Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, September 9, 2022

निपुण भारत (FLN) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माता- पालक गटांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी लिंक मध्ये माहीती भरण्याबाबत

*केंद्र प्रमुख सर्व*
निपुण भारत (FLN) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी माता- पालक गटांचा सहभाग प्राप्त करून घेण्यासाठी लिंक मध्ये माहीती भरण्याबाबत.

संदर्भ-
१. मा. उपसंचालक, महाराष्ट्र प्राथ.शिक्षण परिषद, मुंबई यांच्या बैठकीतील निर्देश दिनांक- ०२-०८-२०२२
२. मा. शिक्षण उपसंचालक,लातूर विभाग यांच्या बैठकीतील निर्देश दिनांक- २२/०८/२०२२
३) दिनाक १२/०८/२०२२ ला लातूर जिल्ह्यातील सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी,नोडल अधिकारी यांची कार्यशाळेतील मा. शिक्षणाधिकारी साहेब यांचे निर्देश..

उपरोक्त संदर्भिय विषयांन्वये कळविण्यात येते की, "निपुण भारत" अंतर्गत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान अभियानाची (FLN)अंमलबजावणी सुरु आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी माता- पालक गट स्थापन करणे आवश्यक आहे. व या सर्व माता- पालक गटांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान (FLN) अभियानाची उदिष्टे सोप्या भाषेत समजेल असे साहित्य राज्यस्तरावरून उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच दर आठवडयाला राज्यस्तरावरून एक आयडीया व्हिडीओ/कार्ड माता गटांना देऊन त्याबद्दल मार्गदर्शन केल्या जाणार आहे.

*करिता इयत्ता- १ली ते ३री च्या मुलांच्या माता- पालकांचे मोहल्ला नुसार (वाडी/वस्ती) गट तयार करावयाचे आहे.*

*माता- पालक गटांची माहिती दिनांक-२८ऑगष्ट २०२२ पर्यंत भरण्यासाठीची लिंक खालील प्रमाणे:-*
 @ latur Division- 

https://ee.humanitarianresponse.info/dMUue68n

*सदर लिंक मधे आपल्या शाळेची माहिती मुख्याध्यापक/शिक्षक या पैकी एका व्यक्तिने समाविष्ट करुन सबमिट करावी. (इयत्ता- १ली ते ३री)*


*मा. शिक्षणाधिकारी साहेब लातूर*यांच्या आदेशानव्यये)*
*सदर लिंक मधे आपल्या शाळेची माहिती मुख्याध्यापक/शिक्षक या पैकी एका व्यक्तिने समाविष्ट करुन सबमिट करावी. (इयत्ता- १ली ते ३री)*

No comments:

Post a Comment