मराठी वाक्प्रचार आणि अर्थ
· अटकेपार झेंडा लावणे - फार मोठा पराक्रम गाजवणे.
· अपूर्व योग येणे - दुर्मिळ योग येणे.
· अभिलाषा धरणे - एखाद्या गोष्टीची इच्छा बाळगणे.
· अभंग असणे - अखंड असणे.
· अमलात आणणे - कारवाई करणे.
· अप्रूप वाटणे - आश्चर्य किंवा कौतुक वाटणे.
· अनभिज्ञ असणे - एखाद्या विषयाचे मुळीच ज्ञान नसणे.
· अट्टहास करणे - आग्रह धरणे.
· अवाक् होणे – आश्चर्यचकित होणे.
· अजरामर होणे - कायमस्वरूपी टिकणे.
· अनमान करणे - संकोच करणे.
· अठरा विश्वे दारिद्र्य असणे - पराकोटीचे दारिद्र्य असणे.
· अर्धचंद्र देणे - हकालपट्टी करणे.
· अडकित्त्यात सापडणे - पेचात सापडणे.
· अत्तराचे दिवे लावणे - भरपूर उधळपट्टी करणे.
· अन्नास जागणे - उपकाराची आठवण ठेवणे.
· अन्नास मोताद होणे - आत्यंतिक दारिद्र्यात जगणे.
· अन्नास लावणे - उपजीविकेचे साधन मिळवून देणे.
·
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
➖➖➖➖➖➖➖
अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे - थोड्याशा यशाने चढून जाणे.
· अठरा गुणांचा खंडोबा - लबाड माणूस.
· आयोजित करणे - सिद्धता करणे.
· आखाडे बांधणे - मनात आराखडा किंवा अंदाज करणे.
· आत्मसात करणे – मिळवणे,अंगी बाणणे.
· आवर्जून पाहणे - मुद्दामहून पाहणे.
· आकाशाची कुऱ्हाड - आकस्मिक संकट.
· आकांडतांडव करणे - रागाने आदळआपट करणे.
· आकाश ठेंगणे होणे - अतिशय आनंद होणे.
· आड येणे - अडथळा निर्माण करणे.
· आकाश पाताळ एक करणे - फार मोठ्याने आरडाओरड करून थैमान घालणे.
· आकाश फाटणे - चारी बाजूंनी संकटे येणे.
· आकाशाला गवसणी घालणे - आवाक्याबाहेरची गोष्ट करण्याचा प्रयत्न करणे.
· आगीत तेल ओतणे - भांडण किंवा वाद विकोपाला जाईल असे करणे.
· आच लागणे - झळ लागणे.
· आपल्या पोळीवर तूप ओढणे – साधेल तेवढा स्वतःचाच फायदा करून घेणे.
· आभाळ कोसळणे - एकाएकी फार मोठे संकट येणे.
· आभाळाला कवेत घेणे - मोठे काम साध्य करणे.
· आतल्या आत कुढणे - मनातल्या मनात दुःख करणे.
· इतिश्री करणे - शेवट करणे.
· उखाळ्या-पाखाळ्या काढणे – एकमेकांचे उणेदुणे काढणे किंवा दोष देणे.
· उचलबांगडी करणे - एखाद्याला जबरदस्तीने हलवणे.
· उंटावरून शेळ्या हाकणे - स्वतः सामील न होता सल्ले देणे, मनापासून काम न करणे,दूरवरून निर्देश देणे.
· उदक सोडणे - एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडून देणे.
· उदास होणे - खिन्न होणे.
· उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.
· उताणा पडणे - पराभूत होणे.
· उदास होणे - खिन्न होणे.
· उपोषण करणे - लंघन करणे,उपाशी राहणे.
· उत्पात करणे - विध्वंस करणे.
· उसंत मिळणे - वेळ मिळणे.
· उसने बळ आणणे - खोटी शक्ती दाखविणे.
· उताणे पडणे - पराभूत होणे.
· उच्छाद मांडणे - धिंगाणा घालणे.
· ऊहापोह करणे - सर्व बाजूंनी चर्चा करून साधकबाधक विचार करणे.
· उध्वस्त होणे - नाश पावणे.
· उंबराचे फूल - क्वचित भेटणारी व्यक्ती.
· उन्मळून पडणे - मुळासकट कोसळणे.
· उन्हाची लाही फुटणे - अतिशय कडक ऊन पडणे.
· उराशी बाळगणे - मनात जतन करुन ठेवणे.
· उलटी अंबारी हाती येणे - भीक मागण्याची पाळी येणे.
· उखळ पांढरे होणे - पुष्कळ फायदा होणे.
· ऊर भरून येणे – गदगदून येणे.
· उष्ट्या हाताने कावळा न हाकणे - कधी कोणाला यत्किंचितही मदत न करणे.
· एक घाव दोन तुकडे करणे - ताबडतोब निर्णय घेऊन गोष्ट निकालात काढणे.
· ओनामा – प्रारंभ. अग्निदिव्य करणे - कठीण कसोटीला उतरणे.
· ओढा असणे - कल असणे.
· ओक्साबोक्शी रडणे - मोठ्याने आवाज करत रडणे.
· अंग धरणे - लठ्ठ होणे.
· अंगावर काटा येणे - भीती वाटणे.
· अंग काढून घेणे - संबंध तोडणे.
· अंगात वीज संचारणे – अचानक बळ येणे.
· अंगाला होणे - अंगाला छान बसणे.
· अंगवळणी पडणे – सवय होणे.
· अंगाची लाही होणे – अतिशय संताप होणे,खूप राग येणे.
· अंगी बाणणे – मनात खोलवर रुजणे.
· अंगावर काटा उभा राहणे - भीतीने अंगावर शहारे येणे.
· अंगावर मूठभर मांस चढणे - धन्यता वाटणे.
· अंगाचा तिळपापड होणे - अतिशय संताप येणे.
· अंगावर शेकणे – नुकसान सोसावे लागणे.
· अंगी ताठा भरणे – मगरुरी करणे.
· अंथरूण पाहून पाय पसरणे – ऐपतीनुसार खर्च करणे.
· अंग चोरणे – फारच होडे काम करणे.
· आंदण देणे - देऊन टाकणे.
· आंबून जाणे – विटून जाणे,थकणे.
· कणीक तिंबणे - खूप मार देणे.
· कपाळ फुटणे - दुर्दैव ओढवणे.
· कपाळाला हात लावणे – हताश होणे,निराश होणे.
· कपाळमोक्ष होणे - मरण पावणे,अचानक झालेल्या अपघातामुळे उध्वस्त होणे.
· कान फुंकणे - दुसऱ्याच्या मनात किल्मिष निर्माण करणे,चुगली करणे.
· कान उपटणे – कडक शब्दात समज देणे.
· कागदी घोडे नाचविणे – फक्त लेखनात शूरपणा दाखविणे.
· कानावर हात ठेवणे – नाकाबूल करणे,माहीत नसल्याचा बहाणा करणे.
· कान टोचणे – खरमरीत शब्दात चूक लक्षात आणून देणे.
· कानउघाडणी करणे – चुकीबद्दल कडक शब्दात बोलणे,कडक शब्दात चूक दाखवून देणे.
· काखा वर करणे - आपल्याजवळ काही नाही असे दाखवणे.
· कानाडोळा करणे - दुर्लक्ष करणे.
· कानाने हलका असणे – काशावरही पटकन विश्वास ठेवणे.
· कान निवणे – ऐकून समाधान होणे.
· काढता पाया घेणे – विरोधी परिस्थिति पाहून निघून जाणे.
· कानावर घालणे – लक्षात आणून देणे.
· कायापालट होणे - स्वरूप पूर्णपणे बदलणे.
· काट्याने काटा काढणे – एका शत्रूच्या सहाय्याने दुसर्या शत्रूचा पराभव करणे.
· काट्याचा नायटा होणे – क्षुल्लक गोष्टीचा भयंकर परिणाम होणे.
· कावराबावरा होणे – बावरणे.
· कात्रीत सापडणे - दोन्ही बाजूंनी संकटात सापडणे.
· कानशिलांची भजी होणे – गुच्चे मारून मारून कानशिलांचा आकार बदलणे.
· काळीज उडणे - भीती वाटणे.
· कुणकुण लागणे - चाहूल लागणे.
· कच्छपी लागणे - नादी लागणे.
· काळजाचे पाणी पाणी होणे - अतिदुःखाने मन विदीर्ण होणे.
· कुत्रा हाल न खाणे - अतिशय वाईट स्थिती येणे.
· कूच करणे - वाटचाल करणे.
· काळजी घेणे – चिंता वाहने,आस्था असणे.
· कटाक्ष असणे - कल असणे,भर असणे, जोर असणे.
· कंपित होणे - कापणे थरथरणे.
· कसून मेहनत करणे - खूप नेटाने कष्ट करणे.
· कस लावणे - सामर्थ्य पणाला लावणे.
· किरकिर करणे - एखाद्या गोष्टीबाबत सतत तक्रार करणे.
· कारवाया करणे – कट करणे,कारस्थाने करणे.
· कापरे सुटणे - घाबरल्यामुळे थरथरणे.
· कहर करणे - अतिरेक करणे.
· कोडकौतुक होणे - लाड होणे.
· काळ्या पाण्याची शिक्षा - मरेपर्यंत कैद होणे.
· काळ्या दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.
· कंठस्नान घालने - ठार मारणे.
· काकदृष्टीने पाहाणे – अतिशय बारकाईने व तीक्ष्ण नजरेने पाहाणे.
· कंठशोष करणे - ओरडून गळा सुकवणे,उगाच घसाफोड करून खूप समजावून सांगणे.
· कंठ दाटून येणे – गहिवरून येणे.
· कंबर कसणे – जिद्दीने तयार होणे,एखाद्या गोष्टीसाठी हिम्मत करून तयार होणे.
· कुंपणाने शेत खाणे – ज्याच्यावर जबाबदारी आहे अशा विश्वासातील माणसाने फसवणे.
· केसाने गळा कापणे - वरकरणी प्रेम दाखवून कपटाने एखाद्याचा घात करणे.
· कोंबडे झुंजवणे - दुसऱ्यांचे भांडण लावून आपण मजा पाहणे.
· कोपरापासून हात जोडणे – काहीही संबंध न राहण्याची इच्छा प्रकट करणे.
· खडा टाकून पहाणे - अंदाज घेणे.
· खपणे – कष्ट करणे,झिजणे.
· खळखळ करणे - नाखुशीने सतत नकार देणे,टाळाटाळ करणे.
· खंड न पडणे - एखादे कार्य करताना मध्ये न थांबणे.
· खसखस पिकणे - मोठ्याने हसणे.
· खूणगाठ बांधणे - निश्चय करणे.
· खडे चारणे - शरण येण्यास भाग पाडणे.
· खडे फोडणे - दोष देणे.
· खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.
· खाजवून खरुज काढणे - मुद्दाम भांडण करू उकरून काढणे.
· खायचे वांदे होणे - उपासमार होणे,खायला न मिळणे.
· खाल्ल्याघरचे वासे मोजणे - उपकार करणाऱ्याचे वाईट चिंतिणे.
· खितपत पडणे - क्षीण होत जाणे.
· खो घालने - विघ्न निर्माण करणे.
· गळ्यात गळा घालणे – खूप मैत्री करणे.
· गर्भगळीत होणे - अतिशय घाबरणे.
· गळ्यातील ताईत होणे – अत्यंत आवडता होणे,अतिशय प्रिय असणे.
· गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.
· गळ घालणे - अतिशय आग्रह करणे.
· गळ्यात पडणे - एखाद्याला खूपच भीड घालने.
· गळ्याशी येणे - नुकसानीबाबत अतिरेक होणे.
· गाडी पुन्हा रुळावर येणे - चुकीच्या मार्गावरून पुन्हा पूर्ववत योग्य मार्गाला येणे.
· गुजराण करणे - निर्वाह करणे.
· गुमान काम करणे - निमूटपणे काम करणे.
· गुण्यागोविंदाने राहणे - प्रेमाने एकत्र राहणे.
· गाडी अडणे – खोळंबा होणे.
· ग्राह्य धरणे - योग्य आहे असे समजणे.
· गट्टी जमणे - दोस्ती होणे.
· गढून जाणे - मग्न होणे,गुंग होणे.
· गुण दाखवणे - दुर्गुण दाखवणे.
· गंगेत घोडे न्हाणे - कार्य तडीस गेल्यावर समाधान वाटणे.
· गळ्यात धोंड पडणे – इच्छा नसताना जबाबदारी अंगावर पडणे.
· गाशा गुंडाळणे - एकाएकी निघून जाणे,एकदम पसार होणे.
· गाजावाजा करणे - प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करणे.
· गौडबंगाल असणे – गुढ गोष्ट असणे,काहीतरी रहस्य असणे.
· घडी भरणे - विनाशकाळ जवळ येऊन ठेपणे.
· घागरगडचा सुभेदार – पाणक्या.
· घर डोक्यावर घेणे - अतिशय गोंगाट करणे.
· घर धुवून नेणे - सर्वस्वी लुबाडणे.
· घाम गाळणे - खूप कष्ट करणे.
· घालून-पाडून बोलणे - दुसऱ्याच्या मनाला लागेल असे बोलणे.
· घोडे मारणे - नुकसान करणे.
· घोडे पुढे दामटणे - स्वतःच्या फायद्यासाठी पुढे सरसावणे.
· घोडे पेंड खाणे - अडचण निर्माण होणे.
· घोकंपट्टी करणे - अर्थ लक्षात न घेता केवळ पाठांतर करणे.
· चतुर्भुज होणे - लग्न करणे.
· चक्कर मारणे - फेरफटका मारणे.
· चाहूल लागणे - मागोवा लागणे.
· चिल्लेपिल्ले वाऱ्यावर सोडणे – अनाथ करणे.
· चेहरा खुलणे - आनंद होणे.
· चित्त विचलित होणे - मूळ विषयाकडून लक्ष दुसरीकडे जाणे.
· चंग बांधणे – निश्चय करणे.
· चितपट करणे – कुस्तीत हरविणे.
· चार पैसे गाठीला बांधणे - थोडीफार बचत करणे.
· चुरमुरे खात बसणे - खजील होणे.
· चारी दिशा मोकळ्या होणे - पूर्ण स्वातंत्र्य मिळणे.
· चाहूल लागणे - एखाद्याचे अस्तित्व जाणवणे.
· चौदावे रत्न दाखवणे - मार देणे.
· छाननी करणे - तपास करणे.
· छातीत धस्सदिशी गोळा येणे - अचानक खूप घाबरणे.
· जमीनदोस्त होणे - पूर्णपणे नष्ट होणे.
· जंग जंग पछाडणे - निरनिराळ्या रीतींनी प्रयत्न करणे,कमालीचा प्रयत्न करणे.
· जिभेला हाड नसणे - वाटेल ते बेजबाबदारपणे बोलणे.
· जीभ सैल सोडणे – वाटेल तसे बोलणे.
· जिवात जिव येणे - काळजी नाहीशी होऊन,पुन्हा धैर्य येणे.
· जीव भांड्यात पडणे - काळजी दूर होणे.
· जीव मुठीत धरणे - मन घट्ट करणे.
· जळफळाट होणे - रागाने लाल होणे.
· जम बसणे - स्थिर होणे,बस्तान बसणे.
· जीवाची मुंबई करणे - अतिशय चैनबाजी करणे.
· जीव मेटाकुटीस येणे - त्रासाने अगदी कंटाळून जाणे .
· जीव अधीर होणे - उतावीळ होणे.
· जीव टांगणीला लागणे - चिंताग्रस्त होणे.
· जीवावर उदार होणे - प्राण देण्यास तयार होणे.
· जिवाचे रान करणे - खूप कष्ट सोसणे.
· जीव खाली पडणे – काळजीतून मुक्त होणे.
· जिवाचा धडा करणे – पक्का निश्चय करणे.
· जीव वरखाली होणे – घाबरणे.
· जीव की प्राण असणे - प्राणाइतके प्रिय असणे.
· जिवावर उठणे - जीव घेण्यास उद्युक्त होणे.
· जीवावर उड्या मारणे - दुसऱ्यावर अवलंबून राहून चैन करणे.
· जीवाला घोर लागणे - खूप काळजी वाटणे.
· जीव गहाण ठेवणे - कोणत्याही त्यागास तयार असणे.
· जिव थोडा थोडा होणे - अतिशय काळजी वाटणे.
· जोपासना करणे - काळजीपूर्वक संगोपन करणे.
