*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपस्थित होऊन दोन वर्षेपुर्ती निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप*
तिवटग्याळ - दिनांक 27/2/2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत परीपाठानंतर शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की तिवटग्याळ शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांना 26/2/2023 रोजी उपस्थित होऊन दोन वर्षे पूर्ण सेवा निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही व पेन वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही व पेन वाटप केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी शाळेची प्रगती, शालेय वातावरण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके , उपाध्यक्ष कैलास तवर , पालक, गावचे सरपंच प्रशांत पाटील , उपसरपंच आरती तवर, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, गजानन नरहरे, पोलीस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, मदतनीस भामाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे व ग्रामस्थांनी खुप खुप छान योगदान व सहकार्य दिले या बद्दल धन्यवाद व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment