Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Wednesday, November 3, 2021

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना सूचना

https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040


 
१२ नोव्हेंबर २०२१ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण(NAS) शाळा मुख्याध्यापक, शिक्षक यांना द्यावयाच्या सूचना.
१. १२ नोव्हेंबर २०११ रोजी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (NAS) घेण्यात येणार आहे.
२. सदर सर्वेक्षण इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी च्या वर्गाचे करण्यात येणार आहे.

*इयत्ता पहिली ते आठवी वर्गातील NAS  नमूना प्रश्नपत्रिका खालील लिंकवर क्लिक करून डाऊनलोड करुन घ्या. 👇👇* 

https://www.shaleyshikshan.in/2021/10/nas-exam-previous-year-question-paper-pdf.html?m=1

३. यासाठी इयता ३ री,५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Random Sampling) निवडली जाते.
४. कोणती शाळा व त्या शाळेतील कोणती इयत्ता निवडली गेलेली आहे, हे तीन दिवस अगोदर केंद्र शासनाकडून कळेल. निवड केलेल्या शाळांची यादी केंदाकडून प्राप्त होताच लगेच आपणास कळविण्यात येईल.
५. यामध्ये सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यमाच्या शाळांचा समावेश यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने नमुना निवड करताना केला जातो.
६. इयता ३ री, ५ वी, ८ वी व १० वी चे वर्ग असलेली कोणतीही शाळा निवडली जाण्याची शक्यता असते.
७. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळा सर्वेक्षणाच्या दिवसासह दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०११ रोजी सुरु राहतील.
८. राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी आपल्या तालुक्यातील कोणत्या शाळा व कोणते वर्ग निवडलेले आहेत हे सर्वेक्षण दिनांकाच्या अगोदर तीन दिवस कळवण्यात येईल.
९. निवडलेल्या शाळांची स्वच्छता, निर्जंतुकीकरण, ज्या मोठ्या हॉलमध्ये चाचणी घेण्यात येणार आहे त्या वर्गाची स्वच्छता, बैठक व्यवस्था, हॅन्ड सॅनिटायझर, सुरक्षित अंतर राहील, अशी बाकांची व्यवस्था करावी.
१०. एका बाकावर एकच विद्यार्थी बसेल, अशी बैठकीची व्यवस्था करावी.
११. चाचणीसाठी निवड केलेल्या व शाळेचे मूळ माध्यम असलेल्या वर्गाच्या एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तर सर्व तुकड्यातील विद्यार्थी उपस्थित ठेवावे. त्यापैकी एक तुकडी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling – chit draw Method) निवडली जाईल.

हे वाचले का ? -  स्टुडंट पोर्टल च्या महत्त्वाच्या TAB ची संपूर्ण माहिती

१२. चाचणीसाठी जास्तीत जास्त ३० विद्यार्थी यादृच्छिक नमुना निवड पद्धतीने (Randam Sampling) सर्वेक्षणाच्या दिवशी निवडले जातील.
१३. निवडलेल्या वर्गात चाचणीसाठी ३० विद्यार्थी संख्येपेक्षा कमी विद्यार्थी असतील तर नमुना निवड करण्याची आवश्यकता नाही.
१४. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पर्यवेक्षकीय यंत्रणेतील घटक , क्षेत्रीय अन्वेषक इत्यादीपैकी कोणीही अनुपस्थीत राहणार नाही अथवा मुख्यालय सोडणार नाही याबाबत सर्वाना अवगत करावे.
१५. दिवाळी सुट्टी पूर्वी पालक सभा घेण्यात यावी. जर सर्वेक्षणासाठी शाळा निवडली गेली तर पालकांना सर्वेक्षण दिनांकाच्या साधारणतः ३ दिवस अगोदर कळविण्यात येईल व त्यानुसार पालकांनी आपले पाल्यांना सर्वेक्षणासाठी शाळेला पाठवावे अश्या सूचना पालक सभेत देण्यात याव्यात. दिनांक १० ते १२ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत निवड केलेल्या शाळांमध्ये जिल्ह्याचा नमुना /शाळेचा नमुना कमी होऊ नये म्हणून निवड केलेल्या वर्गाचे सर्व विद्यार्थी १०० टक्के उपस्थित राहतील, याबाबत सूचना द्याव्यात. सर्वेक्षणा दिवशी विद्यार्थी सकाळी ८:३० वाजता उपस्थित असणे अपेक्षित आहे व सर्वेक्षणाचे काम साधारणतः १:३० वाजेपर्यंत असेल त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी येताना जेवून करून येण्यास सांगावे.

१६. दिनांक १० ते ११ नोव्हेंबर २०२१ यापैकी एक दिवस क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक आपल्या शाळेला भेट देवून चाचणी साठी आवश्यक ती पूर्वतयारी करणार आहेत. तरी त्यांना आवश्यक ती माहिती उपलब्ध करून द्यावी व वेळोवेळी सहकार्य करावे.
१७. दिनांक १२ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ८ वाजता सर्वेक्षणासाठी निवड करण्यात आलेल्या शाळेत क्षेत्रीय अन्वेषक व निरीक्षक उपस्थित राहून विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ), क्षेत्रीय टीपण (Field Note) इत्यादी भरून घेतील, तरी त्यांना आवश्यक ते सहकार्य करावे.
१८. विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणासाठी येताना काळ्या रंगाचे किमान २ बॉल पॉइट पेन सोबत ठेवावे तसेच शाळेनी सुद्धा काही प्रमाणात पेन शिल्लक ठेवावे

हे वाचले का ? -  शाळांच्या सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षातील सुटटया

राष्ट्रीय संपादणूक सर्व्हेक्षण चाचणी प्रश्नसंच | प्रश्नपत्रिका

१९. विद्यार्थी संपादणूक चाचणी(AT), विद्यार्थी प्रश्नावली(PQ)), शिक्षक प्रश्नावली(TQ), शाळा प्रश्नावली (SQ) इ. प्रतिसाद OMR पद्धतीने नोंदविले जाणार आहेत.
२०.वर्गव विषय-संबंधित वर्गाना पुढे दिलेले विषय शिकविणारे सर्व शिक्षक सर्वेक्षणादरम्यान उपस्थित असणे अनिवार्य आहे.
२१. सध्या राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणासाठी शाळांच्या पुर्वतयारीचा भाग म्हणून सर्व शाळांनी खालील माहिती दीपावली सुट्टी लागण्यापूर्वी तयार ठेवावी.
सर्वेक्षणासाठी खालील माहिती मुख्याध्यापकांच्या हाताशी असणे अत्यंत आवश्यक आहे.

१. विद्यार्थी हजेरी पत्रक (सर्वेक्षणासाठी निवडलेल्या शाळेने हजेरी पत्रकाचे दोन प्रतीत झेरोक्स करून ठेवावे)

२. इयत्तानिहाय पट (मुले मुली)

३. शाळा UDISE कोड

४. मुख्याध्यापक पूर्ण नाव व भ्रमणध्वनी

५. कार्यरत शिक्षक यादी व भ्रमणध्वनी

६.शाळा माध्यम:सेमी इंग्रजी असल्यास इयत्ता व तुकडी संख्या :

७.शाळा व्यवस्थापन प्रकार

८.ग्रामीण/शहरी

राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण चाचणी- २०२१
➖➖➖➖➖➖➖➖

No comments:

Post a Comment