Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Saturday, January 6, 2024

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य "सांगा सांगा ओळख सांगा" या उपक्रमातून शिक्षण












तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक साहित्य "सांगा सांगा ओळख सांगा" या उपक्रमातून शिक्षण*

*तिवटग्याळ - आज दिनांक 6/1/2024 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी आज शनिवार निमित्ताने शैक्षणिक साहित्य" सांगा सांगा ओळख सांगा" या  उपक्रमांतून इयत्ता पहिली ते चौथी पर्यंत च्या विद्यार्थ्यांना शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी या उपक्रम समजावून सांगितले. प्रथम शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांनी मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांची ओळख सांगितली तद्नंतर मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर यांची ओळख सांगितली अशा पद्धतीने शाळेतील सर्व विद्यार्थांची ओळख आपल्या जवळ बसलेल्या विद्यार्थानी सांगितली. अशा पध्दतीने कला कार्यानुभव या विषयावर शैक्षणिक साहित्यातून ओळख त्रिकोण, चौकोन, आयात व वर्तुळ यांची ओळख. हे माझे मित्र त्रिकोण, यांना तीन कोण आहेत, तीन बाजू आहेत, तीन शिरोबिंदू आहेत. चौकोन हे माझे मित्र आहेत. यांना चार बाजू आहेत, यांना चार कोन आहेत, चार शिरोबिंदू आहेत. आयात हे माझे मित्र आहेत. यांना चार कोन आहेत, यांना चार बाजू आहेत, यांना शिरोबिंदू आहेत. वर्तुळ हे माझे मित्र आहेत. यांना कोन, बाजू नाहीत. अशा पध्दतीने शैक्षणिक साहित्याच्या माध्यामतून ओळख समजावून सांगितले. या उपक्रमांत विद्यार्थी खूप सक्रिय सहभागी व आनंदी दिसुन आले आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे भौमितिक आकृतीचे सर्व गुणवैशिष्ट्ये समजले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले*

No comments:

Post a Comment