Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, July 28, 2022

सध्याचे युग स्पर्धेचे, स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही

सध्याचे युग स्पर्धेचे, स्पर्धा परीक्षेला पर्याय नाही
-------------------------------------------
     काळ जसा बदलत चालला आहे तसे प्रत्येक क्षेत्रात बदल होताना दिसतात.शिक्षण क्षेत्रात पूर्वीचा काळ आणि आताचा काळ यात तुलना केली तर बरीच तफावत आढळून येते. शिक्षण क्षेत्रात शाळा महाविद्यालयात बराच बदल झालेला आढळून येतो.बदलत्या काळानुसार शिक्षणाचे स्वरूपही बदलले आहे. पूर्वी शाळा महाविद्यालय अनुदानित होती. नंतरच्या काळात अनेक शाळा महाविद्यालय कायम विनाअनुदानित झाली.वेगवेगळ्या अभ्यासक्रमाचे शिक्षण निघाले.प्रत्येक क्षेत्रामध्ये इंग्रजी विषयाची प्रकर्षाने जाणीव भासू लागली.मग इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू झाल्या.पूर्वी शिष्यवृत्ती नंतर नवोदय आणि आता विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा निघाल्या. पूर्वी शाळा महाविद्यालय कमी होती.आता पावलो पावली शाळा महाविद्यालय सुरू केली.त्यामुळे हजारो लाखो विद्यार्थी पदव्या घेवून बाहेर पडू लागली.त्यामुळे शासनाने दहावीनंतर चे डी. एड.आता बारावी नंतर केले.बारावी उतीर्ण झाल्यावर पूर्वी वैद्यकीय, अभियांत्रिकी च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळायचा पण या अभ्यासक्रमासाठी आता बारावीनंतर वैद्यकीय प्रवेश पूर्व परीक्षा, अभियांत्रिकी प्रवेश पूर्व परीक्षा, डी. एड.प्रवेशपूर्व परीक्षा शासनाने लागू केल्या.त्यामुळे हजारो विद्यार्थी गुणवत्ता प्राप्त करूनही या ठिकाणी वरील शिक्षणापासून वंचित राहू लागली आहेत. त्यांचे एकमेव कारण म्हणजे प्राथमिक शिक्षणापासूनच स्पर्धा परीक्षेत सहभागी न झाल्यामुळे याठिकाणी अपयश मिळते आहे.त्यामुळे प्राथमिक शिक्षण घेताना पासूनच स्पर्धा परीक्षेत सहभाग, स्पर्धा परीक्षेची गोडी लावणे आवश्यक आहे. या स्पर्धा परीक्षेमुळे वरील परिक्षेशिवाय एम.पी.एस.सी. , यु.पी.एस.सी. ,वर्ग -१, वर्ग-२ ,व इतर राज्य व राष्ट्रीय स्तरावरच्या परीक्षा सहज सोप्या जातात.त्यामुळे स्पर्धा परीक्षा काळाची गरज बनली आहे.
         शालेय अभ्यासक्रमात विस्ताराने त्या त्या विषयाची परीक्षा असते पण स्पर्धा परीक्षेत अब्जेटिव्ह पध्दतीने परीक्षा घेतल्या जातात. म्हणजे शालेय अभ्यासक्रमात काही ओळीत उत्तर द्या अन स्पर्धा परीक्षेत एका वाक्यात उत्तरे द्या अशी पध्दत असते असे म्हणायला हरकत नाही. स्पर्धा परिक्षेमुळे तात्काळ उत्तरे देण्याची विद्यार्थ्यांची क्षमता वाढते. संगणक, इतिहास, विज्ञान ,गणित अशा वेगवेगळ्या विषयात विद्यार्थी आपली आवड आपण ओळखू शकतो.त्यानुसारच आपले ध्येय समोर ठेवून त्या त्या पध्दतीने वाटचाल करीत तो एखाद्या विषयात (क्षेत्रात ) यशस्वी होवू शकतो. स्पर्धा परीक्षेमुळे विद्यार्थी आपला विषय व आपली क्षमता ओळखून पुढे जातो. जर एखादा विद्यार्थी केवळ शालेय अभ्यासक्रमानुसार परीक्षा देत गुणवत्ता प्राप्त करीत पुढे गेला तर बारावी नंतर डी. एड., वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेशपूर्व परीक्षेत यशस्वी झाला नाही तर गुणवत्ता प्राप्त करूनही नाविलाजाने कुठलातरी मार्ग पत्करावा लागतो.प्राथमिक शिक्षण घेत असतानापासून स्पर्धा परीक्षेत भाग घेतला तर पुढे शिक्षक, डॉक्टर, इंजिनिअर किंवा उच्च पदस्थ अधिकारी होण्याचे ध्येय ठेवून तशी वाटचाल करता येते.आणि जीवनात यशस्वी होता येते.त्यामुळे आता उच्च शिक्षण व एखाद्या क्षेत्रात मोठा अधिकारी पदावर जायचे असेल तर सद्याचे युग हे स्पर्धेचे युग असून या युगात स्पर्धा परीक्षेला पर्याय राहिला नाही. आणि स्पर्धा परीक्षेत भाग घेणारा प्रत्येक विद्यार्थी जगात कुठल्याही पातळीपर्यंत पोहचू शकतो.म्हणून प्राथमिक शिक्षणापासूनच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षेत सहभागी व्हावे.आपली आवड आपले भविष्य स्वतःच तयार करावे... यशस्वी व्हावे! ही सदिच्छा !!
     
      सुतार संतोष काशिनाथ
       स.शि. जि.प.प्रा.शा. डिगोळ
        ता.शिरूर अनंतपाळ
         जि.लातूर

No comments:

Post a Comment