Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, May 21, 2022

महाराष्ट्र शिक्षक पॅनल द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पूरस्कार सन 2022 सोहळा संपन्न

*महाराष्ट्र शिक्षक पॅनल द्वारा आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पूरस्कार सन 2022 सोहळा संपन्न*


पूणे - महाराष्ट्र शिक्षक पॅनल द्वारा आयोजित पुरस्कार सोहळा 2022 भोसरी पुणे अंकुशराव लांडगे नाट्यगृह येथे दिनांक 15/5/2022 रोजी रविवारी संपन्न झाले. सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिमाखदार आयोजन. महाराष्ट्र राज्यातील सुमारे 40,0000 पेक्षा जास्त शिक्षकांना शैक्षणिक कार्यात जोडून घेण्याऱ्या राज्यातील सर्वात मोठ्या MSP अर्थात महाराष्ट्र शिक्षक पॅनल व्हॉट्सअॅप ग्रुप आयोजित राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सन्मान पूरस्कार सन 2022 सोहळा अंकुशराव लांडगे नाट्यगृह भोसरी पुणे येथे रविवारी दिनांक 15/5/2022 रोजी संपन्न झाले. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार मा. विक्रम काळे, उदघाटक सिनेअभिनेत्री डॉ. निशिगंधा वाड, प्रमुख पाहुणे नाशिक विभाग पदवीधर आमदार मा. सुधीर तांबे, MSP (महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे प्रमुख) दीपक चामे लातूर, सतीश कोळी खुलताबाद, रंगनाथ सगर लातूर, विकी येलमटे लातूर, ज्ञानेश्वर बडगे लातूर, बाळासाहेब कांबळे लातूर, अशोक पांडे लातूर, विजय पोतदार लातूर, मकरंद आहेर पुणे, राजश्री पाटील ठाणे, मनिषा पवाळ पुणे, संध्या वाळूज पुणे तसेच महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे सर्व राज्यांतील पदाधिकारी प्रमुख शिक्षक व 175 पुरस्कार प्राप्त शिक्षक बंधू-भगिनी आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील सुमारे 175 शिक्षक बंधू भगिनीना या वेळी मान्यवरांच्या हस्ते शाल,प्रमाणपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. या पुरस्कार प्रसंगी डॉ. निशिगंधा वाड सिने अभिनेत्री यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, पूरस्कार मिळणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षकांची या पुढील शैक्षणिक जबाबदारी वाढली असून एक उत्तम पिढी घडविण्याचे कार्य पुरस्कार्थी शिक्षकांच्या माध्यमातून या पुढे ही सुरु राहील. मराठवाडा विभागाचे शिक्षक आमदार मा. विक्रम काळे यांनी शिक्षकांच्या विविध समस्या सोडवित असल्याचे सांगितले. शिक्षकांचे पगार नियमित करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे या वर विधीमंडळात आवाज उठवत राहणार. पुरस्कारांच्या निमित्ताने शिक्षकांना शुभेच्छा देण्यासाठी व त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी नेहमीच बांधील असल्याचे त्यांनी म्हटले. नाशिक विभाग पदवीधर आमदार मा. सुधीर तांबे यांनी महाराष्ट्र शिक्षक पॅनल च्या सर्व शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक करत पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन केले. या पुरस्कार सोहळा मध्ये महाराष्ट्र शिक्षक पॅनल चे 13 सदस्यांचे स्वलिखित पुस्तकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश कोळी खुलताबाद, सुत्र संचालन जतिन कदम व प्रतिभा क्षीरसागर कदम पुणे यांनी केले व आभार प्रदर्शन विकी येलमटे लातूर यांनी मानले. या कार्यक्रमासाठी 15,000 पेक्षा जास्त शिक्षक बंधू भगिनी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment