Thursday, October 7, 2021
राज्य शासकीय कर्मच्यार्यांचा महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात आला . | DA INCREASED FROM 17 % TO 28 % दिनांक १ जुलै, २०२१ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर १७% वरुन २८% करण्यात यावा. सदर वाढीमध्ये दिनांक १ जानेवारी, २०२० दिनांक १ जुलै, २०२० आणि दिनांक १ जानेवारी, २०२१ पासूनच्या महागाई भत्ता वाढीचा समावेश आहे. मात्र दिनांक १ जानेवारी, २०२० ते दिनांक ३० जून, २०२१ या कालावधीत महागाई भत्त्याचा दर १७% इतकाच राहील. सदर महागाई भत्ता वाढ दिनांक १ ऑक्टोबर, २०२१ पासून रोखीने देण्यात यावी. दिनांक १ जुलै, २०२१ ते दिनांक ३० सप्टेंबर, २०२१ या ३ महिन्यांच्या कालावधीतील महागाई भत्ता वाढीच्या थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित करण्यात येतील. ➖
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment