मूल्यांची जोपासणा करणारा कर्मवीर : ज्ञानेश्वर बडगे
-------------------------------------------
गुरू असतो विश्वकल्याणी तो करीत नसतो भेदाभेद भेदभावाच्या भिंती नाकारतो.म्हणून त्यांच्याजवळ जाई जुई, केवढा रातराणी वसते.डोई कपाळी रेखलेला कुमकुम तिलक असतोच तो मुळी सूर्य...लालबुंद...अनंत रंगाच्या छटाच छटा म्हणून त्याचे कार्य पूर्वाप्रमाणे फाकत आणि पूर्व - पश्चिम दिशा लुभावत असते.त्यांचे शैक्षणिक मोगरीचा पदन्यास अमित मनोहर पाहून विद्यार्थी चाफ्यासारखे बोलतात.टपटपतात. त्यांचे शिकविणे हे अथांग विद्यार्थी मनाला भिजविणारा भिज पाऊस , घमघमणारा अतरगंध मग खरंच गुरुजी अत्तरदाणी असतात.काय ? गुरू म्हणजे विद्यार्थ्यांच्या आत्म्याची निर्लेप अनुभूती होय.आदीअंत तमाम विद्यार्थी जातीच्या व समाजाच्या अभ्युत्थानासाठी झटतो, धडपडतो तो गुरू.गुरू म्हणजे एक आत्मीय आनंदकंद अनार होय.असा अनार म्हणजेच प्रतिकूल परिस्थितीशी दोन हात करून जीवनाचे नंदनवन करणारे व विद्यार्थ्यांच्या जीवनाची विद्यारूपी बाग फुलविणारे, बहरविणारे ज्ञानेश्वर भाऊराव बडगे होत.शिक्षणापासून वंचित न ठेवणे, शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, प्रामाणिक पणाची धुपारती उजळविणे अशा अनेक उपक्रमाने शेंदूर लावलेल्या लालबुंद विराट हनुमानासारखा छंद जोपासणारे बडगे यांनी विविध रंगीबेरंगी शाळेतून शिक्षण घेवून देवून जीवनात आबादानीच आबादानी केली.विद्यार्थ्यांसाठी बडगे गुरुजी दिव्याची वात झाले व विद्यार्थ्यांसाठी , समाजासाठी काकडारती झाले. अनेक ज्ञानदानाची केंद्रे ( शाळा ) मधून विद्यार्थ्यांची कोवळी, कोमल मने आपल्या ज्ञानदानाने कार्याने पल्लवित केले आहेत. त्यानुसार त्यातूनच गुरुगंधाचा कस्तुरी कलश साक्षात कांचन तसेच धडाधडा पेटणारा भाजण सुध्दा झालेले आहेत.कठीण प्रसंग, घटना परिस्थितीची अग्निपरीक्षा देवून जीवनाचा सूर्य उगविला. त्यातून तळपत आहे. ज्ञान ते ईश्वर ,ईश्वर ते ज्ञान म्हणून नाव ठेविले.ज्ञानेश्वर याप्रमाणे त्यागमय, खडतर जीवनाचे नंदनवन म्हणजे बडगे गुरुजी.आदर्श ठरून विद्यार्थीप्रिय ठरलेले.त्यांचा उदात्त आदरभाव अभिव्यक्त करण्यासाठी उधाण वाऱ्यावर स्वार होणारे व महत्वकांक्षी विद्यार्थी घडले.त्याचबरोबर त्यातून सत्वर शिक्षणाची , ज्ञानदानाची महती गाणारे उधाण हाती लागले आणि समाजसेवेचा विद्यार्थ्यांच्या विकासाचा निर्झर ओलाव्याचे खळखळू लागले.कसर जि.परभणी, आंबा नगर जि.लातूर, संगम ता. देवणी, रावणगाव नवीन वसाहत ता. उदगीर, बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर अशा ठिकाणी गुणवत्ता विकासाची मशाल पेटविली.शाळा सजविण्याचा विडा उचलून शाळेला नववधूचे रूप प्राप्त करू लागले.त्याच नववधुसंगे संस्कार, मूल्यशिक्षण, नैतिक मूल्याची आराधना करून विद्यार्थ्यांची कूस भरवू लागले.