हैबतपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद संपन्न*
हैबतपुर - हैबतपुर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण परिषद सप्टेंबर 2023 ची दिनांक 28/9/2023 रोजी तोंडार केंद्राची शिक्षण परिषद हैबतपुर शाळेच्या वतीने हैबतपुर येथे संपन्न झाली .या कार्यक्रमाचे अध्यक्ष केंद्र प्रमुख मा. प्रतिभा मुळे मॅडम, तर प्रमुख पाहुणे म्हणून कें मु अ संजय बिरादार, ग्राम सेविका जाधव उज्ज्वला , साधन व्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे, सरपंच अनुराधा नरहरे, उपसरपंच शोभा बिरादार, गजानन नरहरे, सुधाकर दंडिमे आदी जण उपस्थित होते.नियोजित सर्व विषयावर सुलभक किरण पाटील ,मनोहर पांडे, पुंडलिक मुळे, पप्पुलवाड अविनाश, ज्ञानेश्वर बडगे व साधन व्यक्ती डॉ. ज्ञानोबा मुंढे यांनी सविस्तर विषयानुसार मार्गदर्शन केले. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदवला प्रशासकीय बाबी व शंकासमाधान केंद्र प्रमुख मा. प्रतिभा मुळे केले. या शिक्षण परिषदेत ग्राम पंचायत च्या वतीने हैबतपुर शाळेला 6 टेबल, 24 खुर्ची, 1कपाट, साऊंड बॉक्स, 4 फॅन इत्यादी फर्निचर दिलेले आहे. हे फर्निचर साहित्य दिल्या बद्दल उपस्थित सर्वांनी सरपंच अनुराधा नरहरे, ग्राम सेविका जाधव उज्ज्वला , गजानन नरहरे यांचे कौतुक करुन अभिनंदन केले. या शिक्षण परिषदेला केंद्रांतर्गत मुख्याध्यापक सोमवंशी गुरुजी, चंद्रकांत कोलेवाड, संजय बिरादार, अशोक पांडे, राजेंद्र लामतुरे, संजीव केंद्रे, खुर्शीद शेख, संजय वाघमारे, लता पटवारी, शोभा भंडारे, ममता गंदमवार, ज्ञानेश्वर बडगे, रामदास वंगरवाड व केंद्रांतर्गत सर्व शिक्षक व शिक्षीका उपस्थित होते. शिक्षण परिषदेचे सूत्रसंचालन संजय मळभगे यांनी तर आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक खुर्शीद शेख यांनी केले.
No comments:
Post a Comment