*माहे- मार्च पेड़ इन एप्रिल 2022 च्या वेतन बिलात करावयाचे 4 मुख्य बदल..updated*
दि. 30 मार्च 2022 च्या वित्त विभागाच्या शासन निर्णया नुसार माहे मार्च 2022 च्या वेतन बिलात खालील बदल करणे / फरक समाविष्ट करणे आवश्यक आहे..
१. *माहे-मार्च 2022 च्या वेतनात 31% DA नुसार वेतन निश्चिती करणे..*
DA 31% करण्यात आला आहे, त्यानुसार नियमित मार्च चे वेतन 31% DA नुसार कैलक्यूलेट करावे...
२. *3 महिन्याचा 11% DA फरक add करणे...*
1 जुलै 2021 पासून महागाई भत्ता(DA) 17% वरून 28% लागू करण्यात आला होता पण जुलै 2021 ते सप्टेंबर 2021 पर्यंत चा फरक आदेश तेव्हा नव्हता तो आता निघाला आहे.. त्यामुळे *1जुलै 2021 ते 30 सप्टेंबर 2021 अखेर 3महिन्याचा (17% वरुन 28% या प्रमाणे) 11% DA फरक आता देण्यात येईल त्यामुळे तो 11% फरक आता add करावा...*
३. *8 महिन्याचा 3% DA फरक add करणे..*
माहे- 1जुलै 2021 पासून पुन्हा 28% वरून 31% असा DA वाढवण्यात आला आहे.. त्यामुळे *1 जुलै 2021 ते 28 फेब्रुवारी 2022 अखेर चा 3% DA फरक* (28% वरुन 31% ) ही पुन्हा या पगारात add करावा..
४. *जुलै 2021 ते सप्टें 2021 पर्यंत चा 3 महिन्याचा HRA फरक add करणे..*
*शासन निर्णय* - *3% महागाई भत्ता वाढ | मागील तीन महिण्याचा 11% फरक देणेबाबत*
-----------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
-----------------------------
शहराच्या कैटेगिरी नुसार मेट्रो मध्यम, सर्वसामान्य शहर/ग्रामीण करीता अनुक्रमे
*1% , 2% व 3% HRA हा माहे- जुलै2021 ते सप्टें 2021 अखेर गणना करून तो फरक या मार्च महिन्याच्या वेतनात add करावा..*
कारण 1 जुलाई 2021 पासून महागाई भत्ता( DA) 28% झाला आहे म्हणजेच तो 25% लिमिट च्या वर गेल्याने वेतन आयोगाच्या नियमानुसार माहे जुलै2021 पासून घरभाड़े भत्त्यात(HRA) 1% , 2% , 3% अशी नैसर्गिक वाढ अपेक्षित आहे... आणि ऑक्टोबर2021 पासून आपण ती प्रत्यक्ष घेतली आहे, तथापि आता जुलै 2021 ते सप्टें 2021 पर्यंत ती वाढ घ्यायची आहे...
(तथापि जर नोव्हे2021 पासून HRA बदल केलेला असेल तर आपला HRA फरक हा जुलै2021 ते ऑक्टोबर2021 पर्यंत असेल...)
माहितीस्तव...
➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment