Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, December 31, 2020

नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेबांनी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील "बाला उपक्रम" विषयावर आढावा घेण्यात आला.*

*नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेबांनी बोळेगाव बु. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील "बाला उपक्रम" विषयावर आढावा घेण्यात आला.*


   




*बोळेगाव बु - आज दिनांक 31/12/2020 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोळेगाव बु. ता. शि. अनंतपाळ जिल्हा लातूर येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मा. श्री अभिनव गोयल साहेब यांच्या संकल्पनेतून  बाला उपक्रम राबविण्यासाठी  शि.अनंतपाळ तालुक्याचे नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेब, कांबळगा व हिसामाबाद केंद्राचा केंद्र प्रमुख पदाच्या पदभार स्वीकारणारे  श्रीमान  विठ्ठल वाघमारे साहेब, आदी जण बाला उपक्रमासाठी आढावा घेण्यासाठी शाळेत भेट दिली. तदनंतर शाळेत छोटेखानी सत्कार करण्यात आला. सत्कार सोहळा नंतर नुतन प्रभारी गटशिक्षणाधिकारी श्रीमान बोईनवाड साहेबांनी बाला उपक्रमासाठी आढावा घेतला. व तसेच काही राहिलेल्या शाळेतील वर्गखोल्या व संरक्षण भिंत, अम्पीथियटर, लपंडाव भिंत, उंची मोजण्यासाठी मोजमापे, ई- लर्निग, डिजिटल वर्ग, शाळा, रंग रंगोटी, बाला उपक्रमातील व इतर आवश्यक व कल्पकतेने उपक्रम राबविण्यात यावे असे सविस्तर माहिती सांगितली व मार्गदर्शन केले.  या वेळी केंद्र प्रमुख श्री विठ्ठल वाघमारे उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे यांनी शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने बोळेगाव बु. जिल्हा परिषद शाळा तालुक्यात व जिल्ह्यात बाला उपक्रम निश्चितच टाॅप मध्ये राहिल असे सांगितलेले व उपस्थित सर्वांचे आभारमानले. यावेळी  शाळेचे मुख्याध्यापक श्री माधवराव पारशेट्टे, शाळेतील शिक्षक श्री चंद्रकांत कोरे, ज्ञानोबा कंजे, श्रीमती आशा मुळे  आदी जण उपस्थित होते.*

No comments:

Post a Comment