श्री ज्ञानेश्वर बडगे जिल्हास्तरीय विशेष आदर्श शिक्षक पुरस्काराने उद्या शिक्षक दिनी सन्मानित करण्यात येणार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु.ता.शि.अनंतपाळ येथील उपक्रमशील शिक्षक श्री ज्ञानेश्वर भाऊराव बडगे यांची या वर्षी जिल्हास्तरीय विशेष आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. तरी उद्या शिक्षक दिनी थोरमोटे लाॅन्स औसा रोड लातूर येथे मा.संभाजीराव पाटील निलंगेकर पालकमंत्री लातूर, मा.खासदार सुधाकरराव सृंगारे, जिल्ह्यातील सर्व आमदार व सर्व प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.श्री ज्ञानेश्वर बडगे यांना या पुर्वी अनेक आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्यस्तरीय, जिल्हास्तरीय व तालुकास्तरीय अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. या वर्षी लातूर जिल्हा परिषद जिल्हास्तरीय विशेष आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल आपले मनापासून हार्दिक अभिनंदन व पुढील शैक्षणिक कार्यासाठी हार्दिक🌹🌹🌹🌹🌹🌹👏🏻👏🏻👏🏻👏🏻
No comments:
Post a Comment