Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, September 30, 2023

आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड कार्यक्रम संपन्न






























आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड कार्यक्रम संपन्न*

*लातूर - महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती तर्फे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणरत्न अवार्ड  कार्यक्रम दिनांक 23 सप्टेंबर 2023 रोजी पत्रकार भवनात संपन्न झाला.सन्मान गुरुजनांचा, सन्मान सर्वोच्च पदवी प्राप्त पीएच डी धारकांचा  लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकविणाऱ्या उपक्रमशील होतकरू व आदर्श विद्यार्थी घडवणाऱ्या तसेच त्यांच्या सेवाकाळात सेवा कर्तव्याबरोबरच आपल्या ज्ञानाची कक्षा रुंदावण्यासाठी शिक्षणाचा ध्यास घेऊन पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन आपली शैक्षणिक पात्रता वाढवून शिक्षण क्षेत्रातील पीएच.डी. ही सर्वोच्च पदवी संपादन करणाऱ्या शिक्षकांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिक्षणरत्न अवार्ड  2023 विविध मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ, सन्मानपत्र व गौरव चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष श्री शिवाजीराव साखरे (वाघ),थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी डीन, तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच विचारशलाका या त्रेमासिकाचे संपादक मा.डॉ. नागोराव कुंभार,सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार व साहित्यिक मा. भारत सातपुते, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्यउपाध्यक्ष श्री. चंदू अण्णा घोडके, लातूर जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर, सरचिटणीस मा. बालाजी गारमपल्ले, कार्याध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बडगे, कोषाध्यक्ष मा. साईनाथ तोटावाड, उपाध्यक्ष  शिवलिंग मार्गपवार आदी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मुर्ती सन्मानित करण्यात आले. पुरस्काराचे मानकरी..1) डॉ. रमेश शेळके* (सेवानिवृत्त), 2) डॉ. मारुती सलगर (वरिष्ठ अधिव्याख्याता , जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव), 3) डॉ.बालाजी संमुखराव
 (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासेगाव ता. औसा जि. लातूर), 4) डॉ. दिनेश भिसे (जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा पानगाव ता.रेणापूर जि. लातूर), 5) डॉ. नागेश पाटील (जिल्हा परिषद प्रशाला भादा ता. औसा जि. लातूर), 6) डॉ.  विष्णू नरहरे (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुऱ्हाळ ता. निलंगा जि.लातूर), 7) डॉ. मारोती कदम
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंदगी बु ता.अहमदपूर जि.लातूर), 8) डॉ. सतीश सातपुते (जिल्हा परिषद प्रशाला शासकीय वसाहत ता.जि.लातूर), 9) डॉ. सचिन डेंगळे
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुशिराबाद ता.जि.लातूर), 10) डॉ.स्मिता मामीलवाड (जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माणूसमारवाडी ता. रेणापूर जि. लातूर), 11) डॉ. राजश्री शेरे
(जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाखरसांगवी ता.जि.लातूर). तद्नंतर पुरस्कार प्राप्त शिक्षण रत्ना पैकी डॉ. राजश्री शेरे, डॉ. बालाजी समुखराव व डॉ. मारुती सलगर यांनी त्यांनी केलेल्या शैक्षणिक कार्य व पिचडी शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्यासाठी केलेले अथक परिश्रम या विषयावर सविस्तर मनोगतातून विचार मांडले. तसेच या कार्यक्रमाचे मान्यवर मा. शिवाजीराव साखरे वाघ, सुप्रसिध्द साहित्यिक भारत सातपुते वस्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी डीन, तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच विचारशलाका या त्रेमासिकाचे संपादक मा. नागोराव कुंभार यांनी अतिशय मार्मिक व सूसंस्कारीत, शैक्षणिक क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली या विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष मा. शिवाजीराव साखरे (वाघ),थोर विचारवंत, शिक्षणतज्ञ, महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य ,स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी डीन, तत्त्वज्ञान परिषदेचे माजी अध्यक्ष, तसेच विचारशलाका या त्रेमासिकाचे संपादक मा.डॉ. नागोराव कुंभार,सुप्रसिद्ध कवी, वात्रटिकाकार व साहित्यिक मा. भारत सातपुते, महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष मा. चंदू अण्णा घोडके, लातूर जिल्हाध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर, सरचिटणीस मा. बालाजी गारमपल्ले, कार्याध्यक्ष मा. ज्ञानेश्वर बडगे, कोषाध्यक्ष मा. साईनाथ तोटावाड, उपाध्यक्ष  शिवलिंग मार्गमपवार, उदगीर तालुकाध्यक्ष मारोती लांडगे आदी मान्यवरांच्या हस्ते महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती लातूर च्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर शिक्षण रत्न अवार्ड देऊन सन्मानित करण्यात आले. या पुरस्कार कार्यमाचे प्रास्ताविक जिल्हा अध्यक्ष मा. लक्ष्मण दावणकर, कार्यमाचे सुत्रसंचलन आदर्श व उपक्रमशील शिक्षक मा. शंकर स्वामी व आभारप्रदर्शन ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी ते साठी आदर्श शिक्षक समिती लातूर चे सर्व पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.

No comments:

Post a Comment