Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, September 23, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला शिक्षीकेचा वाढदिवस







































*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी साजरा केला आपल्या शिक्षिकेचा वाढदिवस*

*तिवटग्याळ - जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे आज  दिनांक 21/9/2021 रोजी शालेय परिपाठा नंतर शाळेतील विद्यार्थी प्रिय व उपक्रमशील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांचा वाढदिवस असल्याने शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन वर्ग, फळा व टेबलावर अतिशय सुंदर फुलांची मांडणी करून मॅडम ला पुष्पहार व शाल तसेच केप कापून वाढदिवस अतिशय आनंदाने साजरा केला. तद्नंतर वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या Happy birthday to you many Many happy returns of the day अशा सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या. तद्नंतर शाळेतील मॅडम श्रीमती अंजली लोहारकर यांनी विद्यार्थ्यांचे आभार मानून विद्यार्थ्यांनी माझा वाढदिवस अतिशय उत्साहाने व आनंददाने साजरा केल्या बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले व अशाच उत्साहाने आपण नियमित शाळेत यावे, अभ्यास करावे स्वत : ची व शाळेची प्रगती करावी असे सांगितले व शालेय गुणवत्ता वाढीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, श्रीमती भागाबाई बिरादार, वर्षा श्रीमंगले व श्रीदेवी कोरे आदी जण उपस्थित होते*

Wednesday, September 22, 2021

अभ्यासमाला क्रमांक 75

*==================*

*_नियोजित-महाराष्ट्र शिक्षक पॅनल Msp च्या वतीने सहविचार मंथन बैठक ....._*

       *🥀कार्यक्रमाचे स्थळ👏*
*======================*
*_👉भद्रा हनुमान,खुलताबाद_*
*स्थळ - हाॅटेल अन्नपूर्णा पेट्रोल पंप जवळ खूलताबाद, जिल्हा औरंगाबाद.*
*_दिनांक १७ आँक्टोबर २०२१_* 
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*༺꧁ Ⓜ💲🅿️꧂༻*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
====================
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  अभ्यासमाला क्रमांक - 75
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
  
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 21/9/ 2021* 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
👇👇

https://testmoz.com/q/3783446

*इयत्ता पाचवी ते आठवी साठी सा.विज्ञान विषयातील महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग*
*प्रयोग क्रमांक 15*
*प्रयोगाचे नाव- दुहेरी शंकू*
*प्रयोग पाहण्यासाठी खालील लिंक टच करा*
https://www.youtube.com/channel/UCrXH6LDjiU36p_Cm3GOk0FA

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
*टिप= सर्व प्रश्र्न सोडवल्यानंतर Submit बटन क्लिक करावे, Submit केल्या नंतर सर्व प्रश्र्नाचे उत्तर वहित टिपन (लिहून ठेवावे.)*
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण कोविशील्ड दुसरा डोस लस मोहीम राबविण्यात आले या बद्दल प्रसारित झालेली शैक्षणिक बातमी



Tuesday, September 21, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण कोविशील्ड दुसरा डोस लस मोहीम आयोजित


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड लसीकरण कोविशील्ड दुसरा डोस लस मोहीम आयोजित*

                   *जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 20/9/2021 रोजी  कोविड लसीकरण मोहीम आयोजित करून कोविशील्ड  ची दुसरी लस वय वर्ष 18 ते पुढील वर्षीपर्यंत तिवटग्याळ गावातील तरुण व जेष्ठांना असे एकूण 150 जणांना कोविशील्ड लस देण्यात आली. तद्नंतर दुपार वेळी उपस्थित सर्व कर्मचारी यांना पोलीस पाटील श्री   धनराज पाटील यांनी स्व खर्चाने सर्वाना  भोजनाची व्यवस्था केली. यावेळी डॉ. अंंतेश्वर हावण्णा, आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती येलमटे एस. पी., श्री खटके परमेश्वर,श्रीमती तवर सिस्टर श्रीमती अंजली लोहारकर व मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी  मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, गावचे पोलीस पाटील   धनराज पाटील, सरपंच उज्ज्वला ताई नरहरे,ग्राम पंचायत सदस्य श्री कैलास तवर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके व शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे आदी जण यांनी  उपस्थित होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना social distance, sanitizer,, Handwash  व mask याचा अनिवार्य वापर करावा असे सांगितले व गावातील 18 वर्षांवरील व त्यापेक्षा जास्त जेष्ठांना लस घेण्यासाठी जन जाग्रती केली. आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे यांनी गावात घरोघरी जाऊन पात्र लोकांना बोलावून दुसरी घेस प्रवृत्त केले. कोविड - 19 नियमांचे पालन करुन उपस्थित सर्व पात्र नागरीकांनी कोविशील्ड लस घेतली. उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*












Sunday, September 19, 2021

अभ्यासमाला क्रमांक 74

*==================*

*_नियोजित-महाराष्ट्र शिक्षक पॅनल Msp च्या वतीने सहविचार मंथन बैठक ....._*

       *🥀कार्यक्रमाचे स्थळ👏*
*======================*
*_👉भद्रा हनुमान,खुलताबाद_*
*स्थळ - हाॅटेल अन्नपूर्णा पेट्रोल पंप जवळ खूलताबाद, जिल्हा औरंगाबाद.*
*_दिनांक १७ आँक्टोबर २०२१_* 
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*༺꧁ Ⓜ💲🅿️꧂༻*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
====================
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  अभ्यासमाला क्रमांक - 74
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
  
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 19/9/ 2021* 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
👇👇

https://testmoz.com/q/3783446

*इयत्ता पाचवी ते आठवी साठी सा.विज्ञान विषयातील महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग*
*प्रयोग क्रमांक 15*
*प्रयोगाचे नाव- दुहेरी शंकू*
*प्रयोग पाहण्यासाठी खालील लिंक टच करा*
https://www.youtube.com/channel/UCrXH6LDjiU36p_Cm3GOk0FA

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
*टिप= सर्व प्रश्र्न सोडवल्यानंतर Submit बटन क्लिक करावे, Submit केल्या नंतर सर्व प्रश्र्नाचे उत्तर वहित टिपन (लिहून ठेवावे.)*
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 74

*==================*

*_नियोजित-महाराष्ट्र शिक्षक पॅनल Msp च्या वतीने सहविचार मंथन बैठक ....._*

       *🥀कार्यक्रमाचे स्थळ👏*
*======================*
*_👉भद्रा हनुमान,खुलताबाद_*
*स्थळ - हाॅटेल अन्नपूर्णा पेट्रोल पंप जवळ खूलताबाद, जिल्हा औरंगाबाद.*
*_दिनांक १७ आँक्टोबर २०२१_* 
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*༺꧁ Ⓜ💲🅿️꧂༻*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
====================
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  अभ्यासमाला क्रमांक - 74
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
  
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 19/9/ 2021* 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
👇👇

https://testmoz.com/q/3783446

*इयत्ता पाचवी ते आठवी साठी सा.विज्ञान विषयातील महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग*
*प्रयोग क्रमांक 15*
*प्रयोगाचे नाव- दुहेरी शंकू*
*प्रयोग पाहण्यासाठी खालील लिंक टच करा*
https://www.youtube.com/channel/UCrXH6LDjiU36p_Cm3GOk0FA

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
*टिप= सर्व प्रश्र्न सोडवल्यानंतर Submit बटन क्लिक करावे, Submit केल्या नंतर सर्व प्रश्र्नाचे उत्तर वहित टिपन (लिहून ठेवावे.)*
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 74

*==================*

*_नियोजित-महाराष्ट्र शिक्षक पॅनल Msp च्या वतीने सहविचार मंथन बैठक ....._*

       *🥀कार्यक्रमाचे स्थळ👏*
*======================*
*_👉भद्रा हनुमान,खुलताबाद_*
*स्थळ - हाॅटेल अन्नपूर्णा पेट्रोल पंप जवळ खूलताबाद, जिल्हा औरंगाबाद.*
*_दिनांक १७ आँक्टोबर २०२१_* 
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*༺꧁ Ⓜ💲🅿️꧂༻*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
====================
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  अभ्यासमाला क्रमांक - 74
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
  
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 19/9/ 2021* 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
👇👇

https://testmoz.com/q/3783446

*इयत्ता पाचवी ते आठवी साठी सा.विज्ञान विषयातील महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग*
*प्रयोग क्रमांक 15*
*प्रयोगाचे नाव- दुहेरी शंकू*
*प्रयोग पाहण्यासाठी खालील लिंक टच करा*
https://www.youtube.com/channel/UCrXH6LDjiU36p_Cm3GOk0FA

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
*टिप= सर्व प्रश्र्न सोडवल्यानंतर Submit बटन क्लिक करावे, Submit केल्या नंतर सर्व प्रश्र्नाचे उत्तर वहित टिपन (लिहून ठेवावे.)*
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

अभ्यासमाला क्रमांक 73

*==================*

*_नियोजित-महाराष्ट्र शिक्षक पॅनल Msp च्या वतीने सहविचार मंथन बैठक ....._*

       *🥀कार्यक्रमाचे स्थळ👏*
*======================*
*_👉भद्रा हनुमान,खुलताबाद_*
*स्थळ - हाॅटेल अन्नपूर्णा पेट्रोल पंप जवळ खूलताबाद, जिल्हा औरंगाबाद.*
*_दिनांक १७ आँक्टोबर २०२१_* 
▬▬▬▬ ❚❂❚❂❚▬▬▬▬
*༺꧁ Ⓜ💲🅿️꧂༻*
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040

*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर*
====================
    🛑 *महाराष्ट्र शिक्षक पॅनल* 🛑
   🛏🛏🛏Ⓜ💲🅿🛏🛏🛏
            
  अभ्यासमाला क्रमांक - 73
             ╭════●●●════╮
              *Learn from home*
  
*विषय गणित व इंग्रजी*
*सर्व इयत्तेसाठी उपयुक्त*
*प्रश्नमंजुषा विद्यार्थ्यांसाठी*
*दिनांक 18/9/ 2021* 

आजची प्रश्नमंजुषा पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लीक करावे
👇👇

https://testmoz.com/q/3783446

*इयत्ता पाचवी ते आठवी साठी सा.विज्ञान विषयातील महत्त्वपूर्ण नाविन्यपूर्ण विज्ञान प्रयोग*
*प्रयोग क्रमांक 15*
*प्रयोगाचे नाव- दुहेरी शंकू*
*प्रयोग पाहण्यासाठी खालील लिंक टच करा*
https://www.youtube.com/channel/UCrXH6LDjiU36p_Cm3GOk0FA

ही पोस्ट आपल्या विद्यार्थी, शिक्षक व पालकां पर्यंत पोहोचवावे.जेणे करून learn from home फायदा होईल.
*टिप= सर्व प्रश्र्न सोडवल्यानंतर Submit बटन क्लिक करावे, Submit केल्या नंतर सर्व प्रश्र्नाचे उत्तर वहित टिपन (लिहून ठेवावे.)*
  📖━━━━Ⓜ💲🅿━━━━📖
     *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल🌀*
        *ज्ञानेश्वर बडगे, उदगीर*
        *📱9421901611📱*
  ═══════🦋🦋═══════
▂▃▅▓▒░Ⓜ💲🅿░▒▓▅▃▂
    *🌀 महाराष्ट्र शिक्षक पॅनल 🌀*

Saturday, September 18, 2021

थोडेसे माय-बापासाठी पण...... या उपक्रमांतर्गत तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 60 वर्षांवरील व्यक्तींचे आरोग्य तपासणी शिबीर आयोजित केले आहे या बद्दल प्रसारित झालेली शैक्षणिक बातमी



मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा केला बद्दल प्रसारित झालेली शैक्षणिक बातमी





थोडेसे माय-बापासाठी पण....... या उपक्रमांतर्गत तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे 60 वर्षावरील व्यक्तींचे आरोग्य शिबीर आयोजित

*थोडेसे माय बापासाठी पण..........* 

*या उपक्रमांतर्गत तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 60 वर्षावरील व्यक्तींचे आरोग्य तपासणी मोहीम आयोजित*

                   जिल्हा परिषद  प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे दिनांक 17/9/2021 रोजी थोडेसे माय-बापासाठी पण.... या उपक्रमांतर्गत 60 वर्षावरील व्यक्तींचे B. P., sugar, blood तपासणी मोहीम आयोजित करून 60  ते पुढील वर्षीपर्यंत तिवटग्याळ गावातील महिला व पुरुष जेष्ठांना शाळेत बोलावून B. P., Sugar, blood तपासणी केली. यावेळी डॉ. अंंतेश्वर हावण्णा, आरोग्य खात्याचे कर्मचारी श्रीमती येलमटे एस. पी., श्री खटके परमेश्वर. आशा कार्यकर्ती श्रीमती श्रीदेवी कोरे, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, सरपंच उज्ज्वला ताई नरहरे, ग्राम पंचायत चे सेवक प्रविण कांबळे, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर आदी जण यांनी  उपस्थित होते. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्वांना social distance, sanitizer,, Handwash  व mask याचा अनिवार्य वापर करावा असे सांगितले व या आरोग्य अधिकारी टिम ला सहकार्य केले. गावातील 60 वर्षावरी जेष्ठांना B. P., sugar, blood तपासून घेण्यासाठी  जन जाग्रती केली. कोविड - 19 नियमांचे पालन करुन उपस्थित सर्व पात्र नागरीकांनी तपासणी मोहीमेत सहभाग घेतला. उपस्थित आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले




















Friday, September 17, 2021

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा


*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा* 

तिवटग्याळ ....... तिवटग्याळ ता. उदगीर जि लातूर येथील तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत दिनांक 17/9/2021 रोजी सोशल डिशटंश नियमाचे पालन करुन 74 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रथम शाळेतील सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रमेश साळुंके व गावातील प्रतिष्ठित नागरिक, शिक्षण प्रेमी यांच्या उपस्थितीत शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. .तद्नंतर  शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर यांनी 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिना विषयावर सविस्तर माहिती दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे  यांनी आपले मनोगत भाषणातव्यक्त केले. तसेच या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, सरपंच सौ उज्ज्वला ताई नरहरे, गजानन नरहरे पोलीस पाटील धनराज पाटील, ग्रामपंचायत सदस्य कैलास तवर, 
 ग्राम सेवक प्रशांत ढगे,  अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार, मदतनीस श्रीमती भामाबाई बिरादार, ग्राम पंचायत चे सेवक प्रविण कांबळे, शालेय पोषण आहार मदतनीस वर्षा श्रीमंगले व राजकुमार श्रीमंगले  आदी जण शिक्षण प्रेमी नागरिक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले.