अनेक परीक्षांचा सोहळा विद्यार्थ्यांच्या मनात घोळवू लागले व यशाचा तुरा प्राप्त झाला. कलागुणांची मांदियाळी मांडू लागले.सांस्कृतिक कार्यक्रमाची तुळस प्रत्येक शाळेच्या वृंदावनात लावले.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचा पळस फुलवू लागले.विद्यार्थ्यांना दैवत समजून ज्ञानदानाचा, सेवेचा विठोबा प्रत्येक गावच्या शाळेतील वाळवंटात उभा राहिला आणि निरीक्षण करून जिथं कमी तिथं मी या तत्वाने धावून येणारे गुरुजी म्हणून बडगे यांची ख्याती दूरवर दरवळली. शाळेचे सुशोभीकरण, आकर्षण, वृक्षारोपण, साउंड सिस्टीम यावर पकड धरून कविता गाणे, पाठ ऐकवणे , याचा सराव करून घेणे, कार्यालय, वाचनालय, प्रयोगशाळा, किचनशेड, शौचालय या सर्व बाबी सुधारणेचा मळा फुलवून दर्जेदार शिक्षणाचा ऊस वाढवला.नवोदय वर्ग,आदर्श परिपाठ, महिला मेळावा, पालकसभा, इत्यादींचा सुकाळ करून आमतरु वृक्षासम छायांकित , वलयांकित केले.प्लस पोलिओ, मतदार यादी, हागणदारी मुक्त अभियान, प्रबोधन, जलस्वराज्य प्रकल्प, सार्वजनिक जयंती अशा समाज प्रबोधनात्मक कार्याने कळस उभा करणारे बडगे गुरुजी गावातील प्रत्येकाच्या गळ्यातील ताईत बनले.एकूण कार्याचा अहवालाचे झाड उपकारक, उपदेशात्मक बेफाम दुनियेत उन्मळून पडले नाही. गुरू असतो एक आराधना विद्यार्थ्यांच्या सृष्टी भरांचे आराध्य दैवत.त्यापुढे आरसे महालही फिका पडतो.अवीट असा अव्यक्त, व्यक्त अलभ्य, प्रीती सोहळा, म्हणजे गुरू असा प्रीती, कीर्ती, मूर्ती, स्फूर्ती सोहळे करणारे एकमेव बडगे गुरुजी नामवंत ठरलेले व कार्यवंतांचे शिलेदार ठरले.मनात मत्सर नसलेले, स्थिरपणाने शिक्षणाचे धडे शिकविणारे व मूल्यांची जोपासना करणारे निर्लोभी व्यक्तिमत्त्व म्हणजे बडगे होय.यांनी कधीही आकसपणा, आकांत, आक्रंदन, ,अहंकार यांना स्पर्श केलेला नाही. यापासून अलिप्त राहून शिक्षण संक्रमणाचा प्रपात करून मूल्यशिक्षणाचा अभिषेक केले आहे. विद्यार्थ्यांच्या कपोलकल्पित कामना पूर्ण करण्यासाठी कामधेनूची कसोटीत उतरणारे बडगे गुरुजी उष:काल करून सर्वाना तिमिरातूनी तेजाकडे घेवून जाणारे व उत्तमगती प्रगती साधणारे म्हणून सुपरिचित झालेले आहेत. बडगे गुरुजी यांची चैतन्य चेतना चंद्रमा होवून अखंड सानूल्यांचा जयघोष करीत ज्ञानदान, मान, शान, ध्यान, कान, तसेच भान याची जपमाळ जपतात.त्यामुळे त्यांना अनेक संस्थांनी, संघटनांनी सन्मानित केले आहे.नवी दिल्ली चा महात्मा फुले राष्ट्रीय फेलोशिप पुरस्कार, मुंबई चा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, पूणे येथील महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गोवा येथील विश्वरत्न आंतरराष्ट्रीय पुरस्कार, जिल्हा परिषद लातूर चा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार, . ना.य.