HSC and SSC Results 2023 Update
या दिवशी जाहीर होणार इयत्ता दहावी व बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल!
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्चमध्ये दहावी आणि बारावीची परीक्षा घेण्यात आली होती. आता या परीक्षेचा निकाल कधी लागणार यासंदर्भात उत्सुकता विद्यार्थ्यांना व पालकांना लागली आहे. कारण नुकतेच सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाचे दहावी, बारावीचे निकाल जाहीर झाले असून आता सर्वांना महाराष्ट्र बोर्डाच्या निकालाची प्रतिक्षा आहे. परंतु आता लवकरच दहावी-बारावीच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांची प्रतिक्षा संपणार आहे. कारण या परीक्षेचा निकाल कधी लागणार? याचे संकेत खुद्द अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि (HSC SSC Results 2023) उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांच्या निकालाची तारीख या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता असून इयत्ता बारावीचा निकाल येत्या 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, दुसरीकडे जूनच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर र्बोर्डाकडून निकालाची सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे.दहावी आणि बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या या अधिकृत वेबसाईटवर पाहाता येणार आहे.
खालील दिलेल्या वेबसाईटला निकाल पहा
⬇️⬇️
➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment