Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, February 27, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  मराठी राजभाषा दिन  उत्साहात साजरा*

तिवटग्याळ - दिनांक 27/2/2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  परीपाठानंतर मोठ्या उत्साहाने वि. वा. शिरवाडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की आज 27 फेब्रुवारी हा दिवस कवी, लेखक, नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 
कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केले आहेत.
 अशी माहिती दिली व अतिशय मोठ्या उत्साहाने मराठी राज भाषा दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली, या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील  शिक्षीका अंजली लोहारकर, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थित होऊन दोन वर्षेपुर्ती निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थित होऊन दोन वर्षेपुर्ती निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप*

तिवटग्याळ - दिनांक 27/2/2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  परीपाठानंतर शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की तिवटग्याळ शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांना 26/2/2023 रोजी उपस्थित होऊन दोन वर्षे पूर्ण सेवा निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही व पेन वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही व पेन वाटप केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी शाळेची प्रगती, शालेय वातावरण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके , उपाध्यक्ष कैलास तवर , पालक, गावचे सरपंच प्रशांत पाटील , उपसरपंच आरती तवर, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, गजानन नरहरे, पोलीस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती   पूजा बिरादार, मदतनीस  भामाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व ग्रामस्थांनी खुप खुप छान योगदान व सहकार्य दिले या बद्दल धन्यवाद व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.












Tuesday, February 21, 2023

कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत हवी असल्यास खालील ट्रस्टशी संपर्क साधा



कोणाला वैद्यकीय आर्थिक मदत


 हवी असल्यास
 खालील ट्रस्टशी संपर्क साधा.

 *सर रतन टाटा ट्रस्ट बॉम्बे* हाऊस,होमी मोदी स्ट्रीट, मुंबई-४००००१कॉल: ०२२-६६६५८२८२

 *रिलायन्स फाउंडेशन पूर्वी* अंबानी पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट-२२२-मेकर चेंबर्स IV, ३-रा मजला,नरिमन पॉइंट, मुंबई-४०००२१ कॉल करा: ०२२-४४७७०००० ०२२-३०३२५०००

*अमिरीलाल घेलाभाई* चॅरिटेबल ट्रस्ट-७१ गीतांजली-७३-७५ वाळकेश्वर रोड,मुंबई ४००००६

*आशा किरण चॅरिटेबल ट्रस्ट* C/oRadium Keysoft Solutions Ltd, कॉल करा: ०२२-२६३५८२९०१०१०रायगड दर्शन,इंडियन ऑइल कॉलनी समोर, जेपी रोड,अंधेरी-w-मुंबई ४०००५३

*अस्पी चॅरिटेबल ट्रस्ट* C/o अमेरिकन स्प्रिंग अँड प्रेसिंग वर्क्स प्रा.Ltd P.O.  बॉक्स क्र.७६०२.आदर्श गृहनिर्माण संस्था.रोड, मालाड-प-मुंबई-४०० ०६४ 

*ऑरेड चॅरिटेबल ट्रस्ट* १-बी-१-गिरीराज, अल्टामाउंट रोड मुंबई ४०००२६-कॉल करा: ०२२-२३८२१४५२ ०२२-२४९२६७२१

*B.अरुणकुमार अँड कंपनी* १६१६-प्रसाद चेंबर्स ऑपेरा हाऊस,मुंबई ४००००४

 बी डी बांगुर ट्रस्ट C/o कार्बन एव्हरफ्लो लि. बखावर,दुसरा मजला, नरिमन पॉइंट मुंबई ४०००२१

*बॉम्बे कम्युनिटी पब्लिक ट्रस्ट बीसीपीटी*
५-वा मजला रीजेंट चेंबर्स, नरिमन पॉइंट,मुंबई ४०००२१-कॉल करा: ०२२-२२८४५९२८ ०२२-२२८३६६७२

 *बुर्हानी फाउंडेशन*-२७६ डॉ.डी.एन रोड लॉरेन्स आणि मेयो हाऊस फोर्ट मुंबई-४००००१

*शताब्दी सेवा ट्रस्ट* सेंचुरी बाजार वरळी, मुंबई-४०००२५

*सेंटर फॉर रिसर्च अँड डेव्हलपमेंट* श्रेयस चेंबर्स, तळमजला-१७५-डॉ.  डी.एन.रोड,फोर्ट मुंबई  ४००००१-