डोळे उपक्रमशील मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक, गौरव , कर्तव्य पुरस्कार, फेलोशिप, परिवर्तन पुरस्कार, गुणगौरव, मानवविकास, संत गाडगेबाबा, राष्ट्रीय गोंधळी समाज संघटना लातूर गोंधळी समाज रत्न पुरस्कार अशा विविध पुरस्कारीत ज्योतिष्यमान होवून झंकारले आहेत. त्यांच्या हरेक नजरेत गुरुत्वाचा जोगवा वसतो. त्यांचे लाघव नेत्रपल्लव झंझावात करून दार्याद्र स्वर विद्यार्थ्यांच्या , समाजच्या चराचरालापुर्णपणे चिंब करतात. म्हणून गुरुत्व म्हणजे दिगंतरीच दर्पण ठरलेला आहे. बडगे गुरुजी जवळचे गुरुत्व हे सेवाभाव जाणते.ते नुसते शालेय शिक्षकच नाहीत तर व्याधी आणि व्याधीग्रस्त विद्यार्थ्यांवर, लोकांवर शतदा उपाय करून शालीन सांत्वन करतात.सेवाभाव हाच संकल्प शुचिर्भूत ज्ञानदानाचा संकल्प, जीवनमूल्यांचा संघर्ष त्यासाठीच गुरुजी या नावानेच सतीचे वाण घेवून सात्विक सतार छेडलेली आहे आणि हाच तो सत्य संकल्प, सत्यनिष्ठा रोमारोमात भिनलेली म्हणूनच सत्वसार हे सत्वशील धावून येतात.त्यामुळे विद्यार्थी जीवन व मानवी जीवन सदाचार समीप जाते.बडगे गुरुजींच्या शिक्षण आणि समाजसेवा , शासकीय सेवेच्या बासरीच्या सुरावटीत अनोखी हाक झंकारत असते.त्यांच्या कार्याच्या ताना ऐकण्यासाठी विद्यार्थी आणि समाज कदंब वृक्षही बहरतो.विलोभनीय व्यक्तिमत्त्व आणि धन्य ती त्यांची शाळा .शाळेतील लतावेलीही अपूर्व वैभव घेवून फुलरतात.त्यांच्या स्वागतासाठी गुरुजी विद्यार्थ्यांसाठी कैवल्याचे झाड आहेत. म्हणूनच मुलांच्या उगवतीचा तारा सोनेरी स्वप्न घेवून दवडतोय.त्यांच्या शिक्षण सिंचनाने फुलारलेली सदाफुली म्हणजे पुनवेचं चांदणं तर राऊळातील धूप आरतीच आहे.त्यांच्या सांगतीला भाव विभोर रुद्रकरून संगीत आणि झपाटलेला झंकार निनादतो. त्यांच्या वाचनाचा व्यासंग रसाळ आणि प्रभावी परिणामी साकारतोय.गुरुच्या सुरातील गहिरी आर्त आणि एक पापण भरून आलेला थेंब विश्वाला श्रांतावू शकतो.ही त्यांची किमया सायास प्रयासाने निर्मिलेली विद्यार्थी दुनिया म्हणजे पहाटेचं मंगलमय दवबिंदू आणि त्यात श्रांतावलेली भूपाळी गेंदेदार फुलातील परागकणाची टपोरे सुंदर मोती.काही फुललेली, काही गुंफलेली, काही माळलेली फुलेच फुले म्हणजे गुरुजी शिक्षण, शिक्षण कार्य,समाजकार्य पुरस्कार प्राप्तीचे माहेरघर होय.वात्सल्याने प्रवाहित करणारी जीवनदायिनीच आहेत. कारण सतत विद्यार्थी आणि शाळा, माणूस आणि समाज याचे नाते दृढ करणारा अवलीयाच आहे. किशोरी मेळावा, अंधश्रध्दा निर्मूलन तसेच कोरोना काळात ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षणाची विद्यार्थ्यांना गोडी लावून त्यांना प्रवाहात आणले.ही फार मोठी कसरत गुरुजींनी खेळून विद्यार्थ्यांना मनोबल देवून झेंडूच्या फुलासम डवरविले.