Thursday, September 16, 2021

दैनिक राजधर्म चे जेष्ठ पत्रकार आदरणीय अंबादास जी आलमखाने यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी अतिशय सुंदर लेख प्रकाशित केले त्या बद्दल सरांचे मनःपुर्वक आभार



दैनिक राजधर्म चे जेष्ठ पत्रकार आदरणीय अंबादास जी आलमखाने यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाविषयी अतिशय सुंदर लेख प्रकाशित केले त्या बद्दल सरांचे मनःपुर्वक आभार


मराठवाडा मुक्ती संग्राम दिन 


आज आपण मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा 73 वा वर्धापनदिन मराठवाड्यात सर्वत्र उत्साहाने साजरा करीत आहोत. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. परंतू त्यानंतरही मराठवाडा हैद्राबाद येथील निजाम संस्थानाच्या राजवटीखाली होते. देशात त्यावेळी अस्तित्वात असलेली संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली होती. मात्र हैद्राबाद, काश्मीर आणि जुनागढ ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. स्वातंत्र्यापूर्वीपासून मराठवाडा प्रदीर्घ काळ निजामाच्या हैद्राबाद राज्याचा भाग होता. भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या बरोबरीनेच हा हैद्राबाद मुक्तीसंग्राम लढला गेला.
हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान बहाद्दूर नियामुद्दौला निजाम-उल मुल्क आसफजाह याचे राज्य होते. निझामाच्या राजवटीची पाठराखण करणाऱ्या रझाकार संघटनेने ही चळवळ दडपून टाकण्यासाठी हिंसक मार्ग अवलंबला तेव्हा त्याला उत्तर देण्यासाठी सशस्त्र लढा उभारण्यात आला. निजामांच्या या अत्याचारातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण हैदराबाद संस्थानात मुक्ती संग्राम सुरु झाला होता. तेव्हा मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मोठ्या प्रमाणात लढा उभारण्यात आला होता.
हैद्राबाद संस्थानामध्ये मराठवाडा, तेलंगणा आणि कर्नाटकचा काही भाग सामील होता. हैद्राबाद संस्थानातून भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी मुक्ती संग्राम सुरु झाल्यावर निजामाचा सेनापती कासीम रझवी याने जनतेवर अनेक अत्याचार सुरु केले. या अत्याचारास प्रत्युत्तर देण्यासाठी दुसऱ्या बाजूला मुक्ती संग्राम लढा अधिक गती घेत होता. मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात अनंत भालेराव, गोविंदभाई श्रॉफ, विजयेंद्र काबरा, दिंगबरराव बिंदू, रवीनारायण रेड्डी, देवीसिंग चौहान, भाऊसाहेब वैशंपायन, बाबासाहेब परांजपे आदी नेत्यांनी या लढ्यात महत्वाचे कार्य केले.
आपल्या जीवाची पर्वा न करता मराठवाड्याच्या गावागावातून हा संग्राम लढण्यासाठी अनेक स्वातंत्र्यवीर पुढे आले. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील जरुळ गावातील भाऊराव भिमाजी मतसागर यांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात त्यांचे तसेच सर्व कुटुंबाचे योगदान व उचललेले कष्ट विशेष उल्लेखनिय होय. बदनापूर तालुक्यातील धोपटश्वर येथील दगडाबाई शेळके, बर्दापूर पोलीस ठाणे उडवून देणारे लातूरचे हरिश्चंद्रजी जाधव, रोहिल्यांना जेरीस आणणारे बीडचे विठ्ठलराव काटकर, परभणीत रझाकारांना हुसकावून लावणारे सूर्यभान पवार, विनायकराव चारठाणकर, विश्वनाथराव कातनेश्वरकर, नांदेड येथील देवरावजी कवळे, जीवनराव बोधनकर, मराठवाड्यात निजामाच्या पंतप्रधानास रोखण्यासाठी पूल उडवून देणारे काशीनाथ कुलकर्णी, नळदूर्ग सर करणारे उस्मानाबाद जिल्ह्यातील होटी गावचे जनार्दन होर्टीकर गुरुजी, तर हिंगोली जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील गोरेगावकर, दीपाजी पाटील दातीकर, बर्हिजी शिंदे वापटीकर, बापुराव शिंदे वापटीकर, भीमराव उर्फ बाबासाहेब शेषराव नायक सवनेकर, वासुदेवराव बसोले, बाबुलाल माणिकचंद राठौर आदींच्या रुपाने मराठवाड्याच्या कानाकोपऱ्यातून स्वातंत्र्य संग्राम तेजस्वीपणे लढला गेला. या सर्व हुतात्म्यांनी आणि मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिकांनी केलेल्या संग्रामाच मोल काढणं शक्य नाही.
भारतीय संघराज्यात सामील होण्यासाठी निजाम तयार होत नव्हता. त्याने नागरिकांवर अतोनात अत्याचार सुरु केल्याने पोलीस ॲक्शन सुरु झाले. भारतीय फौजांनी हैद्राबाद संस्थांनावर चारी बाजूंनी हल्ले सुरु केल्याने निजामास सैन्य माघार घेण्यास भाग पाडले. हैद्राबादचे सेनाप्रमुख जनरल अल इद्रीस यांनी 17 सप्टेंबर, 1948 रोजी शरणांगती स्वीकारल्याने खुद्द निजाम शरण आला. मराठवाडा मुक्तीसंग्रामचे हे आंदोलन सतत 13 महिने लढले गेले. निजामाच्या हुकूमशाहीतून मराठवाडा मुक्त होऊन हैद्राबाद संस्थानावर भारतीय तिरंगा फडकला. 1 नोव्हेंबर 1956 पासून मराठवाडा विभाग मुंबई राज्यास जोडण्यात आला. हैद्राबाद मुक्ती संग्राम यशस्वी करुन मराठवाड्यातील जनतेने निजामाच्या अन्यायी राजवटीविरुद्धचा लढा यशस्वी केला..
➖➖➖➖➖➖➖➖
संकलन 
श्री ज्ञानेश्वर बडगे
 मुख्याध्यापक
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर
➖➖➖➖➖➖➖➖

