Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, February 28, 2024

तिवटग्याळ येथे स्विप अंतर्गत मतदान जनजागृती रॅली आयोजित

*तिवटग्याळ येथे स्विप अंतर्गत मतदान जनजागृती रॅली आयोजित*

*आज तिवटग्याळ येथे स्विप कार्यक्रमांतर्गत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅली मध्ये शाळेतील सर्व विद्यार्थी, सरपंच मा. प्रशांत पाटील, कैलास तवर, जयसिंग पाटील, गणपत कांबळे, तलाठी बाळासाहेब कांबळे, शाळेचे BLO तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, कोंडाई इंग्लिश स्कूल चे मुख्याध्यापक गंगाराम पाटील आदी जण उपस्थित होते. या रॅलीत विविध मतदान जनजागृती करण्यासाठी घोषणा देत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो अशा इतर घोषणा देत मतदान जनजागृती रॅली काढण्यात आली. BLO तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मतदानाचे महत्त्व तसेच सविस्तर माहिती दिली. तसेच मतदार यादी चे वाचन करण्यात आले यावेळी सरपंच प्रशांत पाटील, कैलास तवर, जयसिंग पाटील, तलाठी बाळासाहेब कांबळे, गणपत कांबळे, गंगाराम पाटील,BLO तथा मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, गावातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते*




















तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 फेब्रुवारी 2024 उपस्थित होऊन तीन वर्षेपुर्ती निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 26 फेब्रुवारी 2024 उपस्थित होऊन तीन वर्षेपुर्ती निमित्ताने शैक्षणिक साहित्य वाटप*

*तिवटग्याळ - दिनांक 27/2/2024 रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत  परीपाठानंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आम्हा दोघांना 26/2/2024 रोजी उपस्थित होऊन तीन वर्षे पूर्ण सेवा निमित्ताने आज शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही रजिस्टर वाटप करण्यात येणार आहे असे सांगितले व उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वही रजिस्टर वाटप केले. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी शाळेची प्रगती, शालेय वातावरण, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके , उपाध्यक्ष कैलास तवर , पालक, गावचे सरपंच प्रशांत पाटील , उपसरपंच आरती तवर, माजी सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, गजानन नरहरे, पोलीस पाटील धनराज पाटील, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष देविदास पाटील,  प्रतिष्ठित नागरिक दिनेश पाटील, अंगणवाडी कार्यकर्ती   पूजा बिरादार, मदतनीस  भामाबाई बिरादार, आशा कार्यकर्ती श्रीदेवी कोरे गावातील इतर शिक्षण प्रेमी ग्रामस्थांनी खुप खुप छान अतिशय महत्त्वाचे योगदान व सहकार्य दिले या बद्दल धन्यवाद व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शा. पो. आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते*














Saturday, February 24, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातील कविता व गीते म्हणण्याचा या उपक्रमातून शिक्षण

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत"शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातील कविता व गीते म्हणण्याचा" या उपक्रमातून शिक्षण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 24/2/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी आज शनिवार निमित्ताने" शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातील कविता व गीते म्हणण्याचा" या  उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी हा उपक्रम समजावून सांगितले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमांची सविस्तर माहिती समजावून सांगितली. अशा रीतीने सर्व विद्यार्थ्यांचा सहभागी घेऊन."शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातील कविता व गीते म्हणण्याचा" हा शैक्षणिक खेळ घेतला. अशा पध्दतीने शैक्षणिक खेळाच्या माध्यामतून  मनोरंजनातून विद्यार्थांचा अभ्यासक्रमातील सर्व कविता व गीते यांचा सराव करुन घेतला. या उपक्रमांत शाळेतील सर्व विद्यार्थांना सहभागी करुन घेतले. शाळेतील सर्व विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर  सर्व विद्यार्थी सहभागी झाले*











Friday, February 23, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी*


        *तिवटग्याळ - आज दिनांक 23/2/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर  येथे 23 फेब्रुवारी 2024 रोजी संत गाडगेबाबा यांच्या जयंतीनिमित्त  त्यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, अंगणवाडी मदतनीस भागाबाई बिरादार आदी जणांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी संत गाडगेबाबा यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती सांगितली.   या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर, शाळेतील शिक्षिका  अंजली लोहारकर, अंगणवाडी मदतनीस बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार, शाळेतील विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते*

































Monday, February 19, 2024

शिवजयंती निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची शिवजयंती रॅली

*शिवजयंती निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची शिवजयंती रॅली*


*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 19/2/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त  सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. शाळेतील सर्व विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज व मॉ जीजाऊ यांच्या वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जीजाऊ व मावळे यांच्या वेशभूषेतील लहान मुले, बालशिवाजी पाळणा मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गजर', अशा शिवमय वातावरणात तिवटग्याळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा बाल शिवाजी पाळणा सोहळा रंगला. माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे वेशभूषा केलेले विद्यार्थी शिवजयंती रॅली सोहळयात आकर्षण ठरले.  तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, मॉ जीजाऊ व मावळे पोशाख परिधान केले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर बालशिवाजी पाळणा सोहळा आयोजित केला.  तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वाजत गाजत बालशिवाजी पाळणा व पोवाडा म्हणत गावातील सर्व ठिकाणी मुख्य रस्त्याने शिव जयंती रॅली सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थित तिवटग्याळ गावातील शिव भक्तानी भक्तांनी बालशिवाजी पाळणा व पोवाडा सादर केली. या शिवजयंती सोहळा ला शाळेचे मुख्याध्यापक  ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर आदी जणांनी विद्यार्थ्यांना शिवजयंती सोहळास मार्गदर्शन केले. अतिशय सुंदर व देखणा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बद्दल उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*