" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक जल दिन साजरा. उदगीर वार्ता......... रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आज २२ मार्च 2019 रोजी 'जागतिक जल दिन' असल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक जल दिन असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक जल प्रतिज्ञा घ्यावयाची आहे व पाण्याचे महत्त्व समजून घ्यावयाचे आहे असे सांगितले. या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा सामुदायिक घेण्यात आली. आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असून, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन… मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन. पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन. पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन. जल प्रतिज्ञा नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका सुनिता पोलावार यांनी पाण्याचे महत्त्व या विषयावर सविस्तर माहिती दिली. पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बदती ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा 'जागतिक जल दिन' म्हणून निश्चित करण्यावत आला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा 'जागतिक जल दिन' म्हणूनही साजरा करण्या त आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रियो डि जेनेरियो'मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरुकता करणे हा प्रमुख उद्देश या मागे आहे. पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. पाणी टंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे तसेच माणसाच्या आत्म्याला लागणारी तहान भागवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल! नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.जगातील ८० पेक्षा कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्याप मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल. कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने जागतिक जल दिनानिमित्त दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे. २०२५ पर्यंत जगातील एक तृतिअंश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत जागतिक जल दिन साजरा.


उदगीर वार्ता.........  रावणगाव नविन वसाहत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत

आज २२ मार्च 2019 रोजी 'जागतिक जल दिन' असल्याने शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी परीपाठा नंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना सांगितले की आज जागतिक जल दिन असल्याने सर्व विद्यार्थ्यांनी सामुदायिक जल प्रतिज्ञा घ्यावयाची आहे व पाण्याचे महत्त्व समजून घ्यावयाचे आहे असे सांगितले. या प्रमाणे सर्व विद्यार्थ्यांना जल प्रतिज्ञा सामुदायिक घेण्यात आली.

आज मी प्रतिज्ञा करतो की, पाणी हे जीवन असून, त्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करेन…

मी पाण्याचा अपव्यय व गैरवापर करणार नाही, नैसर्गिक प्रवाह, जलाशय, कालवे व पाणी पुरवठ्याच्या पायाभूत सुविधांचे मी रक्षण करेन.

पाण्याविषयीचे कायदे व नियमांचे मी काटेकोरपणे पालन करेन.

पाण्याचे संवर्धन व जतन करण्याचा मी प्रयत्न करेन. पाण्याची स्वच्छता व पावित्र्य जपणे ही माझी सामाजिक बांधिलकी मानून त्याचे सदैव पालन करेन. जल प्रतिज्ञा नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका सुनिता पोलावार यांनी पाण्याचे महत्त्व या विषयावर सविस्तर माहिती दिली.

पाण्याचे महत्त्व अनन्य साधारण असून पाणी बदती ही काळाची गरज होऊन बसली आहे. यामुळेच पाण्याच्या बचतीबाबत जागरुकता निर्माण करण्यासाठी संयुक्त राष्ट्राने १९९२ मध्ये झालेल्या अधिवेशनात २२ मार्च हा 'जागतिक जल दिन' म्हणून निश्चित करण्यावत आला. त्यानंतर २२ मार्च १९९३ रोजी पहिल्यांदा 'जागतिक जल दिन' म्हणूनही साजरा करण्या त आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रियो डि जेनेरियो'मध्ये या दिवसाची सुरुवात झाली. पाणी बचतीबाबत जगभरात जागरुकता करणे हा प्रमुख उद्देश या मागे आहे. पृथ्वीवर तीन भाग पाणी आणि एक भाग जमीन आहे. परंतु, असे असतानाही पिण्यायोग्य पाणी अल्प प्रमाणात आहे. पाणी टंचाई दिवसेंदिवस भीषण होणार आहे. पाणी ही तर सर्व सजीवांची मूलभूत गरज आहे. पण इतर सजीवांत आणि मानवात मोठा फरक हा की, मानव पाण्याचा अपव्यय करतो, गरजेपेक्षा जास्त पाणी वापरतो. माणसाला चांगला निवारा नसला तरी तो कसाबसा जगू शकतो. अन्नाशिवाय तो काही दिवस काढू शकतो. पाण्याविना मात्र तो फार वेळ टिकाव धरू शकत नाही. जसे माणसाच्या शरीराला पाणी मिळणे आवश्यक आहे तसेच माणसाच्या आत्म्याला लागणारी तहान भागवणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पाणी हे जीवन आहे, असे जे म्हटले जाते ते किती खरे आहे! परमेश्वर मानवासाठी जी नवीन सृष्टी निर्माण करणार आहे, तिचे एक ओझरते वर्णन पवित्र शास्त्रात आढळते. त्यात लिहिले आहे की, तिच्या मध्यभागातून स्फटिकासारखी निर्मळ अशी नदी असेल आणि तिच्यातून जीवनाचे पाणी वाहत असेल!

नाही तर पाण्यासाठीच होईल तिसरे जागतिक महायुद्ध.जगातील ८० पेक्षा कोटी लोक असे आहेत, की त्यांना पिण्याजोगे पाणी मिळत नाही. मानवाला जगण्यासाठी लागणार्याप मुलभूत गरजांमध्ये पाण्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. भविष्यात पाणी टंचाईची समस्या आणखी गंभीर होईल. कदाचित पाण्यासाठीच तिसरे जागतिक महायुद्ध होईल, असा इशाराही संयुक्त राष्ट्राने जागतिक जल दिनानिमित्त दिलेल्या अहवालद्वारे दिला आहे.

२०२५ पर्यंत जगातील एक तृतिअंश देशात पाणी पेटणार असल्याचे संकेत शास्त्रज्ञांनी दिले आहेत. आशिया खंडाबाबत सांगायचे झाले तर भारतात पाणी टंचाई मोठ्या प्रमाणात आहे. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शिक्षिका सुनिता पोलावार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अकबर पटेल, उपाध्यक्ष मष्णाजी गायकवाड, कलावती मेहत्रे, शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान

*तिवटग्याळ जिल्हा परिषद शाळेत गुरुपौर्णिमा निमित्ताने विद्यार्थ्यांनी केला गुरू चा सन्मान* -------------------------------------  *तिवटग्याळ...