केंद्रप्रमुख मा. काशिम शेख यांचा शाळा भेटी निमित्ताने सत्कार*
*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत केंद्रप्रमुख यांची अचानक शाळा भेट*
-------------------------------------
*तिवटग्याळ - तोंडार केंद्राचे केंद्र प्रमुख मा. काशिम शेख यांची आज दिनांक 11 जून 2025 रोजी अचानक तिवटग्याळ शाळेला भेट दिली. भेटी दरम्यान सर्व प्रथम शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, मुक्ता नंदगावे यांनी साहेबांचे शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. तद्नंतर इयत्ता पहिली ते पाचवी विद्यार्थ्यांचे वाचन, लेखन, संख्याज्ञान व संख्यावरील क्रिया या बाबत विद्यार्थी तपासणी केली. विद्यार्थ्यांना स्वाध्याय दिला. बरोबर व अचुक स्वाध्याय सोडवलेल्या विद्यार्थाचे कौतुक केले. शाळा परीसर, शौचालय, किचन शेड, वर्गखोली रंगरंगोटी इत्यादी बाबतीत स्वच्छता पाहुन तसेच सर्व इयत्तेच्या विद्यार्थाची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. तसेच नुतन शैक्षणिक वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व काही मार्गदर्शक सुचना केल्या. एकंदरीत शाळेची प्रगती पाहून समाधान व्यक्त केले*
No comments:
Post a Comment