Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 14, 2023

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने कोटी कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन

*डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने कोटी कोटी प्रणाम, विनम्र अभिवादन*

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशमध्ये 14 एप्रिल 1891 मध्ये झाला.  त्यांचे वडील भारतीय सैन्यात सुभेदार होते आणि त्यांची पोस्टिंग इंदूरजवळील महू येथे होती, जिथे आंबेडकरांचा जन्म झाला. 1894 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंब महाराष्ट्रातील सातारा येथे स्थलांतरित झाले. काही दिवसांनंतर त्यांच्या आईचे निधन झाले, त्यानंतर त्यांच्या वडिलांनी दुसरे लग्न केले आणि ते मुंबईला गेले. त्यानंतर आंबेडकरांचे शिक्षण मुंबईत झाले, 1906 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी त्यांचा विवाह 9 वर्षांच्या रमाबाईशी झाला. त्यानंतर 1908 मध्ये त्यांनी 12वीची परीक्षा दिली. आंबेडकरांनी लहानपणापासून अस्पृश्यता पाहिली होती ज्यांना खालच्या दर्जाचे लोक समजले जात होते आणि उच्च जातीचे लोक त्यांना स्पर्श करणे पाप मानत. त्यामुळे आंबेडकरांना समाजात अनेक ठिकाणी भेदभावाला सामोरे जावे लागले. या भेदभावाला आणि अपमानाला बळी पडलेल्या आंबेडकरांना ते ज्या आर्मी स्कूलमध्ये शिकायचे, तिथे त्यांच्या जातीतील मुलांना वर्गात बसू दिले जात नव्हते.  अशा परिस्थितीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थिती मध्ये शिक्षण पुर्ण करुन विविध पदव्या मिळवल्यानंतर ते भारतीय न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले. ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री, भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतीय बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना 'आधुनिक भारताचे शिल्पकार' किंवा 'आधुनिक भारताचे निर्माते' असेही म्हणतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी. पदव्या मिळविल्या; तसेच त्यांनी कायदा, अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि वकील होते. त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले. इ.स. १९५६ मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले.५ डिसेंबर १९५६ च्या रात्री बाबासाहेबांनी त्यांचा शेवटचा ग्रंथ ‘बुद्ध आणि त्यांचा धम्म’ या ग्रंथाच्या प्रास्ताविक आणि परिचयाच्या दोन प्रकरणांच्या प्रती आणून त्याची तपासणी केली. दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे ६ डिसेंबर १९५६ साली दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी डॉ. बाबासाहेबांचे निधन झाले. त्यावेळी बाबासाहेबांचे वय ६४ वर्षांचे होते. महापरिनिर्वाणानंतर त्यांचे पार्थिव मुंबईत अनुयायींच्या दर्शनासाठी आणण्यात आले होते. त्यांच्यावर बौध धर्माप्रमाणेच अंत्यसंस्कार करण्यात आले होते.डॉ. बाबासाहेब आंबेडकक यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या कालवधीत देशाच्या निरनिराळ्या क्षेत्रात अनमोल असं योगदान दिले.आंबेडकर जयंती निमित्त आजही देशभरात सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येते. इ.स. १९९० मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात केला. त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो. इ.स. २०१२ मध्ये, "द ग्रेटेस्ट इंडियन" नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची 'सर्वश्रेष्ठ भारतीय' म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत. अशा या महा मानवाला कोटी कोटी प्रणाम. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.
➖➖➖➖➖➖➖➖➖
*मुख्याध्यापक*
*श्री ज्ञानेश्वर बडगे*
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर*
➖➖➖➖➖➖➖➖➖


No comments:

Post a Comment