त्यांचे कार्य हे पारदर्शी असून त्यांच्याजवळ दुरदर्शीपणा उपक्रम, कार्यक्रमतेकडे अशा अनेक पैलूंचे साक्षीदार आहेत. त्यांची दृष्टी ही "दुरीताचे तिमिर जावो " या ओवीसम आहे. आईवडिलांनी जीवनात दृष्टीसमोर ठेवून चेतना चिंतामणीचा गाव गाठणारे बडगे गुरुजी वाटतात.बडगे गुरुजींनी घेतलेला शिक्षणाचा वसा हा समाज सुधारणावादी आणि समताधिष्टीत प्रेरणेचा स्त्रोत आहे. हाच वारसा अखंड चालू आहे. अनेक विद्यार्थी घडविले , विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी अहोरात्र झटणारा व रात्रंदिन सेवेस तत्पर पावलेला गुरुजी म्हणून सर्वाना सुपरिचित आहे." मूर्ती छोटी पण कीर्ती मोठी " याप्रमाणे कार्याचा डोंगर पार करणारे बडगे गुरुजी विद्यार्थ्यांचे नंदादीपच आहेत. कारण ते परिपाठ घेताना सुरात सूर मिसळून सुरेंद्र बनतात.अभ्यास करून घेण्यासाठी गजेंद्र बनतात.तर सर्व इंद्रियांवर नियंत्रण ठेवून संयमित स्मित हास्य फुलविणारा जितेंद्रही आहेत. अशा सर्वांगाने मोहरलेला आणि फळाफुलांनी बहरलेला एक वास्तवात जगणारा गुरुजी म्हणून अनेकांच्या गळी उतरले आहे. बडगे गुरुजी हे अनेक सुखदुःखाच्या रेशीम धाग्यांनी गुंफलेली मोहनमाळ कातळ फोडणारा झरा स्नेहाने जडवलेले मोती असे शिक्षण व उपक्रम करणारा सुखी गुरुजी होय.त्यांच्या प्रीतीचा व कार्याचा संपर्काचा मांगलिक सोहळा मुळातच देखणा असतो.स्वार्थार्थ हाकाटी देत निरक्षर ओळखण्याची अक्कल गहाण ठेवून संयम आणि सदाचाराची निती शिक्षणाच्या वेशीवर टांगून फिरणारे तरीही केवढ्याच्या सोनेरी पानासारखा दरवळणारा सदाबहार खुशबू म्हणून ते सर्वांच्या मनी ध्यानी चित्तात बस्तानात आरूढ आहेत. विद्यार्थ्यांच्या कार्यात सहभागी होवून त्यांना कार्यचेतना देवून कौतुक भरल्या शब्दाची उधळण अन त्यात सामावलेला अदाकारी सोहळा कृतीच्या आणि नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी उधाणलेला प्रवाह तसेच विद्यार्थी - विद्यार्थिनीच्या केसात माळलेली जास्वंदी फुल वाटतात.शांतीब्राह्मचा उत्कट वेध घेणारी आम्रमंजिरी अवधी उदयचलावरची उदयगिरी उत्क्रांत करणारी आशुतोष उपोषित न्यायीवृत्तीची अगम्य इच्छाशक्ती बाळगणारी अतर्क्य अनुराधा दारिद्र्यावर स्वार होऊन झुंजणारा विजकल्लोळ .अटीतटीच्या सामन्यातही अंत्योदय करणारे अंतप्रज्ञा तथा अंतप्रभा प्रज्ञाशील करुणेची कालातीन गुलाबदाणी साक्षात अनभिषिक्त अधिश्वरच वाटतात.शिस्त वेळेचे कठोर नियम पालनाची चंद्रकांत, साहून, सुलाखून निघालेले सौंदर्य शक्तीचे त्यागस्वामीच वाटतात.पुनीत प्रतिभा लाथलेली आणि प्रज्वलीत क्षमेचे याचना करणारे मृगनयनच आहेत. मृगाच्या धो धो कोसळणाऱ्या सरीसारखे शिक्षण कार्य आणि त्यातील लावण्यरूप परिवर्तन रूप पाहून वसंत ऋतूच्या आगमनाने जशी धरती फुलारते तसे त्यांचे भावविभोर आनंदकंद सामाजिक व शैक्षणिक साहित्य क्षेत्र आहे. त्यांना उदोउदो अंबाबाईचे वरदान लाभलेले दिसते.आईची सेवा हीच खरी जीवनाची संपत्ती त्यांनी कमविली आहे.