" शाळेतील नाविन्यपूर्ण उपक्रम . १)आदर्श परीपाठ २)मराठी भाषेत परीपाठ 3)इंग्रजी भाषेत परीपाठ ४)दिनांकानुसार पाढा ५)बोधकथा ६)चित्रकला स्पर्धा ७)वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ८)सांस्कृतिक कार्यक्रम ९)गीतगायन स्पर्धा १०)भाषण स्पर्धा ११)क्रीडा स्पर्धा १२)वाढदिवस साजरे करणे। १३)भित्तिपत्रक तयार करणे १४)निसर्गसहल १२)स्वच्छता सप्ताह साजरा करणे १३)विद्यार्थी दत्तक घेणे १४)विविध जयंत्या व पुण्यतिथी १५)बचत बँक १६)हस्ताक्षर सुधार १७)हजेरी घेताना इंग्रजी शब्द १८)वाचन कट्टा १९)बाजार २०)परसबाग २१)उपस्थिती ध्वज २२)इंग्रजी संभाषण २३)शब्द बँक २४)स्वच्छ मुलगा-मुलगी २५)दत्तक कुंडी प्रकल्प २६)तंबाखू मुक्त शाळा २७)दत्तक मित्र २८)वर्तमानपत्र वाचन २९)विविध क्रीडा स्पर्धा ३०)चित्रकला स्पर्धा, ३१)निबंध लेखन ३२)वक्तृत्व स्पर्धा आयोजन ३३)हस्ताक्षर स्पर्धा ३४)दप्तराविना शाळा ३५)शब्द बाग Garden of words ३६)हस्ताक्षर सुधार प्रकल्प ३७)राजा काय म्हणतात ३८)प्रश्न आमचे ,उत्तर आमचे ३९)वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन ४०)शिक्षकाचे व विद्यार्थ्यांचे सत्कार ४१)कला, कार्यानुभव कोपरे ४२)बाल आनंद मेळावे ४३)विविध विषयावर तज्ञांचे मार्गदर्शन ४४)प्रवेशोत्सव ४५)100% पटनोंदणी ४६)लघु उद्योगाला भेटी ४७)हरित शाळा ४८)पक्ष्यांना खाऊ ४९)ज्ञानरचनावादी साहित्य ५०)डिजीटल शाळा ५१)आनंदायी शाळा, Happy school स्कूल"

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत वृक्षारोपण*



*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक  शाळेत वृक्षारोपण*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज दिनांक 27/7/2021 रोजी वृक्ष लावून आज शाळेत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके, महिला सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, गजानन नरहरे, श्री नवनाथ कच्छवे , अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व राजकुमार श्रीमंगले व वर्षा श्रीमंगले अन्य जण यांच्या हस्ते शाळेत व शालेय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले व तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व श्रीमती अंजली लोहारकर यांनी पर्यावरण व वृक्ष किती महत्वाचे आहे या बद्दल सविस्तर माहिती दिली व पर्यावरणाचे महत्त्व सांगितले. आज या कोरोना महामारीच्या वातावरण आॅक्सीजन किती महत्वाचे आहे हे सर्वांना समजले आहे. कित्येक रुग्ण आॅक्सीजन अभावानेच मृत्यू पावले आहे. त्यामुळे प्रत्येकाने एक झाड लावून संवर्धन करणे आवश्यक आहे असे सांगितले व उपस्थित सर्वांनी वृक्ष लावून जगवण्याचे टिकवण्याचे हमी दिली. वृक्षारोपण करण्यासाठी उपस्थित असलेल्या सर्वांचे  आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.*
































No comments:

Post a Comment

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने  श्रीकृष्ण जन्माष्टमी दहीहंडीचा उत्सव आयोजित* ------------------------------------- तिवटग्याळ...