· ज्याचे नाव ते असणे - उपमा देण्यास उदाहरण नसणे.
· झाकले माणिक – साधा,पण गुणी मनुष्य.
· झळ लागणे - थोडाफार दुष्परिणाम भोगावा लागणे.
· झुंज देणे - लढा देणे,संघर्ष करणे.
· त्राटिका - कजाग बायको.
· टक लावून पाहणे - एकसारखे रोखून पाहणे.
· टाहो फोडणे - मोठ्याने आकांत करणे.
· टाके ढिले होणे - अतोनात श्रम झाल्यामुळे अंगी ताकत न रहाणे.
· टिकाव लागणे - निभाव लागणे,तगून राहणे.
· टेंभा मिरविणे - दिमाख दाखवणे.
· ठसा उमटवणे - छाप पाडणे.
· ठाण मांडणे - एका जागेवर बसून राहणे.
· डाव साधने - संधीचा फायदा घेऊन कार्य साधने,योजलेल्या युक्तीने इष्ट वस्तू मिळविणे.
· डाळ शिजणे – थारा मिळणे,सोय जुळणे,मनाजोगे काम होणे.
· डाव येणे - खेळात राज्य येणे.
· डोक्यावर घेणे - अति लाड करणे.
· डोळे फिरणे - खूप घाबरणे.
· डोळा असणे – पाळत ठेवणे.
· डोळे उघडणे – अनुभवाने सावध होणे.
· डांगोरा पिटणे - जाहीर वाच्यता करणे.
· डोक्यावर मिरी वाटणे - वरचढ होणे.
· डोके खाजविणे - एखाद्या गोष्टीचा विचार करणे.
· डोळ्यांवर कातडे ओढणे - जाणूनबुजून दुर्लक्ष करणे.
· डोक्यावर खापर फोडणे - एखाद्यावर निष्कारण ठपका ठेवणे.
· डोळ्यांत धूळ फेकणे - फसवणूक करणे.
· डोळा चुकवणे - अपराधी भावनेमुळे नजरेला नजर देणे टाळणे.
· डोळे निवणे - समाधान होणे.
· डोळेझाक करणे – दुर्लक्ष करणे.
· डोळ्याला डोळा न भिडवणे - घाबरून नजर न देणे.
· डोळ्यातून थेंब न काढणे – दु:खद प्रसंग असूनही न रडणे.
· डोळे लावून बसणे - खूप वाट पाहणे.
· डोळे वटारणे - रागाने बघणे.
· डोळे पांढरे होणे – मोठा धक्कादायक प्रसंग ओढवणे.
· डोळ्यांस धारा लागणे – अश्रू वाहणे,रडणे.
· डोळ्यांत खुपणे - सहन न होणे.
· डोळ्यांचे पारणे फिटणे - पूर्ण समाधान होणे.
· डोळ्यात अंजन घालणे – चूक स्पष्टपणे लक्षात आणून देणे.
· डोळे खिळून राहणे - एखाद्या गोष्टीकडे एकसारखे बघत राहणे.
· डोळे दिपवले - थक्क करून सोडणे.
· डोळ्यांत प्राण आणणे - एखाद्या गोष्टीसाठी अतिशय आतुर होणे.
· डोळे फाडून पहाणे - तीक्ष्ण नजरेने पाहणे,आश्चर्यचकित होऊन पाहणे.
· डोळ्यात तेल घालून रहाणे - अतिशय जागृत रहाणे.
· डोळे भरून पहाणे - समाधान होईपर्यंत पाहणे.
· तडीस नेणे - पूर्ण करणे.
· तगादा लावणे – पुन्हा:पुन्हा मागणी करणे.
· ताळ्यावर आणणे - योग्य समज देणे.
· तळपायाची आग मस्तकात जाणे - अतिशय संताप होणे.
· तारांबळ उडणे - अतिशय घाई होणे.
· ताटकळत उभे राहणे - वाट पाहणे.
· तारांबळ होणे - घाईगडबड उडणे.
· ताट वाढणे - जेवायला वाढणे.
· तोंडी लावणे - जेवताना चाखण्यासाठी एखादा पदार्थ देणे.
· तोंड काळे करणे – कायमचे निघून जाणे.
· तिलांजली देणे – सोडणे,त्याग करणे.
· तोंड देणे - मुकाबला करणे,सामना करणे.
· तोंडून अक्षरं न फुटणे - घाबरून न बोलणे.
· तोंड फिरवणे – नाराजी व्यक्त करणे.
· तोंड भरून बोलणे – मनाचे समाधान होईपर्यंत बोलणे,खूप स्तुती करणे.
· तोंड काळे करणे - दृष्टीआड होणे,नाहीसे होणे.
· तोंड सांभाळून बोलणे – जपून बोलणे.
· तोंडाला पाने पुसणे – फसवणे.
· तजवीज करणे - तरतूद करणे.
· तळहातावर शीर घेणे - जीवावर उदार होणे.
· तोंडचे पाणी पळणे - अतिशय घाबरणे,भयभयीत होणे.
· तोंडघशी पाडणे – विश्वासघात होणे,अडचणीत येणे.
· तोंडाला पाणी सुटणे – हाव निर्माण होणे, लालसा उत्पन्न होणे.
· तोंडात बोट घालणे - आश्चर्यचकित होणे.
· तोंडसुख घेणे – दोष देताना वाट्टेल तसे बोलणे.
· तोंड टाकणे – अद्वातद्वा बोलणे.
· तोंडावाटे ‘ब्र’ न काढणे - एकही शब्द न उच्चारणे.
· थांग न लागणे - कल्पना न येणे.
