्हणून सत्कार करण्यात येणार आहे असे सविस्तर सांगितले.  मूख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी प्रास्ताविकात शाळेतील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती सांगितली. तसेच या आदर्श मातांचा सत्कार विषयावर सविस्तर माहिती दिली. मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व महिलांना बालसंगोपन, शिक्षणाची गरज व आवश्यकता, स्त्रि पुरुष समानता. महिला सक्षमीकरण, नैतिक मूल्ये, संस्कार, आई म्हणून पालकांची जबाबदारी, कौंटुबिक नातेसंबंध व जिव्हाळा,कालची व आजची स्त्रि, कुटुंब पद्धती या विषयावर सविस्तर माहिती दिली. तसेच गावच्या महिला सरपंच सौ. उज्ज्वला ताईला नरहरे यांनी उपस्थित सर्व महिलांना आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे गरजेचे आहे असे सांगितले, महीला सक्षमीकरण करणे आवश्यक आहे असे सांगितले तसेच मूलांना चांगले संस्कार द्यावे असे सांगितले. तसेच  मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी वर्गातील हुशार मुलगा व मुलगी यांच्या आई चा आदर्श मातां म्हणुन सत्कार करण्यात येणार आहे असे सांगितले व खालील मातांचा सत्कार करण्यात आला या मध्ये सौ. उज्ज्वला ताईला नरहरे सरपंच, अंजली लोहारकर सहशिक्षीका, पूजा बिरादार अंगणवाडी कार्यकर्ती, भागाबाई बिरादार अंगणवाडी मदतनीस, श्रीदेवी कोरे आशा कार्यकर्ती, प्रियंका तोमर पाटील, आरती तवर, अर्चना पाटील, जयश्री बिरादार, सोनाली पाटील, स्मिता पाटील, गीता कच्छवे, मनिषा आरकिले, संगीता बिरादार, मिना कांबळे व वर्षा श्रीमंगले आदी महीलांचा आदर्श माता म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
आदी मातांचा आदर्श माता म्हणून सत्कार करण्यात आला. सत्कारा नंतर उपस्थित सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा दिल्या. या  आदर्श मातांचा सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.