" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

परशुराम जयंती च्या हार्दिक शुभेच्छा



“गोंधळी” समाजाचे प्रणेते श्री परशुराम ........... भावांनो नमस्कार, महाराष्ट्रातील बहुतांश कुळांचा कुळधर्म व कुळाचार म्हणजे “गोंधळ” होय. “गोंधळ” व “गोंधळी” या शब्दांचा अर्थ मराठी विश्वकोशामध्ये असा सांगितला आहे की, घरातील मंगलकार्य निर्विघ्नपणे पार पाडल्याबददल, देवीची स्तुती व पूजा करुन, कृतज्ञतापुर्वक केलेला स्तवन विधी म्हणजे “गोंधळ” होय आणि हा विधी पार पाडण्याचे काम करणारी धार्मिक जात म्हणजे “गोंधळी” होय. शिवाय हे सांगण्याची आवश्यता नाही की, प्रखर हिंदुस्तवाचा केवळ अभिमान बाळगणारीच नव्हे तर हिंदुत्वाचा ख-या अर्थाने प्रचार व प्रसार करणारी जात म्हणजे “गोंधळी” होय. हिंदु धर्मामध्ये ज्याप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, यज्ञ, अंत्यविधी, व तत्संबंधीत इतर विधी इत्यांदीची पूजा ब्राम्हण पार पाडतात त्याचप्रमाणे लग्न, मुंज, गृहपूजा, इत्यादी प्रसंगी गोंधळाचा व देवीच्या इतर पूजनाचा विधी “गोंधळी” पार पाडतात. गोंधळाचा विधी केवळ महाराष्ट्रातच होत नाही तर महाराष्ट्रसह कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, बिहार, छत्तीसगढ, झारखंड, हरियाणा व दिल्ली अशा अनेक राज्यांमध्ये भक्तीभावे होतो. म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” हे शब्द बहुश्रुत व व्यापक आहेत. गोंधळाच्या पावित्र्याची जपणुक व गोंधळी यांना दिला जाणारा मान सन्मान तसेच केला जाणारा आदर हा पुर्वापार चालत आला आहे. *जमदग्नी ऋषी व रेणूकामाता यांच्यापासून गोंधळाची उत्पत्ती झाली असे आपली वयस्क मंडळी सांगतात.* रेणुकापुराण व रेणुकामहात्म्य यांतही याचा संदर्भ आढळतो. इ.स.पुर्व २५५० ते इ.स.पुर्व २३५० हा “भगवान परशुराम काळ” मानला जातो. त्रेता युगात श्री विष्णुंचे सहावे अवतार म्हणून भगवान परशुराम होवून गेले. हा काळ म्हणजे “गोंधळ” व “गोंधळी” उगमाचा काळ. आज रोजी महाराष्ट्रारात “गोंधळी” ही जात भटक्या जमाती(ब) या प्रवर्गात अ.क्र.१० वर आहे. वास्तविक पहाता *शिवछत्रपतींच्या स्वराज्य निर्मितीच्या पवित्र कार्यात हिरीरीने सहभागी होवून हेरगिरी करुन स्वराज निर्माणास हातभार लावणारी गोंधळी जात राजेंची लाडकी होती.* याचमुळे राजेंनी त्या काळात गोंधळी समाजाला गावोगावी वतने व जहागी-या दिल्या होत्या. आजही गोंधळी बांधव शिवछत्रपतींचा इतिहास व्यासपिठावर शाहिरीबाण्यात गर्वाने प्रतिपादीत करतात. लोककला व लोकवाड. “गोंधळी” ही जात अठरा बलुतेदारांपैकी एक जात. शिवाय “गोंधळ” हा विधी पार पाडणारे व गोंधळकला सादर करुन उपजिविका भागविणारे इतर जातीचे "व्यावसायिक गोंधळी" देखील आज पहायला मिळतात. श्री बाळासाहेब सिताराम धुमाळ. bsayush7@gmail.com

No comments:

Post a Comment