Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, February 27, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  मराठी राजभाषा दिन  उत्साहात साजरा*

तिवटग्याळ - दिनांक 27/2/2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  परीपाठानंतर मोठ्या उत्साहाने वि. वा. शिरवाडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना सांगितले की आज 27 फेब्रुवारी हा दिवस कवी, लेखक, नाटककार वि. वा. शिरवाडकर यांचा जन्म दिवस मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो 27 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिन महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसानिमित्त मराठी भाषा दिन साजरा केला जातो. मराठी राजभाषा दिनाला मराठी गौरव दिन असेही म्हटलं जातं. आपल्या पुढील पिढीने मराठी भाषेचे संवर्धन करावे म्हणून मराठी भाषा दिन साजरा केला जातो. कुसुमाग्रज यांनी मराठी भाषेला सन्मान मिळवून देण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न केले. कुसुमाग्रज महाराष्ट्राचे लाडके साहित्यकार, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, थोर लेखक, नाटककार म्हणून ओळखले जातात. कुसुमाग्रजांनी अनेक सरस कथा, कांदबऱ्या, निबंध, लघुकथा, नाटक, कविता इ. यांचे कुशल लेखन केले. विशाखा हा कवितासंग्रह आणि नटसम्राट हे नाटक त्यांच्या दोन गाजलेल्या साहित्यकृती आहेत. 
कुसुमाग्रजांच्या कारकीर्दीत पाच दशके विस्तारली आणि या काळात त्यांनी कविता, लघुकथा, निबंध, नाटकं आणि कादंबर्‍या या रुपात सुंदर साहित्य तयार केले आहेत.
 अशी माहिती दिली व अतिशय मोठ्या उत्साहाने मराठी राज भाषा दिनानिमित्त सविस्तर माहिती दिली, या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील  शिक्षीका अंजली लोहारकर, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.





No comments:

Post a Comment