गणपती बाप्पा विषयी सविस्तर लेख


*विघ्नहर्ता गणरायाचे घरोघरी आणि सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये गणरायाची मोठ्या भक्तीभावानं प्रतिष्ठापना*

भाद्रपद शुद्ध चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थी. घरोघरी गणरायाचे आगमन होते. सार्वजनिक मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होतात . महाराष्ट्रासह देशभरात हा सण साजरा केला जातो. यामुळे सर्वत्र भक्तीमय, मंगलमय, आनंदी, उत्साही वातावरण असते. गणपती बाप्पांच्या आगमनानंतर पुढील काही दिवस भारावलेले असतात. अशीच सर्वांची लाडकी गणेश चर्तुथी यंदा शुक्रवार, 10 सप्टेंबर 2021 आगमन झाले. 
गणेश चतुर्थीला मखर, आरास, बाप्पा आणणे, पूजा, आरती, नैवेद्य यांची लगबग असते. नंतर प्रत्येक घराच्या प्रथेप्रमाणे दीड, पाच, सात किंवा दहा दिवस बाप्पाची सेवा केली जाते. भजन, जागरण असे कार्यक्रम रंगतात. कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा करतात. तर सार्वजिनिक मंडळांमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रम होतात. मात्र यंदा देखील कोरोनाचे संकट कायम असल्यामुळे सरकारने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करत आहेत.
गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी झाली
मेघांच्या वर्षावाने फुलांची आरास बहरली
आंनदाने सर्व धरती नटली
तुझ्या आगमनाने मनाला तृप्ती मिळाली
तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत ,
सर्वांना सुख, समृध्दी, ऎश्वर्य,शांती,आरोग्य लाभो
हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना
बाप्पाच्या येण्याने चैतन्य बहरले
दुःख आणि संकट दूर पळाले
तुझ्या भेटीची आस लागते
तुझ्या नामस्मरणात वर्ष सरून जाते
अखेर गणेश चतुर्थीला भेट घडते…
मोदकांचा प्रसाद केला
लाल फुलांचा हार सजवला
मखर नटून तयार झाले
वाजत गाजत बाप्पा आले
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या स्वागतासाठी जमले सगळे…
सजली अवघी धरती,
पाहण्यास तुमची कीर्ती..
तुम्ही येणार म्हटल्यावर,
नसानसात भरली स्फ़ुर्ती..
आतुरता फक्त आगमनाची,
कारण चतुर्थी आमच्या गणेशाची…
प्रेमाने आणि श्रद्धेने पूजलेल्या गणपतीला निरोप देताना सर्वांची मनं भरुन येतात आणि आपोआप मुखातून 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या', हे शब्द बाहेर पडतात. 
अबालवृद्धांच्या लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन शुक्रवारी, १० सप्टेंबर २०२१ रोजी झाले. करोना स्थितीमुळे मागच्या वर्षी सगळ्यांना आप्तेष्टांना भेटणे, यावर्षी देखील करोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता बघता सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण आपली इच्छा पूर्ण करू शकतो. प्रत्यक्ष नाही, तरी व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर यांसारख्या समाज माध्यमातून आप्तेष्टांना, मित्रमंडळींना, नातेवाईकांना, ओळखीच्या अनेकांना आपण गणपती बाप्पाच्या आगमनाप्रीत्यर्थ शुभेच्छा देऊ शकतो. ज्याची आतुरतेने सर्वच वाट पाहता अशा  गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणित करूया...
"तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत,
सर्वांना सुख, समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो हीच
बाप्पाच्या चरणी प्रार्थना...
➖➖➖➖➖➖➖➖
श्री ज्ञानेश्वर बडगे 
मुख्याध्यापक 
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर 
  

गौरी पुजन विषयी सविस्तर लेख


*आली आली गौराई सोन्या रुपयाच्या पावलांन..! आली आली गौराई धन धान्याच्या पावलांन..!* 
 
सोन्यामोत्यांच्या पावली 
आली अंगणी गौराई
पंचपक्वान, झिम्मा-फुगडी, 
पूजा-आरतीची घाई
अष्टलक्ष्मी नांदो, अशीच राहो माया घरा दारा लाभो सदा कृपेची छाया
भाद्रपद महिन्यात शुक्ल पक्षाच्या चतुर्थीला महाराष्ट्रात व देशातही गणपतीची स्थापना होते. प्रत्येक घरात प्रथेप्रमाणे गणपतीची प्राण प्रतिष्ठापणा केली जाते दहा दिवसांनंतर विसर्जन होते. चतुर्थीनंतर गणेशाची माता पार्वती-म्हणजेच गौरीचे त्यापाठोपाठ आगमन होते.
रुणुझुणुत्या पाखरा, जारे माझ्या माहेरा, आली गौराई अंगणी, घाली लिंबलोण सडा..’ गौरींवर रचलेल्या अशा विविध गाण्यांचा गजर करत तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहणारी प्रत्येक स्त्री गौरीचं थाटामाटात स्वागत करते, कारण ती माहेरवाशीण असते ना!
पश्चिम महाराष्ट्रात गौरी-गणपती, तर मराठवाड्यात महालक्ष्मी असे म्हणतात. महालक्ष्मीचा हा सण तीन दिवस असतो व तो घरोघर साजरा केला जातो. खडय़ाची, कलशाची, मुखवटय़ाची अशा विविध रुपात तिची पूजा केली जाते. आज गुरुवारी गौरीचे आगमन होईल. शुक्रवारी गौरीच्या जेवणाचा थाट असेल तर शनिवारी म्हणजेच भाद्रपद शुक्ल अष्टमीला गणपतीसोबत गौरीला निरोप दिला जाईल.
गौरीचं आवाहन, तिची पूजा ते तिच्यासाठी केली जाणारी सजावट, तिचं नटणं, थटणं, पंचपक्वानांचा केला जाणारा बेत ते तिच्या विसर्जनापर्यंत सारं काही पाहण्याजोगं असतं. खण, वेणी, नथ, जोडवे, ठुशी, राणीहार, देवीहार, लक्ष्मीहार, वगैरे शृंगाराने सजलेली ही माहेरवाशिणी प्रत्येकाच्या घरी आणण्याची पद्धत वेगवेगळी आहे. कोणाकडे खडय़ाच्या गौरी आणतात, कोणाकडे तेरडय़ाची, कोणाच्या घरी उभ्या गौरी तर कोणाकडे बैठय़ा. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात, तर काही ठिकाणी गौरी उभ्या असून बिनहाताच्या असतात. गौर काहींच्या घरी गणपतीची आई म्हणून, तर काहींच्या घरी गणपतीची बायको म्हणून आणली जाते. 
खडय़ाच्या गौर मुख्यत्वेकरून कोकणस्थ लोकांकडे आणल्या जातात. एखादी सवाष्ण अगर एखादी मुलगी नदीकाठी, तळ्याकाठी, विहिरीपाशी जाते. चार खडे ताम्हणात घेते. पाणवठय़ावर एखादी जागा स्वच्छ करून तिथे या गौरी ठेवून तिची पूजा व आरती करतात. त्यांना प्रसाद दाखवला जातो. यानंतर गौरी आणणारी जी माहेरवाशीण असेल तिने तोंडात पाण्याची चूळ भरून रस्ताभर ती चूळ न टाकता मुक्या तोंडाने गौरी घरात आणायच्या असतात. 
खडे घरात आणण्यापूर्वी ज्या सवाष्णीच्या अगर मुलीच्या हातात ताम्हण किंवा तांब्या असेल तिच्या पायावर गरम पाणी घालून, हळद-कुंकू लावून तिला ओवाळून मग घरात घेतात. म्हणजेच गौरीला सोनपावलांनी दारातून आत घेऊन येतात. गौरी आणणाऱ्या मुलीने याच पावलांवर पाय ठेवून आत यायचे असते. आत आणल्यानंतर प्रथम गौरीला धान्याचे कोठार, स्वयंपाकाची खोली, नंतर सारे घर दिव्याच्या प्रकाशात दाखवले जाते. पाटावर रांगोळी काढून त्यावर तांदूळ पसरून, खडे