Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Friday, April 14, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी*

  *तिवटग्याळ - आज दिनांक 14/4/2023 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 14 एप्रिल 2023 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, पालक व इतर शिक्षकांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेतील शिक्षीका  अंजली लोहारकर, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली  लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, शाळेचे पालक आदी जण उपस्थित होते*











































No comments:

Post a Comment