Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, July 6, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी व चौथी गणित स्वाध्याय उपक्रम पुस्तिका वाटप

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी व चौथी गणित स्वाध्याय  उपक्रम पुस्तिका वाटप*

 *तिवटग्याळ .......‌आज दिनांक 5/07/2023 रोजी तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता तिसरी व चौथीच्या  वर्गातील  सर्व विद्यार्थ्यांना गणित अभ्यास पुस्तिका  दिले आहे तसेच  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे  सर्व विद्यार्थ्यांना व उपस्थित पालकांना सांगितले की आपल्या परीसरातील नागराळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षीका संगीता सोनाळे यांनी इयत्ता तिसरी व चौथी च्या विद्यार्थ्यांना गणित विषय अगदीच सोपा जावा, गणिताचा अधिक सरावासाठी अंक अंकात, अक्षरात, लहान, मोठा, चढता उतरताक्रम, अंकाची स्थानिक किमंत, विस्तारीत मांडणी, बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार व भौमितिक आकार या विषयावर अधिक सरावासाठी खूप उदाहरणे या पुस्तक प्रकाशित केले आहेत. हे स्वाध्याय गणित पुस्तक अत्यंत उपयुक्त आहे. निश्चित या स्वाध्याय सरावाने गणित विषय सोपा होईल. पुस्तकात तो स्वाध्याय  नियमित सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना व पालकांना पुस्तिका वाटप करण्यात आले .या वेळी शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, वर्षा श्रीमंगले,  आदी जण उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना वाटप केले.*







No comments:

Post a Comment