ठेवून त्याची हळद-कुंकू, आघाडा, दुर्वा, फुलं, गेजवस्त्र यांनी पूजा करतात. दमून आलेल्या लाडक्या माहेरवाशिणीसाठी पहिल्या दिवशी शेपूची भाजी, भाकरी हा मुख्य जेवणाचा बेत केला जातो. दुसरा दिवस गौरी पूजनाचा असतो. या दिवशी लेकुरवाळी सवाष्ण जेवायला बोलावून तिला विडा, दक्षिणा द्यायची पद्धत आहे. बायकांना दुपारी हळदी-कुंकवास बोलावले जाते. या दिवशी गौरीला घावनघाटल्याचा नवेद्य दाखवला जातो. सोबत पुरण, तळण व खीर इ. पदार्थाचा समावेश असतो. तिसरा दिवस विसर्जनाचा. या दिवशी गौरीला नवेद्याला गव्हल्याची खीर, कानवला व दही-भाताचा नवेद्य दिला जातो. गौरी जाताना रांगोळी म्हणजे रुपयाची पाऊले रेखाटतात. गौरीच्या बरोबर दुपारच्या नवेद्याची शिदोरी किंवा दही-पोह्यंची शिदोरी दिली जाते. जातानाही मुकेपणानेच पाणवठय़ावर जाऊन तिथे पुन्हा एकदा आरती करून हळदी-कुंकू, अक्षता वाहून वाहत्या पाण्यात गौरींचं विसर्जन केलं जातं. 
देशस्थांकडे काहींच्या घरी बैठय़ा अथवा उभ्या गौरी बसवतात. यांच्याकडे गौरींचे मुखवटे घरच्या घरीच सांभाळून ठेवलेले असतात. हे मुखवटे पितळी, मातीचे अथवा शाडूचे असतात. काही ठिकाणी नुसते मुखवटे ठेवतात. हे मुखवटे घरच्या सुना अथवा एक सासुरवाशिणी व माहेरवाशिणी अशा दोघी दारातून बाहेर जाऊन पुन्हा दारातून घरात आणतात. त्यानंतर दोघीही गौरीला घरातील तिजोरी, अन्नधान्याचे डबे इ. दाखवून ‘उदंड’ तसेच ‘गौरी आल्या सोन्याच्या पावली, महालक्ष्मी आल्या रुप्याच्या पावली’ असं म्हणण्याची पद्धत आहे.  अन्नधान्याचे डबे, धान्याचे कोठार, दुधाचे पातेले अशा ठिकाणी एकीने ‘इथे काय आहे’ विचारल्यावर दुसरीने ‘उदंड’ असं उत्तर द्यायचं असतं. धान्याची साठवण, दूध-दुभत्याचे भांडे तेथे असलेले ‘उदंड राहो’ असं त्यामागचा दृष्टिकोन मानला जातो. हे मुखवटे पितळी किंवा लाकडी स्टॅण्डवर बसवतात किंवा कोणी कोठय़ांना साडय़ा नेसवून त्यावर मुखवटे बसवतात. काही ठिकाणी देवीचे हात कापडाचे, काही पितळी तर काही लाकडाचे असतात आणि काही ठिकाणी तर हात नसण्याची सुद्धा पद्धत असते. 
त्या दोन गौरींना जेष्ठा आणि कनिष्ठा असे संबोधले जाते. दोघींच्या मध्ये एक बाळही ठेवतात. गव्हाच्या आणि तांदळाच्या राशी तिच्यापुढे मांडून त्याच्यासमोर गव्हाचा चौक घालतात. त्यांना अलंकाराने मढवतात. त्यांना सजवण्यासाठी नवीन साडय़ा, मुकुट, गळ्यातील अलंकार, बांगडय़ा इत्यादींची जोरदार खरेदी झालेलीच असते. त्यामुळे नटल्यानंतरचा त्यांचा थाट, शृंगार पाहून डोळ्यांचे पारणे फिटते. पहिल्या दिवशी भाजी-भाकरीच्या नवेद्याने गौराई तृप्त होते. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. काही लोक विसर्जनाच्या दिवशी ६४ योगिनीच्या फोटोलाही पूजतात. एका घागरीत पाणी भरून ती घागर कर्दळीच्या पानावर घवाच्या राशीवर काकडीच्या फोडी ठेवून त्यावर ठेवतात. तिच्यावर गंधाने ६४ योगिनी काढून त्यावर कलश ठेवून पूजा केली जाते. 