*मुख्यमंत्री मदत निधी*, महाराष्ट्र शासन मंत्रालय, सहावा मजला नरिमन पॉइंट मुंबई-४००२०

*दामोदर आनंदजी चॅरिटी ट्रस्ट*-६६-वाजू कोटक मार्ग G.P.Oजवळ मुंबई-४००००१

*डायमंड ज्युबली ट्रस्ट आगा हॉल*,नेस्बिट रोड, समोर.सेंट मेरी हायस्कूल मुंबई-४०००१०-कॉल करा: ०२२-२३७७५२९४ ०२२-२३७७८९२३

 *धर्म विजय ट्रस्ट* C/O किलाचंद देवचंद अँड कंपनी न्यू ग्रेट इन्शुरन्स भवन-७-जमशेदजी टाटा रोड मुंबई-४०००२०

*धरमदास त्रिकमदास कपूरवाला*-४६-रिज रोड, रेखा क्रमांक-२-४-था मजला मुंबई-४००००६

*धीरुभाई अंबानी फाउंडेशन* रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड रिलायन्स सेंटर-१९ वालचंद हिराचंद मार्ग, बॅलार्ड इस्टेट,मुंबई ४०००३८दूरध्वनी : ०२२.३०३२७०००

*धिरजलाल टॉकचंद चॅरिटेबल ट्रस्ट* शैलेश निवास सुभाष लेन दफ्तरी रोड,मालाड पू, मुंबई-४०००९७

 *धिरजलाल मोरारजी अजमेरा चॅरिटी ट्रस्ट*  ३७-ए,सारंग स्ट्रीट मुंबई ४०००३

*दीपचंद गार्डी चॅरिटेबल ट्रस्ट* उषा किरण,दुसरा मजला अल्टामाउंट रोड, मुंबई-४००००६

*दिवालीबेन मोहनलाल चॅरिटेबल ट्रस्ट* खटाऊ हवेली पहिला मजला-95-K-ओमेर पार्क,भुलाभाई देसाई रोड,मुंबई-४०० ०२६

 *एकता चॅरिटेबल ट्रस्ट* ४/४४४-पंचरत्न,ऑपेरा हाऊस,मुंबई-४००००४

*एसके चॅरिटेबल ट्रस्ट*
 C/O कॅप्रिहन्स इंडिया लि शिवसागर इस्टेट,डी' ब्लॉक,दुसरा मजला डॉ. ए.बी.रोड,वरळी,मुंबई  ४०००१८

 *एक्सेल प्रोसेस प्रा लि. चॅरिटेबल ट्रस्ट* ११७-११८-मथुरदास वासनजी रोड, चकाला, अंधेरी पू मुंबई-४०००९३

*फजलभॉय चॅरिटेबल ट्रस्ट* लिबर्टी सिनेमाजवळ, मरीन लाईन्स मुंबई ४००२०

*गाला फाउंडेशन* वाकोला म्युनिसिपल मार्केटच्या मागे नेहरू रोड, वाकोला,सांताक्रूझ ई मुंबई

*गरवारे फाउंडेशन ट्रस्ट* चौपाटी चेंबर्स मुंबई  ४००००७

 *गोकाक फाउंडेशन* फोर्ब्स बिल्डीजी.फोर्ब्स स्ट्रीट,मुंबई-४०००२३

*गुडलास नेरोलॅक पेंट्स लि.ट्रस्ट* नेरोलॅक हाउस,ए.जी.कदम मार्ग, लोअर परेल,मुंबई
४०००१३

*गोविंद दत्तात्रय गोखले चॅरिटेबल ट्रस्ट* कल्पतरू हेरिटेज-५-वा मजला१२९-M.G.रोड मुंबई-४००००२३-कॉल करा:०२२.२२६७३८३१

*हरेंद्र दवे मेमोरियल ट्रस्ट* C/Oजन्मभूमी,३-रा मजला,जन्मभूमी मार्ग मुंबई-४००००१

*हेल्पिंग हँड चॅरिटेबल ट्रस्ट* ३-विदर्भ सम्राट को-ऑप Hsg.सोसायटी-९३-सी व्ही.पी.रोड विलेपार्ले पश्चिम मुंबई ४०००५६-दूरध्वनी: ०२२-६१४७४४८

*हिरानंदानी फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट* ऑलिंपिया, सेंट्रल एव्हेन्यू हिरानंदानी बिझनेस पार्क पवई मुंबई ४०००७६-

*हर्डिलिया चॅरिटेबल फाउंडेशन* एअर इंडिया बिल्डिंग-१३-वा मजला नरिमन पॉइंट मुंबई-४०००३१-कॉल करा: ०२२-२२०२४२२४

*हिराचंद गोवर्धनदास* २२२-मेकर चेंबर्स 1V-३-रा मजला, नरिमन पॉइंट मुंबई-४०००२१

*H.एम.मेहता चॅरिटी ट्रस्ट* मेहता हाऊस.४-वा मजला,अपोलो स्ट्रीट, खुशरू दुभाष मार्ग, मुंबई-४००००१

*H.S.C.ट्रस्ट* रेडी मनी मॅन्शन, वीर नरिमन रोड मुंबई-४०००२३

*जमनालाल बजाज फाउंडेशन* बजाज भवन २-रा मजला,जमनालाल बजाज मार्ग.२२६-नरिमन पॉइंट,मुंबई-४०००२१ कॉल करा: ०२२.२२०२३६२६

*श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्ट* प्रभादेवी,मुंबई -४०० ०२८.दूरध्वनी.  ०२२-२४३७३६२६ : वैद्यकीय जाहिरात फॉर्म वेबवर उपलब्ध आहे.
 कृपया तपशीलांसाठी त्यांची वेबसाइट पहा.

डायलिसिस @ मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात फक्त-२००-मध्ये करता येते. एकूण-२२ डायलिसिस मशिन्स बसवण्यात आल्या.  कृपया हे fwd करा जेणेकरून इतरांना फायदा होईल धन्यवाद. 
 प्राप्त झाल्याप्रमाणे फॉरवर्ड केले.

सुधारित जिल्हातंर्गत बदली संदर्भात पत्र दिनांक 21 /2/2023

सुधारित  जिल्हातंर्गत बदली संदर्भात पत्र दिनांक 21/2/2023
Download here 

Sunday, February 19, 2023

शिवजयंती निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची शिवजयंती रॅली

*शिवजयंती निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची शिवजयंती रॅली* 






























































































*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 19/2/2023 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली तद्नंतर गावच्या माजी सरपंच  उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले आदी जणांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जीजाऊ व मावळे यांच्या वेशभूषेतील लहान मुले, बालशिवाजी पाळणा मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गजर', अशा शिवमय वातावरणात तिवटग्याळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा बाल शिवाजी पाळणा सोहळा रंगला. माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे वेशभूषा केलेले विद्यार्थी शिवजयंती रॅली सोहळयात आकर्षण ठरले.  तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, मॉ जीजाऊ व मावळे पोशाख परिधान केले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर बालशिवाजी पाळणा सोहळा आयोजित केला.  तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वाजत गाजत बालशिवाजी पाळणा व पोवाडा म्हणत गावातील सर्व ठिकाणी मुख्य रस्त्याने शिव जयंती रॅली सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थित तिवटग्याळ गावातील शिव भक्तानी भक्तांनी बालशिवाजी पाळणा व पोवाडा सादर केली. शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, माजी सरपंच  उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस  भामाबाई बिरादार,संगीता नरहरे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, नवनाथ कच्छवे, अरुण पाटील, राजकुमार श्रीमंगले तसेच जेष्ठ महिला व पुरुष मंडळीनी उत्स्फूर्तपणे साद दिली.  अतिशय सुंदर सादरीकरण केले. या शिवजयंती सोहळा ला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, संगीता नरहरे शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, अरुण पाटील, नवनाथ कच्छवे आदी जणांनी विद्यार्थ्यांना शिवजयंती सोहळास मार्गदर्शन केले. अतिशय सुंदर व देखणा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बद्दल उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*