· थुंकी झेलणे - खुशामत करण्यासाठी लाचारी पत्करणे.
· दुमदुमून जाणे - निनादून जाणे.
· दगा देणे – फसवणे.
· दबा धरून बसणे - टपून बसणे.
· दाद मागणे - तक्रार करून किंवा गार्हाणे सांगून न्याय मागणे.
· दात धरणे - वैर बाळगणे.
· दाढी धरणे - विनवणी करणे.
· दगडावरची रेघ - खोटे न ठरणारे शब्द.
· दातांच्या कण्या करणे - अनेक वेळा विनंती करून सांगणे.
· दाती तृण धरणे - शरणागती पत्करणे.
· दक्षता घेणे - काळजी घेणे.
· दडी मारणे - लपून राहणे.
· देहातून प्राण जाणे - मरण येणे.
· दिवस बुडून जाणे - सूर्य मावळणे.
· दिशा फुटेल तिकडे पडणे - सैरावैरा पळणे.
· दप्तरी दाखल होणे - संग्रही जमा होणे.
· देखरेख करणे - राखण करणे.
· देखभाल करणे - जतन करणे.
· दत्त म्हणून उभे राहणे - एकाएकी हजर होणे.
· दातखिळी बसणे - बोलणे अवघड होणे.
· द्राविडी प्राणायाम करणे - सोपा मार्ग सोडून कठीण मार्गाने जाणे.
· दुधात साखर पडणे – अधिक चांगले घडणे.
· दात ओठ खाणे – चीड व्यक्त होणे, द्वेषाची भावना दाखवणे.
· दातखिळी बसणे - बोलती बंद होणे.
· दोन हातांचे चार हात होणे - विवाह होणे.
· देणेघेणे नसणे - संबंध नसणे.
· दुसऱ्याच्या ओंजळीने पाणी पिणे - दुसऱ्याच्या तंत्राने किंवा सल्ल्याने चालणे.
· दातास दात लावून बसणे - काही न खाता उपाशी राहणे.
· दुःखावर डागण्या देणे – दु:खी झालेल्या माणसाला वाईट वाटेल असे बोलून आणखी दुःख देणे.
· धरणे धरणे – हट्ट धरून बसणे.
· धिंडवडे निघणे - फजिती होणे.
· धारातीर्थी पडणे - रणांगणावर मृत्यू येणे.
· धाबे दणाणणे - खूप घाबरणे.
· धूम ठोकणे - वेगाने पळून जाणे.
· धूळ चारणे - पूर्ण पराभव करणे.
· धन्य होणे - कृतार्थ होणे.
· धुडगूस घालणे - गोंधळ करणे.
· धास्ती घेणे - धक्का घेणे,घाबरणे.
· धडपड करणे - खूप कष्ट करणे.
· धारवाडी काटा - बिनचूक वजनाचा काटा.
· नजरेत भरणे - उठून दिसणे.
· नजर करणे - भेटवस्तू देणे.
· नाक मुठीत धरणे - अगतिक होणे.
· नाक घासणे - स्वतःची कार्य साधण्यासाठी दुसर्याचे पाय धरणे.
· निवास करणे – रहाणे.
· नसती बिलामत येणे - नसती कटकट ओढवणे.
· नाक ठेचणे – नक्षा उतरवणे.
· नाक कापणे – घोर अपमान करणे.
· निक्षून सांगणे - स्पष्टपणे सांगणे.
· नाक मुरडणे - नापसंती दाखवणे.
· नूर पातळ होणे - रूप उतरणे.
· नाकावर राग असणे - लवकर चिडणे.
· नाक खुपसणे – नको त्या गोष्टीत उगाचच सहभागी होणे.
· निष्प्रभ करणे - महत्व कमी करणे.
· नाक वर असणे – ऐट,दिमाख किंवा ताठा असणे.
· नाकाला मिरच्या झोंबणे - एखाद्याचे वर्म काढल्यामुळे त्याला राग येणे.
· नाकी नऊ येणे – फार दगदग होणे,मेटाकुटीला येणे,फार त्रास होणे.
· नांगी टाकणे - हातपाय गाळणे.
· नाव मिळवणे - कीर्ती मिळवणे.
· नजर वाकडी करणे - वाईट हेतू बाळगणे.
· नाळ तोडणे - संबंध तोडणे.
· निद्राधीन होणे – झोपणे.
· नाव कमावणे - कीर्ती मिळवणे.
· नाकाने कांदे सोलणे – स्वतःमध्ये दोष असूनही उगाच बढाया मारणे.
· नक्राश्रू ढाळणे - अंतर्यामी आनंद होत असता बाह्यतः दुःख दाखवणे.
· नक्षा उतरवणे - गर्व उतरवणे.
· नाकाशी सूत धरणे - आता मरतो की घटकेने मरतो अशी स्थिती निर्माण होणे.
· पाठीशी घालने - संरक्षण देणे.
· पाणी पडणे - वाया जाणे.
· पोटात कावळे ओरडणे - भुकेने व्याकूळ होणे.
· पाणी मुरणे - कपटाने काहीतरी लपवून ठेवणे,गुप्त कट शिजवत असणे.
· पाणी पाजणे - पराभव करणे.
· पाणी सोडणे - आशा सोडणे.
· पदरात घेणे – स्वीकारणे.
· पडाव पडणे - वस्ती करणे.
· पदरी घेणे - स्वीकार करणे.
· परिपाठ असणे - विशिष्ट पद्धत असणे,नित्यक्रम असणे.
· पाळी येणे - वेळे येणे.
· पाहुणचार करणे - आदरातिथ्य करणे.
· पाठिंबा देणे - दुजोरा देणे.
· पदरात घालने – चूक पटवून देणे,स्वाधीन करणे.
· पाचवीला पुजणे - त्रासदायक गोष्टींची कायमची सोबत असणे.
· पाठ न सोडणे - एखाद्या गोष्टीचा पिच्छा पुरवणे.
· पाढा वाचणे - सविस्तर हकीकत सांगणे.
· पादाक्रांत करणे – जिंकणे.
· पुनरुज्जीवन करणे - पुन्हा उपयोगात आणणे.
· पाचवीला पूजणे - एखादी गोष्ट जन्मापासून असणे.
· पार पाडणे - पूर्ण करणे.
· पाळत ठेवणे - लक्ष ठेवणे.
· पाण्यात पाहणे - अत्यंत द्वेष करणे.
· पाय मोकळे करणे – फिरायला जाणे.
· पराचा कावळा करणे - मामुली गोष्टीला भलतेच महत्त्व देणे.
· पाऊल वाकडे पडणे - वाईट मार्गाने जाणे.
· पायाखाली घालने - पादाक्रांत करणे.
· पुंडाई करणे - दांडगाईने वागणे.
· पाठ दाखवणे - पळून जाणे.
· पाठ थोपटणे – शाब्बासकी देणे,कौतुक करणे.
· प्रतिबंध करणे - अटकाव करणे.
· प्रेरणा मिळणे - स्फूर्ती मिळणे.
· पायमल्ली करणे - उपमर्द करणे.
· पोटात कावळे काव काव करणे - अतिशय भूक लागणे.
· पोटात घालणे - क्षमा करणे.
· पोटात ठेवणे – गुपित सांभाळणे.
· पोटात शिरणे - मर्जी संपादन करणे.
· पोटावर पाय देणे – रोजंदारी बंद करणे,उदरनिर्वाहाचे साधन काढून घेणे.
· पोटाची दमडी वळणे - खायला न मिळणे.
· पदरमोड करणे - दुसऱ्यासाठी स्वतःचा पैसा खर्च करणे.
· पोटाला चिमटा घेणे - पोटाला न खाता राहणे.
· पोटात ब्रह्मराक्षस उठणे - खूप खावेसे वाटणे.
· पिंक टाकणे - थुंकणे
· प्रश्नांची सरबत्ती करणे - एकसारखे प्रश्न विचारणे.
· प्राण कानांत गोळा होणे - ऐकण्यासाठी अतिशय उत्सुक होणे.
· प्राणावर उदार होणे - जिवाची पर्वा न करणे.
· प्रचारात आणणे - जाहीरपणे माहिती देणे.
· प्रतिष्ठापीत करणे - स्थापना करणे.
· प्राणाला मुकणे - जीव जाणे,मरण येणे.
· प्रक्षेपित करणे - प्रसारित करणे.
· प्रतिकार करणे - विरोध करणे.
· प्रत्यय येणे - प्रचीती येणे.
· प्रतिष्ठा लाभणे - मान मिळणे.
· प्रस्ताव ठेवणे - ठराव मांडणे.
· प्राप्त करणे – मिळवणे.
· पोटात ठेवणे - गुप्तता ठेवणे.
· पहारा देणे - राखण करणे.
· पुढाकार घेणे - नेतृत्व करणे.
· प्रघात पडणे - रीत असणे.
· पार पाडणे - सांगता करणे,संपवणे,संपन्न होणे.
· प्रभावित होणे – छाप पडणे.
· परिसीमा गाठणे – परकोटीला जाणे.
· पसंती मिळणे - अनुकूलता लाभणे.
· फटफटणे - सकाळ होणे .
· फाटे फोडणे - उगाच अडचणी निर्माण करणे.
· फुटाण्यासारखे उडणे - झटकन राग येणे.
· फिदा होणे - खुश होणे.
· फंदात न पडणे - भानगडीत न अडकणे.
· बट्ट्याबोळ होणे - विचका होणे.
· ब्रभ्रा करणे - बोभाटा करणे,सगळीकडे प्रसिद्ध करणे.
· बारा वाजणे - पूर्ण नाश होणे.
· बस्तान ठोकणे - मुक्काम ठोकणे.
· बळ लावणे - शक्ती खर्च करणे.
· बादरायण संबंध असणे - ओढून ताणून लावलेला संबंध असणे.
· बत्तीशी रंगवणे - जोराने थोबाडीत मारणे.
· बुचकळ्यात पडणे - गोंधळून जाणे.
· बेत हाणून पाडणे - बेत सिद्धीला जाऊ न देणे.
· बारा गावचे पाणी पिणे - विविध प्रकारचे अनुभव घेणे.
· बाजारगप्पा – निंदा नालस्ती.
· बावरणे – गोंधळणे.
· बडेजाव वाढवणे - प्रौढी मिरवणे.
· बांधणी करणे - रचना करणे.
· बाहू स्फुरण पावणे - स्फूर्ती येणे.
· बत्तरबाळ्या होणे - चिंध्या होणे,नासधूस होणे.
· बेत आखणे - योजना आखणे.
· बेत करणे - योजना आखणे.
· बहिष्कार टाकणे - वाळीत टाकणे नकार देणे.
· बोचणी लागणे - एखादी गोष्ट मनाला लागून राहणे.
· बोटावर नाचवणे - आपल्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याला वागायला लावणे.
· बोल लावणे - दोष देणे.
· बोळ्याने दूध पिणे - बुद्धिहीन असणे.
· बोला फुलाला गाठ पडणे - दोन गोष्टींची सहजासहजी एक वेळ जमून येणे.
· भगीरथ प्रयत्न करणे - चिकाटीने प्रयत्न करणे.
