Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Tuesday, July 11, 2023

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे जागर योजनेचा पालक मेळावा चे आयोजन

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ येथे जागर योजनेचा पालक मेळावा चे आयोजन*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 11/7/2023 रोजी शालेय परीपाठानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांना पुर्व सुचना देऊन जागर योजनेचा अंतर्गत पालक मेळावा साठी बोलावण्यात आले. तसेच योजनेचा जागर अंतर्गत पालक मेळावा आयोजित करण्यात आला. शासनाने विद्यार्थ्यांना देत असलेल्या विविध योजनांची माहिती विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती असावी या साठी मेळावा आयोजित करण्यात आला आहे असे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी सांगितले . तद्नंतर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला  मेळावा चे अध्यक्ष लिडर माता गीता कच्छवे, प्रमुख पाहुणे अंजली लोहारकर, पूजा बिरादार, भागाबाई बिरादार, संगीता पाटील, प्रियंका तोमर पाटील, वर्षा श्रीमंगले, मीना कांबळे, दैवशाला कांबळे व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  मेळावा चे अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शासनाच्या विविध योजनांची शिष्यवृत्ती योजना, गुणवत्ता शिष्यवृत्ती, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकातील शिष्यवृत्ती योजना, मोफत पाठ्यपुस्तक, गणवेश योजना, मध्यान्ह भोजन, सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजना अशा विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्याच्या पालकांना शाळेतील विविध योजना व शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली तसेच या या जागर योजनेचा पालक मेळावा चे महत्व पटवून सांगितले. या जागर योजनेचा मेळावा चे अतिशय सुंदर व सूरेख नियोजन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी केले. या वेळी मेळावा चे अध्यक्ष लिडर माता गीता कच्छवे, प्रमुख पाहुणे अंजली लोहारकर, पूजा बिरादार, भागाबाई बिरादार, संगीता पाटील, प्रियंका तोमर पाटील, वर्षा श्रीमंगले, मीना कांबळे, दैवशाला कांबळे व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  आदी जण उपस्थित होते. या जागर योजनेचा पालक  मेळाव्याचे सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व मेळाव्याचे प्रास्ताविक व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*





















































No comments:

Post a Comment