Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, July 12, 2023

नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकूणच प्री स्कूल ते बारावीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत. सेमिस्टर पॅटर्न, १५० विषयांची पाठ्य पुस्तके, जादुचा पेटारा आदींचा समावेश या बदलात असणार आहे



नवीन शैक्षणिक धोरणानुसार एकूणच प्री स्कूल ते बारावीपर्यंत अनेक बदल करण्यात आले आहेत.
सेमिस्टर पॅटर्न, १५० विषयांची पाठ्य पुस्तके, जादुचा पेटारा आदींचा समावेश या बदलात असणार आहे.

खासकरुन नववी ते बारावी या तीन वर्षाच्या शैक्षणिक कार्यक्रमात मोठा बदल होणार आहे.

पुढील शैक्षणिक सत्रापासून इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचा अभ्यासक्रमही पूर्णपणे बदलणार आहे. तर नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत इयत्ता तिसरी ते बारावीपर्यंतचा एकूणच आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी १५० विषयांची पाठ्यपुस्तके तयार करण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना यातूनच आपले पर्याय निवडायचे आहेत. विशेष म्हणजे अकरावी व बारावीसाठी विज्ञान, वाणिज्य व कला अशा तीनच शाखा होत्या. आता संगीत, क्रीडा, हस्तकला व व्यावसायिक शिक्षणांनाही गणीत, विज्ञान, मानव्य शाखा, भाषा, सामाजिक शास्त्र या विषयांप्रमाणे दर्जा मिळणार आहे.
नववी ते बारावीसाठी राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (नॅशनल करिक्युलम फ्रेमवर्क) तयार करण्यात आला आहे. प्री-स्कूलमध्ये मुलांना पिशव्याशिवाय शिकवले जाईल. तीन ते आठ वर्षांपर्यंतच्या मुलांना शाळेत दप्तर आणण्याची गरज नसेल. या मुलांचा जादुचा पेटारा मिळणार असून यामध्ये ५३ प्रकारचे खेळ, पोस्टर खेळणी, बोर्ड, बिल्डींग ब्लॉक, प्लेईंग कार्ड आदींचा समावेश असणार आहे. याचाच आधार घेऊन मुलांना शिकविले जाणार आहे.

थोडक्यात स्वरूप असे असणार...
सेमिस्टर पद्धतीचा अवलंब
इयत्ता नववी ते बारावीची परीक्षा आता सेमिस्टर पॅटर्नने होणार आहे. तिन्ही वर्गांमध्ये प्रत्येकी १६ विषयांची परीक्षा द्यावी लागेल. नववीचा निकाल दहावीच्या निकालात जोडला जाईल व अकरावीचा निकाल बारावीच्या निकालाशी जोडला जाणार आहे.

स्थानिक भाषेचा वापर
इयत्ता पाचवीपर्यंतचे शिक्षण स्थानिक भाषेत असणार आहे. इयत्ता तिसरीमध्ये ८ ते ११ वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जाणार असून प्रथमच त्यांचे मूल्यमापन केले जाणार आहे. पाचवीच्या वर्गात दुसऱ्यांदा मूल्यमापन होईल.

चार टप्प्यांमध्ये विभागणी
इयत्ता पहिली ते दुसरी फाऊंडेशन स्टेज, तिसरी ते पाचवी तयारी टप्पा, सहावी ते आठवी मध्यम आणि नववी ते बारावी माध्यमिक टप्पा अशी विभागणी करण्यात आली आहे. स्थानिक भाषेच्या वापराने विद्यार्थ्यांना सुरुवातीच्या दिवसांमध्ये जोडून घेणे सोपे होणार आहे.

No comments:

Post a Comment