· भान नसणे - जाणीव नसणे.
· भानावर येणे - परिस्थितीची जाणीव होणे,शुद्धीवर येणे.
· भाऊबंदकी असणे - नात्यानात्यात भांडण असणे.
· भंडावून सोडणे - त्रास देणे.
· भडभडून येणे - हुंदके देणे,गलबलणे.
· भ्रमण करणे - भटकंती करणे.
· भरारी मारणे - झेप घेणे.
· भान ठेवणे - जाणीव ठेवणे.
· भरभराट होणे - प्रगती होणे,समृद्धी होणे.
· भारून टाकणे - पूर्णपणे मोहून टाकणे.
· मनात मांडे खाणे - व्यर्थ मनोराज्य करणे.
· मान ताठ ठेवणे – स्वाभिमानाने वागणे.
· माशा मारणे - कोणताही उद्योग न करणे.
· माशी शिंकणे - अडथळा येणे.
· मिशीवर ताव मारणे - बढाई मारणे.
· मधून विस्तव न जाणे - अतिशय वैर असणे.
· मूग गिळणे - उत्तर न देता गप्प राहणे.
· मधाचे बोट लावणे - आशा दाखवणे.
· मनात घर करणे - मनात कायमचे राहणे.
· मन मोकळे करणे - सुखदुःखाच्या गोष्टी बोलून दाखविणे.
· मनाने घेणे - मनात पक्का विचार येणे.
· मन सांशक होणे - मनात संशय वाटू लागणे.
· मनोरथ पूर्ण होणे - इच्छा पूर्ण होणे.
· मनावर ठसणे - मनावर जोरदारपणे बिंबणे.
· मशागत करणे - मेहनत करून निगा राखणे.
· मात्रा चालणे - योग्य परिणाम होणे.
· मागमूस नसणे - थांगपत्ता नसणे.
· मान्यता पावणे - सिद्ध होणे.
· मात करणे - विजय मिळवणे.
· मांडीवर घेणे – दत्तक घेणे.
· मोहाला बळी पडणे - एखाद्या गोष्टीच्या आसक्तीमध्ये वाहून जाणे.
· मुखोद्गत असणे – तोंडपाठ असणे.
· मनावर बिंबवणे - मनावर ठसवणे.
· मती गुंग होणे - आश्चर्य वाटणे.
· मिशांना तूप लावणे - उगीच ऐट दाखवणे.
· मिनतवारी करणे – दादा-पुता करणे.
· यक्षप्रश्न असणे - महत्त्वाची गोष्ट असणे.
· योगक्षेम चालविणे - रक्षणाची काळजी वाहणे.
· रक्ताचे पाणी करणे - अतिशय मेहनत करणे.
· राईचा पर्वत करणे – क्षुल्लक गोष्टीला उगाच मोठे स्वरूप देणे.
· राख होणे - पूर्णपणे नष्ट होणे.
· राब राब राबणे - सतत खूप मेहनत करणे.
· राम नसणे - अर्थ नसणे.
· रस असणे - अत्यंत आवड असणे.
· राबता असणे - सतत ये-जा असणे.
· रवाना होणे - निघून जाणे.
· रुची निर्माण होणे - गोडी निर्माण होणे.
· राम म्हणणे - शेवट होणे,मृत्यू येणे.
· रोष ठेवणे - नाराजी असणे,चीड येणे.
· रक्षणाची काळजी घेणे - योगक्षेम चालविणे.
· रियाज करणे - सराव करणे.
· लष्कराच्या भाकर्या भाजणे - दुसऱ्यांच्या उठाठेवी करणे.
· लहान तोंडी मोठा घास घेणे - आपणास न शोभेल अशा प्रकारे वरचढपणा दाखवणे.
· लक्ष वेधून घेणे - लक्ष ओढून घेणे.
· लळा लागणे - ओढ वाटणे.
· ललकारी देणे - जयघोष करणे.
· लांछनास्पद असणे – लाजिरवाणे असणे.
· लवलेश नसणे - जराही पत्ता नसणे,जराही न उरणे.
· लष्टक लावणे - झंझट लावणे,निकड लावणे.
· लक्ष्मीचा वरदहस्त असणे - लक्ष्मीची कृपा असणे,श्रीमंती असणे.
· लौकिक मिळवणे - सर्वत्र मान मिळवणे.
· वकीलपत्र घेणे - एखाद्याची बाजू घेणे.
· वाचा बंद होणे - तोंडातून एक शब्दही बाहेर न पडणे.
· वाट लावणे - विल्हेवाट लावणे,मोडूनतोडून टाकणे .
· वाटाण्याच्या अक्षता लावणे - स्पष्टपणे नाकारणे.
· वठणीवर आणणे - ताळ्यावर आणणे.
· वणवण भटकणे - एखादी गोष्ट मिळवण्यासाठी खूप फिरणे.
· वाचा बसणे - एक शब्दही बोलता न येणे.
· विहरणे - संचार करणे.
· वाट तुडवणे - रस्ता कापणे.
· विरोध दर्शवणे - प्रतिकार करणे.
· विसावा घेणे - विश्रांती घेणे.
· वजन पडणे – प्रभाव पडणे.
· व्रत घेणे - वसा घेणे.
· वणवण करणे - खूप भटकणे.
· विपर्यास होणे – असंगत अर्थ लावणे.
· विरस होणे - निराशा होणे,उत्साहभंग होणे.
· वारसा देणे - वडिलोपार्जित हक्क सोपवणे.
· वंचित रहाणे - एखादी गोष्ट न मिळणे.
· वरदान देणे - कृपाशीर्वाद देणे.
