तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत,अंगणवाडी, ग्राम पंचायत व मारोती मंदिरात स्वच्छता रॅली आयोजित*
*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी यांनी सांगितले की, आज दिनांक 30/9/2023 रोजी भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गावात स्वच्छता अभियान राबवून 1 तास श्रमदानातून स्वच्छता करण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे असे सांगितले. या नुसार शालेय परीपाठानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, प्रतिष्ठित नागरिक अण्णाराव साळुंके, परमेश्वर नरहरे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, राजकुमार श्रीमंगले आदी जणांच्या उपस्थितीत तिवटग्याळ पाटी ते मारोती मंदिर, शाळा, अंगणवाडी परीसरातील सर्व ठिकाणी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना घेऊन स्वच्छता रॅली काढण्यात आली. सर्व परीसर स्वच्छ करण्यात आला. शाळा, अंगणवाडी व मारोती मंदिर, ग्राम पंचायत या ठिकाणचा परीसर स्वच्छ करण्यात आला. रॅली चा समारोप मारोती मंदिरात करण्यात आला. विद्यार्थ्याना पाणी व बिस्कीट पुडे वाटप केल्यानंतर संत गाडगेबाबा व महात्मा गांधी यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी दिली तद्नंतर संत गाडगेबाबा यांचे लोक गीत गोपाळा, गोपाळा, देवकीनंदन म्हणून समारोप करण्यात आला. या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा. रमेश साळुंके, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मा. देविदास पाटील, प्रतिष्ठित नागरिक अण्णाराव साळुंके, परमेश्वर नरहरे, शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका अंजली लोहारकर, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले, राजकुमार श्रीमंगले आदी जण उपस्थित होते*
No comments:
Post a Comment