*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत आनंदायी शनिवार या उपक्रमातून"गोल वर्तुळातील अंकाच्या बॉटल ला चेंडू ने बॉटल पाडणे आणि एक ते पाच अंकी संख्या वाचन करणे " शिक्षण*
-------------------------------------
*तिवटग्याळ - आज दिनांक 12/7/2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर,मुक्ता नंदगावे यांनी आज शनिवार निमित्ताने" शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातून गणितातील आनंदायी खेळातून " गोल वर्तुळातील अंकाच्या बॉटल ला चेंडू ने बॉटल पाडणे आणि संख्या वाचन करणे " या आनंदायी शनिवार उपक्रमांतून इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे यांनी हा उपक्रम समजावून सांगितले. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी विद्यार्थ्यांना या उपक्रमांची सविस्तर माहिती समजावून सांगितली. अशा रीतीने सर्व विद्यार्थ्यांचा सहभागी घेऊन."शनिवार माझा आवडीचा, अभ्यासक्रमातून गणितातील खेळ एक, दोन, तीन, चार, पाच अंकी संख्याचा खेळातून सराव " हा शैक्षणिक खेळ घेतला. अशा पध्दतीने शैक्षणिक खेळाच्या माध्यामतून मनोरंजनातून विद्यार्थांचा अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थ्यांना सराव करुन घेतला. या उपक्रमांत शाळेतील सर्व विद्यार्थांना सहभागी करुन घेतले. शाळेतील सर्व विद्यार्थी आनंदी व खूप सक्रिय सहभागी झाले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे व सर्व विद्यार्थी सहभागी झाले*
No comments:
Post a Comment