देवीचे पूजक म्हणून घराणेशाही वारसा चालविणारी परंपरा मान्य करून आईच्याच पिठामिठाची चव चाखून आनंद लुटणारा हा धुरंधर कलाकार उर्जित अवस्थेची वरदवाणीचे सिंचन करणारी समृध्द सत्यनिष्ठा साधवून जीवनाचा रंग उधळणारे वाटतात. लोककलेची कदर करीत समाज प्रबोधनाचा वसा चालवीत असतात.म्हणून त्यांच्या कार्याचा चाफा फुलतो.मोगरा दरवळतो.शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी व त्यात काही सुधारणा व त्यातील क्रांती ही प्रभावीपणे राबवितात.कोरोना काळात गुरुजींनी अनेक गोरगरिबांना विविध प्रकारची मदत करून अनेकांचे जीवन नंदनवनासारखे फुलविले म्हणून त्यांना मदतीचा कोहिनुर म्हंटले जाते.त्यांच्या कार्याची मशाल ही शिक्षण, समाज आणि जीवन या क्षेत्रात विकासात्मक दृष्टी व सत्य दिव्य सृष्टीचे नायक बनले आहेत. परंपरा, रूढी व अंधश्रध्दा यावर प्रकाश टाकून त्या रूढी बंद करण्यात सरांकडून हातभार लागला आहे. विज्ञानवादी जीवनधारेचे ते पाईक असून श्रध्देचेही नाईक आहेत. त्यामुळे त्यांच्याजवळ वास्तव श्रध्दा आणि निष्ठा यांचा संगम झालेला आहे. त्या संगमातून अनिष्ठ रूढी परंपरारुपी वाळूचा उपसा करीत सद्गुणी परोपकार, निस्वार्थ , निर्मोही अशा अनेक गुणांचे जलसिंचन केले आहेत. म्हणून त्यांचा खूप मोठा जनसंपर्काचे जाळे विणले आहे. त्यांचा भावविभोर गहिरा रंग महाकारूनिक भावछटा तेजाळत्या सुस्वात रेषा , धीरोदात्त ध्येय दृष्टी म्हणजे एखाद्या पुनवेचा ईश्वरी धवलरंगी पावसासारखी आहे. पुनवेचे चांदणे, सशाचे पळणे आणि हरिणीचे घनश्याम वर्ष रंगसंगतीचे खेळ खेळणारा मनभावन खिलाडी गुरुजी वाटतो.चिरंतन सत्याचा निनाद घुमविणारा गुरुजी मातापिता प्रीतीचे महनमंगल , जलदाचा पावशा पक्षी फडफडतोय तो बडगे गुरुजी.अर्चनेचा गुलजार अशा अनेक अंगानी सरावलेला मितभाषी गुरुजी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाचे जीवनाचे सुंदर चिरकाल सुमनाने सुगंधी करण्याचे महत्कार्य करतोय.शालीन, सात्विक वत्सलतेचा आणि शिक्षणाचा वारसा चालविणारा चक्रधरच होय.ज्या ज्या गावी त्यांची चरणस्पर्श झाले त्या त्या ठिकाणी सुविचाराचा ,सद्गुणी, सत्कर्मी, सदभावना अशा विविध कलागुणांचा प्रसाद हा आनंदाने, उल्हासाने वाटलेला आहे. त्या प्रसादाने अनेकांच्या जीवनाचे सोने झालेले आहेत. म्हणून त्यांना आम्ही शिक्षण क्षेत्रातील कर्मवीर म्हणत असतो.अशा सद्गुणी, सत्कर्मी कलानुभवी ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांचा उदागिर बाबाच्या चरणस्पर्शाने पुनीत झालेल्या उदगीर भूमीत दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी भाऊराव बडगे व रंभाबाई भाऊराव बडगे या जोडप्याच्या पोटी जन्म झाला. म्हणून त्यांना जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा !
किशन दत्तात्रय उगले
शेकापूरकर
No comments:
Post a Comment