Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, December 4, 2023

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत द्वितीय सत्र शाळा शुभारंभ निमित्ताने प्रभात फेरी चे आयोजन तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत द्वितीय सत्र शाळा शुभारंभ निमित्ताने प्रभात फेरी चे आयोजन तसेच महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी*















































*उदगीर ...... तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  आज दिनांक 28/11 /2023 रोजी द्वितीय सत्र शाळा शुभारंभ निमित्ताने प्रभात फेरी चे आयोजन करण्यात आले. शाळेतील सर्व विद्यार्थी व शिक्षक तसेच पालकांना घेऊन दोर टु दोर भेट देऊन प्रभात फेरीत  विविध शैक्षणिक घोषणा देत गावात काढण्यात आली.तद्नंतर शाळेच्या परीपाठानंतर  पर्यवेक्षीय अधिकारी साधन व्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे ,  शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व अन्य जणांच्या उपस्थितीत विविध मान्यवरांच्या महात्मा ज्योतिबा फुले फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. विषय तज्ञ मा. डॉ ज्ञानोबा मुंढे ,  शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक भाग क्रमांक - 3 वाटप करण्यात आले. तद्नंतर  या  द्वितीय सत्राच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षात येण्यासाठी हार्दिक देण्यात आल्या. उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना व पालकांना शैक्षणिक वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व शाळेतील शैक्षणिक उपक्रमांचा तसेच इयत्ता निहाय अभ्यासक्रमाचा आढावा विषयतज्ज्ञ डॉ ज्ञानोबा मुंढे यांनी घेतला. शैक्षणिक प्रगती पाहून घेऊन समाधान व्यक्त केले. उपस्थित सर्वांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी विषय तज्ञ डॉ ज्ञानोबा मुंढे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर,  अंगणवाडी कार्यकर्ती  पूजा बिरादार, मदतनीस भागाबाई बिरादार व शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, सुत्रसंचलन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

No comments:

Post a Comment