*पेंटर हबिब तांबोळी लासोनकर यांचा उत्कृष्ट वर्गखोली रंगरंगोटी लिखाण बद्दल सत्कार*
-------------------------------------
*तिवटग्याळ - दिनांक 10 जून 2025 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता.उदगीर जि लातूर येथे अवघ्या दोन दिवसात एक वर्गखोली इयत्ता पहिली व दुसरी इयत्तेतील अभ्यासक्रम रंगरंगोटी लिखाण अतिशय सुंदर व उत्कृष्ट करुन दिल्या बद्दल पेंटर हबिब तांबोळी लासोनकर व चंद्रकांत बिरादार यांचा शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाल श्रीफळ व पुष्पहाराने सत्कार करण्यात आला. अतिशय कमी कालावधीत उत्कृष्ट लिखाण केल्याबद्दल आभार व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे, अंगणवाडी कार्यकर्ती पूजा बिरादार व मदतनीस भागाबाई बिरादार आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment