" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणारी तिवटग्याळची जिल्हा परिषद शाळा


*विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी घडविणारी तिवटग्याळची जिल्हा परिषद शाळा* 
-------------------------------------
    सध्या इंग्रजी शाळांची संख्या वाढते आहे आणि जिल्हा परिषद ची घटत आहे. पालक उठसुठ आपली पाल्य इंग्रजी शाळेत पाठवत आहे. हायफाय शिक्षण देणाऱ्या इंग्रजी शाळाकडे पालकाचा कल वाढला आहे. अशातच आव्हान आहे ते मराठी जिल्हा परिषद शाळा टिकवण्याचे  शिक्षक, मुख्याध्यापकांना म्हणजे शाळा वाचवणे, विद्यार्थी संख्या वाढवणे. यासाठी शिक्षकांचे प्रयत्न महत्वाचे आहेत. सर्वसामान्य, गोरगरिबांना न्याय देणाऱ्या मराठी जिल्हा परिषद शाळांना आता पालकही विसरत आहेत.इंग्रजी शाळांमध्ये पालक खर्च करून मुले पाठवत आहेत. पण कसलाही खर्च नसताना मराठी जिल्हा परिषद शाळांमध्ये मुले पाठवण्यास तयार नाहीत. त्यासाठी मराठी जिल्हा परिषद शाळांच्या शिक्षक, मुख्याध्यापक यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यासाठी मराठी जिल्हा परिषद शाळेमध्ये गुणवता, संस्कार, शिस्त वाढवणे गरजेचे आहे. तशा प्रकारचे प्रयत्न मराठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांनी, मुख्याध्यापकांनी यांनी सुरु केले असून लवकरच बद्दल होईल यासाठी जास्तीचे प्रयत्न करणे गरजेचे आहे. शाळेची विद्यार्थी संख्या वाढवणे, पालकांचे प्रबोधन करणे, गुणवतापूर्ण शिक्षण देणे, संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे यासाठी काही शाळांची शिक्षक, मुख्याध्यापक प्रयत्न करतानाही दिसत आहेत. असेच एक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर येथील उपक्रमशील मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर बडगे हेही आपल्या शैलीने विद्यार्थी घडवत आहेत. अनेक शाळावर मुख्याध्यापक म्हणून सेवा बजावणारे श्री. ज्ञानेश्वर बडगे हे विविध उपक्रम राबवून विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्न केले. त्यांना शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी योगदानाबद्दल जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार पासून राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावर 50 पेक्षा जास्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे अंबानगर, संगम, रावणगाव, बोळेगाव बु नंतर आता सन 2021 पासून तिवटग्याळ ता. उदगीर जिल्हा लातूर या शाळेवर रुजू झाले आणि अनेक शैक्षणिक उपक्रम राबवत या शाळेच्या गुणवतेत भर पाडली. तेही या शाळेच्या प्रगतीसाठी प्रयत्न करतात. जि. प. प्रा. शाळा तिवटग्याळ येथे रुजू झाल्यावर त्यांनी विद्यार्थी संख्या वाढवली. आणि मुलांना संस्कारक्षम व गुणवतापूर्ण शिक्षण देत आहेत. शाळा प्रवेशोत्सव पासून ते त्यांच्या परीक्षा होईपर्यंत संस्कारक्षम वं गुणवतापूर्ण शिक्षण देण्याचे काम अविरतपणे करीत आहेत.
    दप्तरविना आनंदायी शाळा, शैक्षणिक साहित्याच्या द्वारे मनोरंजनातून शिक्षण, गावातील शिक्षण तज्ञ, प्रतिष्ठित नागरिक व इतर मान्यवर व्यक्तीला, शिक्षण विभागातील अधिकाऱ्याच्या मार्गदर्शन घेऊन त्यांना शाळेतील विविध उपक्रमांत सहभागी घेऊन विद्यार्थीचे गुण गौरव व कौतुक केले जाते. मोफत पुस्तकाचे वाटप, गणवेश, बुट व साॅक्स वाटप केले जाते. मुलांना शाळेत शिस्त आणि संस्काराचे शिक्षण दिले जाते. शाळेमध्ये मुलांसाठी विविध उपक्रम राबविले जातात.विविध स्पर्धा, इंग्रजी परीपाठ, आदर्श परिपाठ, सामान्य ज्ञान, सण वार, महत्वाचे दिवस, सहलीचे नियोजन, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जातात. यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. बाल वयातच मुलांची परीक्षेविषयी भीती मरावी म्हणून विविध स्पर्धा घेतल्या जातात. त्यात यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षीस दिले जाते. बक्षीस प्राप्त मुले पुन्हा जोमाने अभ्यास करतात. या शाळेतील विद्यार्थ्यांना विविध संस्थातर्फे आयोजित रंगभरण, चित्रकला, निबंध स्पर्धेत बसविले जाते. त्यातही या शाळेचे विद्यार्थी यश संपादन करतात. उदगीर येथे आयोजित साहित्य संमेलन, सार्वजनिक शिवजयंती निमित्त या शाळेचे विद्यार्थी वेशभूषेत सहभागी झाली होती. पाचवी शिष्यवृत्ती, नवोदय परीक्षेत विद्यार्थी बसवून विशेष परिश्रम घेवून विद्यार्थी यशस्वी केले जातात. शाळेमध्ये पालक मेळाव्याचे आयोजन करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख पालकांना दाखवला जातो. आपल्या पाल्याचा प्रगतीचा आलेख पाहून पालकही समाधान व्यक्त करतात. बाल वयातच मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख व्हावी म्हणून शाळेमध्ये विविध सण साजरे केले जातात. शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, अण्णाभाऊ साठे जयंती,महाराणा प्रताप, गांधी जयंती, महात्मा फुले जयंती, सावित्रीबाई फुले जयंती या महापुरुषांच्या जयंती , पुण्यतिथीचे आयोजन करून मान्यवरांकडून त्या त्या महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकून महापुरुषांचे कार्य मुलांसमोर मांडले जाते. मुलांना आपले सण वार माहित व्हावे म्हणून गोकुळाष्टमी,आषाढी एकादशी निमित्ताने बालचमूची दिंडी सोहळा, मकरसंक्रात, गुढी पाडवा, दसरा, दिवाळी, गुरुपौर्णिमा,, रमजान ईद, बकरी ईद, धुलिवंदन, नाताळ, 26 जानेवारी, 1 मे, 15 ऑगस्ट, 5 सप्टेंबर, 17 सप्टेंबर वं इतर जागतिक दिनाचेशाळेत आयोजन करून विदयार्थ्यांना माहिती दिली जाते. सण साजरे केले जातात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते आणि आपल्या संस्कृतीची जाणीव राहते. विदयार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळावा म्हणून दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले जाते. त्यात गायन, नृत्य, वक्तृत्व अशा कला सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून म्हणून मान्यवरांच्या हस्ते विविध स्वरूपात बक्षीस वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच इतर माहिती अवगत व्हावी म्हणून देवस्थान,पर्यटनस्थळी दरवर्षी शैक्षणिक सहल काढली जाते. शाळेत मध्यान्ह जेवण दिले जाते. एकंदरीत शाळेचे मुख्याध्यापक श्री. ज्ञानेश्वर बडगे, सहकारी शिक्षिका अंजली लोहारकर शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश साळुंके, उपाध्यक्ष कैलास तवर,सरपंच प्रशांत पाटील, तंटामुक्तीचे अध्यक्ष देविदास पाटील, पोलीस पाटील धनराज पाटील, प्रतिष्ठित नागरिक दिनेश पाटील, छगनसिंग बिरादार पदाधिकारी यांच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने शाळेची यशस्वी वाटचाल चालू असून या शाळेतून गुणवंत व संस्कारक्षम विद्यार्थी बाहेर पडत आहेत. त्यामुळे पालक वर्गातूनही समाधान व्यक्त केले जात आहे.

        *शंकर बोईनवाड* 
        *पत्रकार , उदगीर*

No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न

*तिवटग्याळ  जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत व ग्रामपंचायत येथे  स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत 14 आॅगस्ट 2025 दुसरा ध्वजारोहन संपन्न* ---...