" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणारे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे - प्राचार्य व्ही. एस. कणसे यांनी लिहलेला लेख

विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणारे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे
-------------------------------------------
      प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेवून शिक्षक झालेली व्यक्ती शिक्षणाचे महत्त्व जाणून घेवून पूर्व परिस्थितीची जाण ठेवून त्यापरीचे शिक्षण विद्यार्थ्यांना देत चांगले विद्यार्थी घडवितात.गरीब परिस्थितीत शिक्षण घेवून आपल्याला आलेल्या अडीअडचणीची जाणीव ठेवून  गोरगरीब विद्यार्थ्यांना तशी अडचण न येवू देता, शिक्षणापासून वंचित राहू न देता शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, नोकरीशी प्रामाणिक राहून विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून सक्षम बनविणे असे कार्य करणारे काही मुख्याध्यापक आजही आपल्यात आढळून येतात त्यापैकीच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे हे एक होत.आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांचा थोडक्यात परिचय देणारा हा लेख...
     श्री.ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांचा जन्म दि. ६ फेब्रुवारी १९७७ रोजी उदगीर येथे एका गरीब कुटुंबात झाला.त्यांचे प्राथमिक शिक्षण विद्यावर्धिनी प्राथमिक शाळा उदगीर, माध्यमिक शिक्षण डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय उदगीर, उच्च माध्यमिक शिक्षण महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय उदगीर, त्यानंतर चार्वाक अध्यापक विद्यालय अहमदपूर येथे अध्यापन पदविका प्राप्त केली.शिक्षण संपल्यावर श्री.ज्ञानेश्वर बडगे हे जि.प.प्रा.शाळा कसर जि.परभणी येथे दि. २९ जुलै १९९७ रोजी शिक्षक म्हणून रुजू झाले.तत्पूर्वी ज्ञानेश्वर बडगे यांनी अतिशय हालाखीच्या परिस्थितीत शिक्षण घेतले.वडील भाऊराव बडगे हे गोंधळ ,भजन, कीर्तनाच्या माध्यमातून उदरनिर्वाह चालवत आपल्या मुलांना फार कष्टाने शिक्षण दिले.तीन मुले, तीन मुली घरात कमविणारा कोणीच नाही. फक्त वडिलांच्या कमाईवर काटकसरीने मुलांचे शिक्षण व्हायचे.मोठा मुलगा एम.कॉम.करून सुशिक्षित बेरोजगार राहिला.वडिलांनी ज्ञानेश्वरला डी. एड.ला प्रवेश दिला.आईवडिलांनी ज्ञानेश्वर बडगे यांच्यावर चांगले संस्कार केले. त्यामुळे मुख्याध्यापक झाल्यावर बडगे यांनी आपली गरिबीची जाण ठेवून विद्यार्थी घडवीत राहिले.दि. २९ जुलै १९९५ रोजी परभणी जिल्ह्यातील जि.प.प्रा.शा. कसर येथे नोकरी केल्यावर दि. १ ऑगस्ट १९९८ रोजी लातूर जिल्ह्यातील जि.प.प्रा.शाळा आंबा नगर येथे मुख्याध्यापक म्हणून काम केले. आंबा नगर येथील शाळेवर रुजू झाल्यानंतर श्री.बडगे सरानी अनेक उपक्रम राबवून गुणवत्ता विकासाचा धडा गिरविण्यास सुरुवात केला.नियोजनबद्ध अभ्यासक्रम भिंतीवर लिहून भिंती बोलक्या करणे, वर्ग सजावट, विद्यार्थी संस्कारीत होण्यासाठी नितीमूल्यांचे शिक्षण परिपाठातून देणे. नवोदय, शिष्यवृत्ती वर्गाचे सराव वर्ग घेवून अनेक विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक बनविले.निसर्ग शाळा, चावडीवाचन, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून वक्तृत्व, नृत्य ,गायन, क्रीडा अशा अनेक स्पर्धांचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे. अनेक उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला.येथील जि.प.शाळेवर आठ वर्षे सेवा बजावल्या नंतर श्री.ज्ञानेश्वर बडगे यांची दि. १३ जून २००६ रोजी जि.प.प्रा.शाळा संगम ता.देवणी जि.लातूर येथे बदली झाली. श्री.बडगे हे ज्या ज्या शाळेवर रुजू झाले तेथे तेथे विद्यार्थी हेच आपले दैवत मानून विद्यार्थी घडविण्याचा प्रयत्न केला. संगम येथील शाळेवर सर्व वर्गखोल्यात नियोजनबद्ध अभ्यासक्रम लिहून घेतले.आतून व बाहेरून शाळेचे आकर्षक असे सुशोभीकरण केले.प्रत्येक वर्गात साउंड सिस्टीम व साऊंडवर अभ्यासक्रमातील कविता गाणे, पाठ ऐकवणे, त्यातून विद्यार्थ्यांचा सराव करून घेणे, सर्व वर्ग खोल्यासमोर विद्यार्थ्यांसाठी चप्पल स्टँडची सोय. मुख्याध्यापकाचे आकर्षक कार्यालय, वाचनालय, प्रयोगशाळा, किचनशेड, मूळ - मुलींसाठी शौचालय, विद्यार्थी गुणवतेसाठी दर्जेदार शिक्षण, शिष्यवृत्ती, नवोदय वर्ग, आदर्श परिपाठ, सांस्कृतिक कार्यक्रम, नितीमूल्याचे शिक्षण, विविध स्पर्धा, पालक मेळावा, महिला मेळावा, पालकसभा इत्यादी उपक्रम राबवून१००%निकाल , सर्वशिक्षा अभियानातील सर्व उपक्रम उत्कृष्टपणे राबविले.प्लस पोलिओ, मतदार यादी, हागनदरीमुक्त अभियान प्रबोधन, जलस्वराज्य प्रकल्प प्रबोधन, सार्वजनिक जयंती उत्सवात सहभाग अशा कार्यक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला. त्यानंतर त्यांची  उदगीर तालुक्यातील रावणगाव जि.प.शाळेवर बदली झाली. तेथे अनेक वर्षे सेवा बजावल्यानंतर त्यांची शिरूर अनंतपाळ तालुक्यातील वायगाव येथील शाळेवर बदली झाली. त्यानंतर उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ जि.प.शाळेवर बदली झाली. तेथे सध्या मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत. माणूस कार्य करीत राहिला की, त्याची कुणी ना कुणी नोंद घेत असते.त्यामुळे बडगे सरांच्या एकूणच कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक संस्था ,संघटनांनी सन्मानित केले. डॉ. ना.य.डोळे स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार, उपक्रमशील मुख्याध्यापक म्हणून माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते सत्कार, जिल्हा पोलीसप्रमुख बी.जी. गायकर यांच्या हस्ते सन्मान, गोंधळी समाजाच्या वतीने भगवानसिंह बायस गुरुजींच्या हस्ते सन्मान, असे अनेक सन्मान त्यांना प्राप्त झाले आहेत. आपल्या मनमिळावू स्वभावामुळे विद्यार्थी व पालकांत श्री.बडगे यांची चांगली ओळख आहे. त्यांच्या प्रत्येक कार्यात त्यांच्या पत्नी सौ आशा बडगे यांचे त्यांना शैक्षणिक कार्यात वेळोवेळी सहकार्य मिळते.त्या शिक्षिका आहेत. जीवनात आईवडीलाना आदर्श मानणाऱ्या श्री. ज्ञानेश्वर बडगे यांना भविष्यात सक्षम विद्यार्थी घडवायची आहेgत. त्यांचा आज वाढदिवस त्यानिमित्ताने त्यांना शुभेच्छा देऊया!

     रो.व्यंकटराव कणसे
     सचिव
     रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंट्रल

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...