Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 29, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र यांचा परीक्षा पे चर्चा 2024 विद्यार्थ्यांना दुरदर्शन कार्यक्रम आयोजित

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र यांचा परीक्षा पे चर्चा 2024 विद्यार्थ्यांना दुरदर्शन कार्यक्रम आयोजित*

*तिवटग्याळ - भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी परीक्षा काळात विद्यार्थ्यांना तणाव येऊ नये म्हणून तणावपूर्ण वातावरणात परीक्षा कशी द्यायची या निमित्ताने आज देशभरातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या कार्यक्रम दाखविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना शालेय परीपाठानंतर ठिक अकरा वाजता हा परीक्षा पे चर्चा 2024 विद्यार्थी - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद कार्यक्रम आहे असे सांगितले व हा live कार्यक्रम दुरदर्शनवर इयत्ता पहिली ते चौथी च्या सर्व विद्यार्थ्यांना दाखविण्यात आले. आगामी बोर्डाच्या परीक्षा ध्यानात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील विद्यार्थ्यांशी परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातून संवाद साधला. यंदाचा परीक्षा पे चर्चा कार्यक्रमाच 7 वे वर्ष आहे.परीक्षा पे चर्चा कार्यक्रम 2024 साठी एकूण 26,31,698 रजिस्ट्रेशन प्राप्त झाले होते. यात निवडलेल्या 4000 विद्यार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत संवाद साधण्याची संधी मिळाली. या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी पीएम मोदींना अनेक प्रश्न विचारले. यावेळी पीएम मोदींनी फक्त विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरच दिली नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या मनात जे भय आहे, ते दूर करण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांशी चर्चा करताना दिल्लीचा विद्यार्थी मोहम्मद अर्शने पीएम मोदींना एक प्रश्न विचारला. परीक्षेचा तणाव कमी करण्यासाठी सल्ला मागितला. त्याला उत्तर देताना पीएम मोदींनी टीचर्स आणि पालकांवरील दबाव कमी करण्याचा सल्ला दिला.स्वत:वर विचार करा : पंतप्रधानांना एका विद्यार्थ्याने शाळेतील वाढत्या स्पर्धेबद्दल प्रश्न विचारला. त्यावर पीएम मोदी म्हणाले की, तुमच्या वर्गातील विद्यार्थी 100 पैकी 90 गुण मिळवत असेल, तर त्याच्याशी स्पर्धा करण्याची आवश्यकता नाही. तुम्ही स्वत:च्या क्षमतेचा विचार करा. आपल स्कील वाढवून जास्त गुण मिळवण्याचा प्रयत्न करा. स्ट्रेस कमी करण्याचा मंत्र : परीक्षा पे चर्चा कार्यक्रमात अनेक विद्यार्थी सहभागी झाले. बोर्ड परीक्षेबाबत विद्यार्थ्यांच्या मनातील भिती दूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला.AI वर चर्चा- पंतप्रधान मोदींनी या कार्यक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजेंसबद्दल चर्चा केली. नवीन टेक्नोलॉजी आत्मसात करण्याचा सल्ला दिला. AI Tools चा खूप सावध राहून अभ्यास करण्याचा सल्ला दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परीक्षा पे चर्चा 2024 या कार्यक्रमादरम्यान हिंदी भाषेत विद्यार्थ्यांना कैसे झेलें परीक्षा का प्रेशर, दूसरों से कंपटीशन नहीं प्रेरणा लीजिए', एग्जाम हॉल में पेपर मिलने से पहले क्या करना चाहिए, बच्चों का तनाव दूर करने के लिए शिक्षकों को क्या करना चाहिए?पढ़ने के साथ-साथ लिखने की प्रैक्टिस जरूर करें',कुछ मां-बाप अपने बच्चों के रिपोर्ट कार्ड को अपना विजिटिंग कार्ड बना लेते हैं: मोदी, पढ़ाई के साथ अच्छी सेहत जरूरी', माता-पिता और बच्चों के बीच भरोसा होना जरूरी', देखिए, एग्जाम प्रेशर से निपटने के लिए मोदी ने जब बच्चों को दिया 'ठंड' वाला टिप्स, मुझे नहीं लगता कोई उलझन है... करियर च्वाइस के सवाल पर क्या बोले PM, ममी-पापा की टोका टोकी पीएम मोदी ने क्या कह दिया?,मोबाइल का पासवर्ड घर में सबको पता हो तो., जब पीएम मोदी ने बच्चों को बताए रील्स देखने के नुकसान, PM के रूप में आप कैसे झेलते हैं प्रेशर अशा विविध प्रकारच्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी दिली. हा कार्यक्रम शाळेतील सर्व विद्यार्थी, शिक्षक व मुख्याध्यापक यांनी पाहिली व ऐकली.*













No comments:

Post a Comment