तेरडय़ाची गौर पूजनाची पद्धत ही काहीशी वेगळी आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा भागांत गौरी पूजनाची ही पद्धत बरेचदा आढळून येते. तेरडय़ाचा जुडा एकत्र बांधून पाणवठय़ाजवळ आंघोळ घालून तिची पूजा करतात. ढोल-ताशांच्या गजरात तिचं आगमन केलं जातं. घरी आणल्यावर माहेरवाशिणीने गौरी आणली म्हणून तिने गौर घातली असं म्हटलं जातं. दारातून आत प्रवेश करताना जिने गौर आणली तिच्या पायावर पाणी घालून, हळदी-कुंकू, डोळ्याला पाणी लावून तिला ओवाळून उजव्या पायांनी तिचा घरात प्रवेश होतो. पाटावर अथवा चौरंगावर देवी बसवतात, त्यानंतर साडी नेसवून दागदागिने घालून तिला शेपू व भाकरीचा नवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी गौरींइतकाच शंकराचा मानही मोठा असतो. घरात शंकराचं आगमन होतं. शंकरालाही पानवठय़ाजवळ आरती करूनच वाजतगाजत घरी आणलं जात. या दिवशी पुरणपोळी आणि मिक्स भाजीचा नवेद्य दाखवला जातो. या दिवशी सुपात शंकर-गौरी दोघांनाही सजवून औसा पूजन केले जाते. तेरडय़ाला म्हणजेच गौरीला विडय़ाच्या पानाचे डोळे, नाक, ओठ काढून त्यात सोन्याचे मणीमंगळसूत्र, चांदीची जोडवी हे महत्त्वाचे दागिने परिधान करतात. तर शंकरालासुद्धा टोपी, शर्ट, उपरणं, धोतर नेसवून सजवलं जातं. भस्माने विडय़ाच्या पानाचे कान, नाक, डोळेही काढतात. त्यानंतर गौरी-गणपतीची आरती करून गौण नवेद्य दाखवला जातो. नवीन लग्न झालेल्या सुवासिनींना गौरीला औसा पूजन करावे लागते. सुपात दोऱ्याच्या गुंडय़ा गुंडाळून सुपात खण, नारळ, तांदूळ, पानाचा विडा, सुपारी, हळकुंड, आक्रोड, बदाम, खारीक, पाच तऱ्हेची फळं, पाच भोपळ्याची पाने इत्यादी वस्तूंनी सूप सजवून सुवासिनी ते सूप पाच वेळा गौरीभोवती ओवाळतात नंतर ते गौरीच्या पुढय़ात ठेवतात. गौरीला नमस्कार करून मनातील इच्छा बोलतात. औसायला आलेल्या त्या सुवासिनींची ज्यांचाकडे गौरी असते ते खणानारळाने ओटी भरून त्यांचा सन्मान करतात. सुवासिनींच्या सुपातही पसे ठेवण्याची प्रथा आहे. रात्री गौर जागवतात. गौरीचे खेळ खेळले जातात. त्या वेळी काही स्त्रियांच्या अंगात गौर येते. त्या वेळी तिला कुठून आलीस, काय जेवलीस, असे प्रश्न विचारले जातात. गौरी विसर्जनाच्या दिवशी तिच्या पायांवर पाणी ओतून तिची दृष्ट काढली जाते. त्यानंतर तेरडय़ाची डहाळी घरावर टाकली जाते. सोबत गौरी विसर्जनानंतर पाच खडेही घरावर टाकले जातात. 
गौरीपूजनाला पहिल्या दिवशी शेपूची भाजी व भाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. दुसऱ्या दिवशी महालक्ष्मी पूजन असून सवाष्ण जेवायला घालतात. हा इथला मुख्य समारंभ असतो. त्यानंतर आरती करून पुरणपोळीचा बेत असतो आणि तिसऱ्या दिवशी पानावर दहीभात व कानवल्याचा नवेद्य देऊन गौरींचं विसर्जन केलं जातं. 
अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र हा  सण मोठ्या आनंदाने व उत्साहाने गौरी आवाहन, पुजन व विसर्जन साजरा करतात 
➖➖➖➖➖➖➖➖
*श्री ज्ञानेश्वर बडगे मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ/ उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर 9421901611*
➖➖➖➖➖➖➖➖