· विचलित होणे - मनाची चलबिचल होणे.
· विसंवाद असणे - एकमेकांशी न जमणे.
· वड्याचे तेल वांग्यावर काढणे - एकाचा राग दुस-यावर काढणे.
· विडा उचलणे - निश्चय किंवा प्रतिज्ञा करणे.
· विदीर्ण होणे - भग्न होणे,मोडतोड होणे.
· वेड घेऊन पेडगावला जाणे - मुद्दाम ढोंग करणे.
· वेसण घालणे - मर्यादा घालणे.
· शब्द जमिनीवर पडू न देणे - दुसऱ्याच्या इच्छेनुसार लगेच कार्यवाही करणे.
· शहानिशा करणे - एखाद्या गोष्टीबाबत चौकशी करून खात्री करून घेणे.
· शिगेला पोचणे - शेवटच्या टोकाला जाणे.
· शंभर वर्षे भरणे - नाश होण्याची वेळ येणे.
· सर्वस्व पणाला लावणे - सर्व शक्य मार्गांचा अवलंब करणे.
· साखर पेरणे - गोड गोड बोलून आपलेसे करणे.
· सामोरे जाणे - निधड्या छातीने संकटास तोंड देणे.
· साक्षर होणे - लिहिता-वाचता येणे.
· सहभागी होणे - सामील होणे.
· सपाटा लावणे - एकसारखे वेगात काम करणे.
· समरस होणे - गुंग होणे.
· सख्य नसणे - मैत्री नसणे.
· सूड घेणे - बदला घेणे.
· सही ठोकणे - निश्चित करणे.
· सहीसलामत सुटणे - दोष न येता सुटका होणे.
· सांगड घालणे - मेळ साधणे.
· साक्षात्कार होणे - आत्मिक ज्ञान प्राप्त होणे,खरेखुरे स्वरूप कळणे.
· साद घालणे - मनातल्या मनात दुःख करणे.
· सुताने स्वर्गाला जाणे - थोडा सुगावा लागताच संपूर्ण गोष्टीचे स्वरूप तर्काने जाणण्याचा प्रयत्न करणे.
· सोन्याचे दिवस येणे - अतिशय चांगले दिवस येणे.
· सूतोवाच करणे - पुढे घडणार्या गोष्टींची प्रस्तावना करणे.
· संधान बांधने - जवळीक निर्माण करणे.
· संभ्रमात पडणे - गोंधळात पडणे.
· संभ्रमित होणे – गोंधळणे.
· सोटेशाई चालवणे - दांडगाई करणे.
· सारसरंजाम असणे - सर्व साहित्य उपलब्ध असणे.
· समजूत काढणे – समजावणे.
· स्तंभित होणे - आश्चर्याने स्तब्ध होणे.
· सुळकांडी मारणे - सूर मारणे.
· सख्य नसणे - प्रेमळ नाते नसणे.
· स्वप्न भंगणे - मनातील विचार कृतीत न येणे.
· स्वर्ग दोन बोटे उरणे – आनंदाने,गर्वाने अतिशय फुगून जाणे.
· सांजावणे - संध्याकाळ होणे.
· साशंक होणे - शंका येणे.
· हट्टाला पेटणे - मुळीच हट्ट न सोडणे.
· हमरीतुमरीवर येणे - जोराने भांडू लागणे.
· हरभऱ्याच्या झाडावर चढवणे - खोटी स्तुती करून मोठेपणा देणे.
· हसता हसता पुरेवाट होणे - अनावर हसू येणे.
· हस्तगत करणे - ताब्यात घेणे.
· हातपाय गळणे - धीर सुटणे.
· हातचा मळ असणे – सहज शक्य असणे.
· हातघाईवर येणे – भांडणाची वेळ येणे.
· हुडहुडी भरणे - थंडी भरणे.
· हात ओला होणे - फायदा होणे.
· हात टेकणे - नाइलाज झाल्याने माघार घेणे.
· हात देणे - मदत करणे.
· हात मारणे - ताव मारणे,भरपूर खाणे.
· हाय खाणे - धास्ती घेणे.
· हात चोळणे – चरफडणे.
· हातावर तुरी देणे - डोळ्यांदेखत फसवून निसटून जाणे.
· हात हलवत परत येणे - काम न होता परत येणे.
· हात झाडून मोकळे होणे - जबाबदारी अंगाबाहेर टाकणे किंवा जबाबदारी टाळून मोकळे होणे.
· हाता पाया पडणे - गयावया करणे.
· हातात कंकण बांधणे - प्रतिज्ञा करणे.
· हाताला हात लावणे - थोडीदेखील मेहनत न घेता फुकटचे श्रेय घेणे.
· हातावर शिर घेणे - जिवावर उदार होणे किंवा प्राणांचीही पर्वा न करणे.
· हात धुऊन पाठीस लागणे - चिकाटीने एखाद्या गोष्टीच्या मागे लागणे.
· हुल देणे - चकवणे.
· हात न पसरणे - न मागणे.
· हात राखून जेवणे – कमी जेवणे.
· हिसका दाखविणे - बळ दाखवून किंमत लक्षात आणून देणे.
· हाडीमांसी भिनणे - अंगात मुरणे.
· हवालदिल होणे - हताश होणे.
· हशा पिकणे - हास्य स्फोट होणे.
· हंबरडा फोडणे - मोठ्याने रडणे.
· हसता हसता पोट दुखणे - खूप हसणे.
· हेवा वाटणे – मत्सर वाटणे.
· हातभार लावणे - सहकार्य करणे.
· हौस भागवणे - आवड पुरवून घेणे.
· श्रीगणेशा करणे - आरंभ करणे.
➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment