" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. शाळेत "बाला उपक्रम" विषयावर आढावा घेण्यात आला.*

*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. शाळेत "बाला उपक्रम" विषयावर आढावा घेण्यात आला.*
















*बोळेगाव बु - आज दिनांक 6/11/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. ता. शि. अनंतपाळ जिल्हा लातूर येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अभिनव गोयल साहेब यांच्या संकल्पनेतून  बाला उपक्रम राबविण्यासाठी केंद्र प्रमुख श्री शिवाजीराव एरंडे साहेब, नुतन कांबळगा व हिसामाबाद केंद्राचा केंद्र प्रमुख पदाच्या पदभार स्वीकारणारे  श्रीमान  विठ्ठल वाघमारे साहेब, विषय तज्ञ श्री सतीश सातपुते, आदी जण बाला उपक्रमासाठी आढावा घेण्यासाठी शाळेत भेट दिली. तदनंतर शाळेत छोटेखानी कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष श्री व्यंकटराव खटके, प्रमुख पाहुणे श्रीमान केंद्र प्रमुख शिवाजीराव एरंडे, श्री विठ्ठल वाघमारे, श्री सतीश सातपुते, गावातील जेष्ठ नागरिक सगरे अप्पा आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच अध्यक्ष व प्रमुख पाहुणे व प्रमुख अतिथी यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा नंतर केंद्र प्रमुख श्री शिवाजीराव एरंडे साहेबांनी बाला उपक्रमासाठी आढावा घेतला. तसेच शाळेतील वर्गखोल्या व संरक्षण भिंत, अम्पीथियटर, लपंडाव भिंत, उंची मोजण्यासाठी मोजमापे, ई- लर्निग, डिजिटल वर्ग, शाळा, रंग रंगोटी, बाला उपक्रमातील व इतर आवश्यक व कल्पकतेने उपक्रम राबविण्यात यावे असे सविस्तर माहिती सांगितली. केंद्र प्रमुख श्री विठ्ठल वाघमारे, विषय तज्ञ श्री सतीश सातपुते आदी साहेबांनी सविस्तर व सखोल बाला उपक्रम विषयावर माहिती सांगून मार्गदर्शन केले. तसेच सर्वांनी मार्गदर्शन केल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने बोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळा तालुक्यात व जिल्ह्यात बाला उपक्रम निश्चितच टाॅप मध्ये राहिल असे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षक श्री ज्ञानेश्वर बडगे व आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे यांनी मानले. या कार्यक्रम यशस्वीसाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, सुदर्शन पाटील, सुभाष नरवडे, ज्ञानेश्वर बडगे, ज्ञानोबा कंजे, विजयकुमार सिंदाळकर, श्रीमती आशा मुळे व मजलसा पुठ्ठेवाड यांनी परिश्रम घेतले.*


No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...