Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, July 28, 2022

परीक्षेपूर्वी विद्यार्थी व पालकांनी घ्यावयाची काळजी

परीक्षेपूर्वी विद्यार्थी व पालकांनी घ्यावयाची काळजी
-------------------------------------------
     परीक्षा जवळ आल्या की ,विद्यार्थ्यांच्या  डोक्यावर ताण पडतो. तेव्हा आपल्या पाल्यांच्या डोक्यावर ताण येऊ देऊ नये यासाठी पालकांनी काही काळजी घेणे व विद्यार्थ्यांनीही संयमाने घेणे गरजेचे असून त्यामुळे परीक्षा सुरळीत देता येतील. त्यासाठी पालक व पाल्यानी खबरदारी घेणे गरजेचे आहे.
         परीक्षा जवळ आल्या की, वर्षभर शाळेतून शिकवलेला अभ्यासक्रम व क्लासेसमधून पूर्ण झालेला अभ्यासक्रम यचो उजळणी करून न जमलेला अभ्यास परत शिक्षकाकडून करून घेणे गरजेचे आहे. शिक्षकांनी त्यांची जबाबदारी व्यवस्थित रित्या सांभाळली तर विद्यार्थी यशस्वी होऊ शकतात. विशेष म्हणजे या काळात पालकांनी आपल्या पाल्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होवू नये यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच या काळात आपली पाल्य बाहेर पडणार नाहीत याची काळजी पालकांनी व गुरुजींनी घेणे गरजेचे आहे. बाहेर कोण्या पाहुण्याकडे व मित्रमंडळी कडे फिरकणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.बाहेरच्या वातावरणात आपला मुलगा गेला की, त्याचे परत अभ्यासात मन रमत नाही.या काळात पालकांनी आपल्या पाल्यांना मर्यादित जेवण द्यावे.बाहेरचे खाण्यापासून दूर ठेवावे.या कालावधीत त्याचे आरोग्य चांगले राहील याची काळजी घेताना घरचे जेवण पण माफक द्यावे.अन्यता या कालावधीत आपले  पाल्य आजारी पडल्यास त्याचे वर्ष वाया जाईल किंवा निकालावर परिणाम होईल.त्यासाठी आपल्या पाल्याचे जेवण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे.परीक्षेच्या काळात पालकांनी म्हणजे आई-वडिलांनी आपल्या पाल्यांना परीक्षेसाठी पोषक वातावरण निर्माण करावे.अभ्यासासाठी प्रोत्साहीत करावे.त्यांना या कालावधीत रागावू नये.किंवा कामाचे ओझे लादू नये.परीक्षेत इतकी गुण मिळालीच पाहिजेत असा दबाव आणू नये. या सर्व बाबीसाठी थोडा वेळ पालकांनी पाल्यासाठी काढावा.आपल्या पाल्यांना वेगवेगळ्या विषयाचे पुस्तक नोट्स शिक्षकाकडून किंवा क्लासेसमधील शिक्षकाकडून चौकशी करून उपलब्ध करून द्यावीत.या कालावधीत आपल्या पाल्यांना किमान पाच तास तरी झोप घेवू द्यावे.तशी त्यांची व्यवस्था करावी जास्तीचे झोपणे किंवा जागरण करणे हे आरोग्यासाठी योग्य राहणार नाहीत.याच कालावधीत आपली पाल्य बाहेर कुठे फिरतात ? कोणासोबत फिरतात यावरही लक्ष ठेवावे.या कालावधीत आपली पाल्य अभ्यासू मुलांव्यतिरिक्त इतर मित्रांसोबत राहता कामा नये.यासाठी काळजी घ्यावी. कारण याकाळात अभ्यासाच्या दडपणाखाली आपली पाल्य वाईट मुलांच्या संगतीत राहिले तर त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल.आणि इतर गोष्टीकडे त्याचे लक्ष केंद्रित होईल म्हणून अशा मुलापासून आपली पाल्य दूर ठेवावीत ही पालकांची जबाबदारी आहे.याकाळात परीक्षेपूर्वी एक महिना अगोदर घरातला टी. व्ही. बंदच ठेवावा आणि आपल्या पाल्यांना मोबाइल पासून दूर ठेवावे.आपली पाल्य टी. व्ही.पाहात बसली तर वेळ वाया जातो आणि मोबाईलमुळे इतरांना बोलण्यात वेळ जातो, युट्युब, गाणे पाहणे, गेम खेळणे यात बराचसा वेळ वाया जातो.त्यासाठी मोबाईल देऊ नये आणि काही काळ टी. व्ही.बंद ठेवावा.कारण याच्या वापराने वेळेचा अपव्यय होतो.
        पालकाएवढीच विद्यार्थी घडविण्याची जबाबदारी शिक्षकांचीही आहे.शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी प्रोत्साहित करावे.प्रत्येक विषयाची परत उजळणी करून घ्यावी.विद्यार्थ्यांना न जमलेला अभ्यास पुन्हा करून घ्यावा.अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर वेगवेगळ्या विषयाच्या वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका सोडवून घ्याव्यात.प्रत्येक विषयाचा आराखडा तयार करून अभ्यास पूर्ण करावा. विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीस नेण्यासाठी शिक्षक हा प्रयत्नशील असावा.विद्यार्थ्यांनीही शाळेतील शिकवणी, क्लासेसमधील शिकवणी पूर्ण झाल्यावर अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर अवघड धडे पुन्हा पुन्हा उजळणी करून घ्यावेत.संबंधित शिक्षकाला विचारून ते नीट समजून घेवून परिक्षेसाठी सज्ज व्हावे व भरघोस यश संपादन करावे.

       सुतार संतोष काशीनाथ
        स.शि. जि.प.प्रा.शा.डिगोळ
        ता.शिरूर अनंतपाळ
         जि.लातूर

No comments:

Post a Comment