Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, May 21, 2022

MSP(महाराष्ट्र शिक्षक पॅनल विषयी सविस्तर माहिती


नमस्कार ,

MSP, अर्थातच महाराष्ट्र शिक्षक पॅनल.
 हे पॅनल कुठल्याही पक्षाचे नाही किंवा कोणत्याही निवडणुकीसाठी उभारलेले पॅनल नाही.
  तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील अनेक जिल्ह्यातील काही शिक्षकांनी एकत्र येऊन शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठी उभारलेली एक चळवळ आहे एक विचार आहे.
 
शिक्षकांनीच शाळा, शिक्षक , पालक व विद्यार्थी यांच्या करिता निस्वार्थपणे उभी केलेली व अविरतपणे सुरू असलेली एक सेवा आहे.

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राच्या ही अगोदर शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचे महत्त्व याच एम. एस. पी. टीमने आणले.
 एम एस पी टीमचा श्रीगणेशा शिक्षणाचा पॅटर्न अशी ओळख असणाऱ्या *लातूर* नगरीतून झाला व आज महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात  एम एस पी ची टीम कार्यरत आहे.

व्हाट्सअप चे एकूण 200 समूह व या प्रत्येक समूहात राज्यातील गुणवंत शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, गटशिक्षणाधिकारी,  शिक्षणाधिकारी , प्राचार्य व सबंध पर्यवेक्षण यंत्रणेतील सर्व अधिकारी, शिक्षणतज्ञ असे 40000 प्रत्यक्ष सहभागी आहेत. 
 सर्व जिल्हा, तालुका किंबहुना प्रत्येक शाळेतील शिक्षकांच्या मोबाईल मध्ये सदरील व्हाट्स अप समूह आहेच. यातूनच MSP ची टीम दररोज चा परिपाठ, दिनविशेष, महापुरुषांची जयंती विशेष माहिती, शालोपयोगी तंत्रज्ञान पोस्ट, विविध उपयुक्त ऍप्लिकेशन माहिती, मुख्याध्यापक उपयोगी ऑनलाईन पोस्ट्स  सर्वांपर्यंत अविरतपणे पोहोच करीत असते. 
    तमाम सर्व शिक्षक या समूहाचे साक्षीदार आहेत.

  याच महाराष्ट्र शिक्षक पॅनल टीमच्या वतीने शिर्डी, शेगाव , खुलताबाद, औरंगाबाद या ठिकाणी राज्यस्तरावरील टॉपची तंत्रस्नेही संमेलने यशस्वी संपन्न झाली. 
  यातूनच पुढे शाळा-शाळांतून तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार झपाट्याने होत राहिला. 
गुणवत्ता - विकासात हातभार लागला.

तसेच ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या वाडी-वस्ती तांड्यावरील शिक्षकांना त्यांच्या कार्याबद्दल राज्य स्तरावर अनेक मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्याचे कार्यही याच एम एस पी टीमने केलेले आहे. 

व आजचा हा सुंदर व देखणा सोहळा विद्येचे माहेरघर पुणे येथे घडवून गुरुजनांना त्यांच्या कार्याचा सन्मान करून सेवा करण्याचे भाग्य  एम एस पी टीमला लाभत असल्याचा आनंदही आहे.
   उपस्थित सर्व सत्कारमूर्ती शिक्षक यांच्या कार्यास *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* सलाम करीत आहे.
    व यापुढेही सर्व बालकांच्या उन्नतीचा वसा घेतलेल्या शिक्षण क्षेत्रातील या वारकऱ्यांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या वतीने खूप खूप हार्दिक शुभेच्छा...!!

धन्यवाद....!!!

✒️ *रविराज देशमुख* ✒️
 सदस्य, महाराष्ट्र शिक्षक पॅनल.
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️




No comments:

Post a Comment