Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, April 12, 2023

तिवटग्याळ जिल्हा प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन उत्साहाने साजरा

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वयं शासन दिन उत्साहाने साजरा*

*तिवटग्याळ .........आज दिनांक 12/4/2023 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन उत्साहाने साजरा करण्यात आला. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक ते शिक्षक या पदाविषयी लिखीत स्वरुपात त्यांचे कार्य लिहून देण्यात आले. या प्रमाणे कु प्राची प्रभाकर पाटील - मुख्याध्यापक, लक्ष्मी नवनाथ कच्छवे - शिक्षीका, समिक्षा दयानंद नरहरे - शिक्षिका,सुमीत मधूकर पाटील - शिक्षक,आदीत शिवकुमार आरकिले - शिक्षक, मानसिंग दयानंद तवर पाटील - शिक्षक, सोमनाथ भागवत कांबळे - शिक्षक, सोहम राजकुमार कांबळे - शिक्षक या विद्यार्थ्यांना त्यांच्या पदा विषयी सविस्तर लेखी स्वरूपात लिहून देण्यात आले. या प्रमाणे विद्यार्थ्यांनी दिलेल्या तासीका प्रमाणे विद्यार्थ्यांना आनंदी, उत्साहाने अध्यापन केले. विद्यार्थ्यांना खूप आनंद तसेच मज्जा आली असे बोलून दाखविले. तद्नंतर इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांनी स्वंयशासन दिन सहभागी विद्यार्थ्यांनी शाळेस स्वच्छतेचे समाजसुधारक संत गाडगेबाबा यांची प्रतिमा भेट दिली. शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय  सुंदर स्वंयशासन दिन साजरा केला बद्दल अभिनंदन केले व पुढील शैक्षणिक वर्षासाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थीनीं मुख्याध्यापक कु. प्राची प्रभाकर पाटील व आभारप्रदर्शन आदीत्य शिवकुमार आरकिले  यांनी मानले.या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर,अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस  भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले आदी जण उपस्थित होते.*





























































































No comments:

Post a Comment