वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड श्रेणी प्रसिद्ध संदर्भात शिक्षण अधिकारी माध्यमिक नागपूर यांनी दिनांक 19 मे 2023 रोजी निर्गमित केलेल्या पत्रामुळे थोडासा संभ्रम निर्माण झालेला आहे.सदर पत्रात महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या 2021 मधील परिपत्रकाचा संदर्भ देऊन सदर पत्र माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक नागपूर यांनी निर्गमित केले आहे.सदर परिपत्रकानुसार या अगोदर प्रशिक्षण पूर्ण झालेली आहेत. परंतु यावर्षीच्या प्रशिक्षणा संदर्भात अद्याप विद्या परिषदेने कोणत्याही सूचना निर्गमित केलेल्या नाही. फक्त एका परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आली आहे की या आठवड्यात नोंदणी प्रक्रिया सुरू होईल.नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू झालेली नाही.2023 मधील वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणी प्रशिक्षण बाबत महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने अद्याप कोणतीही यावर्षीची नोंदणी प्रक्रिया सुरू झाल्याबाबत अधिकृत असे पत्र निर्गमित केलेले नाही.जर महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने परिपत्रक निर्गमित केले तर आपल्याला आपल्या ब्लॉगच्या माध्यमातून लगेच सुचित करण्यात येईल.
Download here to click
⬇️⬇️
No comments:
Post a Comment