*शिवजयंती निमित्ताने तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालचमूची शिवजयंती रॅली*
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 19/2/2024 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर यांनी पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली. शाळेतील सर्व विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराज व मॉ जीजाऊ यांच्या वेशभूषेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तद्नंतर शाळेतील विद्यार्थ्यांना घेऊन छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रमाता जीजाऊ व मावळे यांच्या वेशभूषेतील लहान मुले, बालशिवाजी पाळणा मिरवणूक आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गजर', अशा शिवमय वातावरणात तिवटग्याळ गावातील शाळेत विद्यार्थ्यांचा बाल शिवाजी पाळणा सोहळा रंगला. माॅ जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व मावळे वेशभूषा केलेले विद्यार्थी शिवजयंती रॅली सोहळयात आकर्षण ठरले. तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, मॉ जीजाऊ व मावळे पोशाख परिधान केले होते. सकाळी शाळेच्या मैदानावर बालशिवाजी पाळणा सोहळा आयोजित केला. तद्नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन वाजत गाजत बालशिवाजी पाळणा व पोवाडा म्हणत गावातील सर्व ठिकाणी मुख्य रस्त्याने शिव जयंती रॅली सोहळा आयोजित करण्यात आला. उपस्थित तिवटग्याळ गावातील शिव भक्तानी भक्तांनी बालशिवाजी पाळणा व पोवाडा सादर केली. या शिवजयंती सोहळा ला शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर आदी जणांनी विद्यार्थ्यांना शिवजयंती सोहळास मार्गदर्शन केले. अतिशय सुंदर व देखणा शिवजयंती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला बद्दल उपस्थित सर्वांचेच आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*
No comments:
Post a Comment