Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Thursday, December 30, 2021

मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन तसेचशाळा व्यवस्थापन समिती माहेवर विषय कोणते असावेत याचे नियोजन





शाळा व्यवस्थापन समिती माहेवर विषय कोणते असावेत याचे नियोजन खाली दिलेले आहे खालील विषय फक्त मार्गदर्शक म्हणून आपणास उपयोगी पडू शकतात यामध्ये परिस्थितीनुसार बदल करू शकता*

*महिना - जून*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) पटनोंदणी पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन*
*करणे*
*३) मोफत पाठयपूस्तके वितरण करणे. गणवेश*
*वाटपासाठी पात्र लाभाथीची निवड* *करणे*
*४) लाभाच्या योजनांबाबत चर्चा करणे, पात्र*
*लाभार्थींची निवड करणे*
*५) सर्वेक्षण व पटनोंदणीबाबत चर्चा करणे.*
*६) तयार केलेल्या सहशालेय कार्यक्रम वार्षिक*
*नियोजन आराखडया संदर्भात चर्चा* *करणे. संगणक,*
*प्रयोगशाळा, ग्रंथालय याचे वापराचे* *नियोजन करणे.*
*७) शालेय पोषण आहार स्वयंपाकी, मदतनीस यांची*
*निवड करणे, करारनामा-फिटनेस* *सर्टिफिकेट सादर*
*करण्याबाबत चर्चा करणे.*
*८) अध्ययन निष्पत्ती बाबतचे पालक प्रशिक्षणाचे*
*नियोजन करणे.*
*९) शालेय भौतिक व शैक्षणिक गरजांची निश्चिती*
*करणे.*
*१०) कोरोना पार्श्वभूमीवर शाळा सुरु करणे अथवा शाळा अध्यापन ऑनलाईन करण्यासंदर्भात नियोजन करणे*
*११) ‌‌ वेळेवर येणारे विषयविषय*

*महिना -  जुलै*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) शाळेच्या भौतिक गरजांची पूर्तता करण्याबाबत*
*नियोजन करणे.*
*३)वृक्षारोपण करणे, परसबागेचे नियोजन करणे.*
*४) अध्ययन निष्पत्तीचा स्तर निश्चित करणे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यवाहीबाबत चर्चा करणे*.
*चाचण्यांचा आढावा घेणे.*
*५) पट नोंदणीचा चर्चा करणे.*
*६) निर्लेखन प्रस्ताव सादर करणे.*
(न. ३२,३३,४ व ५)
*७) शैक्षणिक उठावासाठी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन*
*विशेष नियोजन करणे.*
*८) digital classroom &e-learning चर्चा*
*करणे.*
*९) शाळा सिध्दी स्वयंमूल्यमापन प्रपत्र वाचन करणे.*
*१०)शिष्यवृत्ती/स्पर्धा परीक्षांचे नियोजन करणे.*
*११) विशेष अअअअ असणा-या मुलांना सुविधाबाबत चर्चा करणे.*
*१२) आपत्कालीन व्यवस्थापन नियोजन करणे*
*१३) प्रगत शाळा होण्यासाठी उपाय सुचविणे, नियोजन करणे.*
*१४)  वेळेवर येणारे विषय*

*महिना - ऑगस्ट*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२)सर्व शिक्षा अभियान अंतर्गत अनुदान खर्चास*
*मान्यता घेणे.*
*३) विद्यार्थी गुणवत्ता वाढी संबंधी आढावा घेणे.*
*४) परिसर भेटीचे नियोजन करणे.*
 *५) पावसाळी क्रीडा स्पर्धेचे नियोजन करणे.*
*६) spoken english आढावा घेणे.*
*७) सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन कार्यवाही आढावा*
*घेणे.*
*८) स्वच्छ सुंदर शाळा-शाळेचे स्वयंमूल्यमापन आढाव*
*घेणे.*
*९) वेळेवर येणारे विषय*

*महिना - सप्टेंबर*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२)सर्व शिक्षा अभियान अंतर्गत यु-डाएस भरण्याचे नियोजन करणे.*
*३) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यवाहीबाबत चर्चा करणे. विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेणे.*
*४) स्पर्धासाठी विद्यार्थी निवड करणे.*
*५) क्रीडा प्रबोधिनी निवड चाचणी नियोजन करणे.*
*६) शाळा सिध्दी श्रेणीवाढ चर्चा करणे.*
*७) अध्ययन निष्पत्ती निकालावर चर्चा करणे.*
*८) digital classroom &e-learning चर्चा*
*करणे.*
*९) अपूर्व विज्ञान मेळावा/पालड मेळावा नियोजन करणे.*
*१०) शिष्यवृत्ती/नवोदय सराव परीक्षांचा/नॅस /संकलित चाचणी नियोजन करणे*
*११) वेळेवर येणारे विषय*

*महिना - ऑक्टोंबर*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२)स्पर्धा परीक्षा सरावाबाबत चर्चा करणे.*
*३) प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याचे नियोजन*
*करणे.*
*४)संकलित मूल्यमापन चाचणीचे नियोजन करणे.*
*५) माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करणे.*
*६) लोकसहभाग वाढविण्याबाबत चर्चा करणे.*
*७) अध्ययन निष्पतीबाबत आढावा घणे. विद्यार्थी*
*प्रगतीचा आढावा घेणे.*
*८)स्वच्छ सुंदर शाळा ग्रामस्पर्धा त्रुटी पूर्तता करणे.*
*९) शालेय पोषण आहार- पौष्टीकता मूल्य*
*वाढवणेसाठी उपाय सुचवणे*
*१०) प्रगत वर्ग घोषीत करणा-या शिक्षकाचा सन्मान*
*करणे.*
*११) वेळेवर येणारे विषय*

*महिना - नोव्हेंबर*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) Digital Classroom,E-learning च्या*
*कार्यवाहीबाबत चर्चा करणे.*
*३) स्थलांतरित मुलांचे शिक्षण चर्चा करणे.*|*४)मीना-राजू मंच *चर्चा करणे*
*५) पालक मेळाव्याचे आयोजन करण्याबाबत नियोजन करणे.*
*६) चावडी वाचन नियोजन करणे.*
*७) प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यवाहीबाबत चर्चा*
*करणे. विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेणे.*
*८) भौतिक सुविधाबाबत चर्चा करणे*
*९) शाळा सिध्दी श्रेणीवाढ करणे.*
*१०) आतरशालेय विविध स्पर्धाचे आयोजन करणे*
*११) वेळेवर येणारे विषय*

*महिना - डिसेंबर*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे,*
*२) शेक्षणिक सहलीचे नियोजन करणे.*
*३) स्नेह संमेलनाचे नियोजन करणे,*
*४) शालेय पोषण आहार योजना चर्चा करणे*
*५) शिष्यवृत्ती सराव परीक्षा आयोजन करणे,*
*६) शाळा विकास आराखड्यात मान्यता देणे,*
*७) अध्ययन निष्पत्तीचा विद्यार्थी प्रगती आढावा घेणे*
*८) निर्लेखन प्रस्ताव सादर करणे*
(न.नं.३२.३३.४ व ५)
*९) कुटुंब सर्वेक्षण नियोजन करणे*
*१०) प्रजासत्ताक दिनाचे विशेष नियोजन करणे*
*११) वेळेवर येणारे विषय*

*महिना - जानेवारी*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) बालबाजाराचे आयोजन करणे.*
*३) विद्यार्थी क्रीडा स्पर्धेचे नियोजन करणे.*
*४) बाल आनंद मेळाव्याचे नियोजन करणे.*
*५)अध्ययन निष्पत्ती निकालावर चर्चा करणे. प्रगत*
*शाळा होण्यासाठी उपाय सुवचणे* *नियोजन करणे.*
*६) digital classroom &e-learning*
*चर्चा करणे. प्रयोगशाळा व ग्रंथालय* इ*
*७)स्पर्धा परीक्षा सराव चाचणीचे आयोजन करणे.*
*८) वेळेवर येणारे विषय*

*महिना - फेबुवारी*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) शिष्यवृत्ती सराव परीक्षा चर्चा करणे*
*३) लोक सहभाग वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे*
*४) विविध शासकीय लाभाच्या योजनाबाबत पडताळणी करणे*
*५) मीना-राजू मंच कार्यवाहीबाबत चर्चा करणे*
*६) अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेणे*
*७) पालक सभाचे आयोजन करण्याबाबत नियोजन करणे*
*८) शालेय पोषण आहार योजना चर्चा करणे*
*९)  इयत्तावार पूर्व प्रशिक्षण नियोजन करून सभेत*
*सादर करणे*
*१०) वेळेवर येणारे विषय*

*महिना - मार्च*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) सर्व शिक्षा अभियान, सादील ४ टक्के, शाल्नेय*
*पोषण आहार यास मान्यता घेणे.*
*३)शालेय पोषण आहार योजना चर्चा करणे,*
*४) अध्ययन निष्पत्तीचा अतिम निकाल सादर करणे*
*५)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यवाहीबाबत चर्चा करणे*
*६) digital classroom &e-learning*
*चर्चा करणे*
*७) प्रगत शाळा घोषित करणे*
*८) इ.१ ली पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम १५ मार्च पासून*
*सुरू करणे*
*९) वेळेवर येणारे विषय*

*महिना - एप्रिल*

*सभेपुढील विषय*
*१) मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करणे.*
*२) शालेय परिसर सुरक्षेचे नियोजन करणे.*
*३)शासकीय लाभाच्या योजनाचे लाभार्थी निश्चित*
*करणे.*
*४) पुढील शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक कामकाजाचे*
*नियोजन करणे.*
*५) उन्हाळा सुट्टीतील कर्मचारी नियोजन करणे*
*६)प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र नियोजन करणे*
*७) जिल्हा परिषद शाळांची प्रसिध्दी व संपर्क कार्यक्रम*
*तयार करणे व राबवणे*
*८) शाळेतील परीक्षांचे आयोजन व नियोजन करणे*
*९) शाळेतील वर्ग  निकालाविषयी चर्चा करणे*
*१०) वेळेवर येणारे विषय*
-------------------------------------------------------------------------
*मुख्याध्यापकांसाठी शाळेतील कामकाजाचे वार्षिक नियोजन* 


*जुन महिना*----------------
1) SMC मिटिंग आयोजन 14/6
2) पाठ्यपुस्तक व गणवेश वाटप नियोजन.
3) शिक्षक -पालक संघ सभा आयोजन
4) Student pramotion करणे.
5) अनुदानातुन शालेय साहित्य खरेदी करणे.
6) शाळा-लाँगबुक(वर्ग जबाबदारी) भरणे.
7) पटनोंदणी पंधरवडा अभियान राबविणे.
8) पायाभुत परीक्षा पुर्वतयारी.
9) वर्गस्वच्छता व वर्गसजावट उपक्रम 
10) वर्ग व शालेय मंत्रीमंडळ निवड
11) शाळास्तरावर आदर्श उपक्रम निवडून वर्षभर अंमलबजावणी  करणे.
12) Staff Attach-deteach करणे.
13) आंतरराष्ट्रीय योग दिन-उपक्रम 21/6
14)इ.1 ली व नविन दाखलात-स्वागतसमारंभ
15) Student Request पाठविणे व coinfirm करणे.
16)शा.पो.आ. करारनामा करणे.
17)शा.पो.आ. मेन्यु /पूरक आहार/धान्यादी माल नियोजन व स्वच्छता ठेवणे.
18) वृक्षारोपन व वृक्षसवंर्धन उपक्रम राबविणे.

*जुलै महिना*----------------
1) माता-पालक संघ सभा
2) सरल st. request-coinfirm पाठविणे.
3) मीना राजु मंच सभा
4) SMC मिटिंग
5) कथाकथन स्पर्धा आयोजन
6) शा.पो.आ.सभा
7) दिंडी उपक्रम आयोजन
8) पालक सभा आयोजन
9) आदर्श परिपाठ तयारी
10) गुरुपोर्णिमा उपक्रम
11) शिष्यवृत्ती वर्ग सुरुवात 5 वी/8वी
12) नवोद्य विद्यार्थी निवड व वर्ग सुरुवात 5वी
13)पायाभुत चाचणी 1 आयोजन 

*आँगस्ट महिना*------------------
1) Student माहिती online भरणे.
2) शिक्षक -पालक संघ सभा
3) SMC मिटिंग आयोजन
4) स्वातंत्र दिन पुर्व तयारी
5) सरल school portal भरणे.
6) सरल Staff portal भरणे.
7) गोपाळकाला(दहिहंडी)उपक्रम 
8) अकारिक चाचणी १ आयोजन
9) प्रगत/अप्रगत उपक्रम(जादा तास) आयोजन
10) लो.टिळक पुण्यतिथी 1/8
11)रक्षाबंधन उपक्रम आयोजन
12) परिसर सहल आयोजन

*सप्टेंबर महिना*-----------------
1) माता-पालक संघ सभा
2) संच मान्यता portal भरणे.
3) गणपती उपक्रम 
4) SMC मिटिंग
5) शाळेत गणेशोत्सव साजरा करणे.
6) वक्तृत्व स्पर्धा आयोजन.
7) शा.पो.आ.सभा
8) मीना राजु मंच सभा
9) पालक सभा आयोजन
10) अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती online भरणे.
11) पायाभुत online marks भरणे.
12) विद्यार्थी प्रगत-अप्रगत ठरविणे.
13) समाजकल्याण शिष्यवृत्ती online भरणे.
14)  अध्ययन निष्पत्ती उपक्रम 
15) शाळेत शिक्षक दिन साजरा करणे.5/9


*आँक्टोंबर व नोव्हेंबर महिना*--------------------
1) 15 oct वाचन प्रेरणा दिन साजरा करणे.
2) सत्र 1 परीक्षा घेणे.
3) नवरात्र दिवसात परिसर सहल आयोजन
4) स्वच्छता अभियान राबविणे.
5) SMC मिटिंग
6) दिवाळी अभ्यास नियोजन
7) गांधी जयंती साजरी करणे. 2/10
8) नवरात्र भोंडला आयोजन.
9) चित्रकला उपक्रम आयोजन.
10) नवोदय,शिष्यवृत्ती online form भरणे.
11) शैक्षणिक सहल पुर्वतयारी
12) क्रिडा स्पर्धा पुर्वतयारी.
13)  पायाभुत चाचणी 2 आयोजन
14) शिक्षक -पालक संघ सभा
15) पं.नेहरु जयंती 14/11 बाल दिन
16) सरदार वल्लभभाई पटेल जयंती 31/10


*डिसेंबर  महिना* --------------------
1) माता पालक संघ सभा
2) SMC मिटिंग
3) शा.पो.आ.सभा
4) पालक सभा आयोजन
5) कला व क्रिडा स्पर्धा 
6) शैक्षणिक सहल आयोजन
7) Udise+ Online भरणे
8) शाळेचा वार्षिक आराखडा भरणे.
9)अध्ययन निष्पत्ती उपक्रम


*जानेवारी महिना*------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2) प्रजासत्ताक दिन कार्यक्रम 
3) सा.फुले जयंती उपक्रम 
4) सांस्कृतिक कार्यक्रम 
5) बाल आनंद मेळावा
6) स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती.12/1
7)नेताजी जयंती 23/1
8) शिष्यवृत्ती सराव परीक्षा 5 वी/8 वी सरावप्रश्नपत्रिका नियोजन


*फेब्रुवारी महिना* --------------------------
1) माता पालक संघ सभा
2) शा.पो.आ.सभा
3) पालक सभा आयोजन
4) शिष्यवृत्ती परीक्षा 5वी व 8 वी परीक्षा 
5) आकारिक चाचणी 2 आयोजन
6) वार्षिक तपासणी पूर्वतयारी
7) शिवजयंती कार्यक्रम 19/2
8) Udise + online भरणे.


*मार्च महिना* -------------------------
1) शिक्षक -पालक संघ सभा
2)SMC मिटिंग
3) वार्षिक तपासणी
4) इयत्ता 7 वी/8 वी/5 वी/4 थी निरोप समारंभ 
5) शाळेची वार्षिक तपासणी
6) समग्र शिक्षा अभियान खर्च वार्षिक विनियोग 
7) SSA online link भरणे.
8) जागतिक महिला दिन 8/3
9) यशवंतराव चव्हाण जन्मदिन 12/3
10) जागतिक अपंग दिन 17/3
11) संत गाडगेबाबा जयंती 4/3
12) वर्गनिहाय सत्र 2 पर्यतचा वार्षिक  नियोजन प्रमाणेअभ्यासक्रम पुर्ण करणे.

*एप्रिल महिना* -----------------
1) माता-पालक संघ सभा
2)शा.पो.आ. सभा
3) द्वितीय सत्र परीक्षा 
4) पायाभुत चाचणी 3
5) माँडरेशन तयारी
6) महात्मा फुले जयंती 11/4
7) पेपर तपासणे.निकाल तयार करणे.
8) शा.पो.आ.वार्षिक एकुणात करणे.
9) आंबेडकर जयंती 14/4
10) नवोद्य परीक्षा 5 वी
11) RTE केंद्र बोर्ड परीक्षा 5 वी व 8 वी

*मे महिना* ----------------------
1)निकाल जाहीर करणे 
2) 1 मे महाराष्ट्र दिन साजरा करणे.
3) पुढील वर्ष वर्गवाटप,
4) शिक्षक कामकाज वाटप -लाँगबुक भरणे.
5) 33 कोटी वृक्षलागवड माहीती online.
6) प्रशिक्षण तयारी-अभ्यासक्रम बदल
7) पुढील शैक्षणिक वर्ष नियोजन.
 --------------------------
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
--------------------------------------------------------------


Download here to click 
👇

शिष्यवृत्ती परीक्षा दुबार गुणपत्रक व प्रमाणपत्र मागणी करण्यासाठी विहीत कार्यपध्दती

शिष्यवृत्ती परीक्षा दुबार गुणपत्रक व प्रमाणपत्र मागणी करण्यासाठी विहीत कार्यपध्दती
 
1. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे सही शिक्क्यासह शिफारस पत्र.
2. विद्यार्थ्याचा आसन क्रमांक व परीक्षेचे वर्ष किंवा प्रवेशपत्राची साक्षांकित प्रत.
3. रूपये 100/- प्रति प्रमाणपत्र / गुणपत्रक याप्रमाणे शुल्काचा भरणा प्रत्यक्ष परीक्षा परिषद कार्यालयात किंवा खालील बँक खात्यात जमा करून त्याची पावती अर्जासोबत जोडावी.

·        बँकेचे नाव :- INDIAN BANK

·        IFS CODE :- IDIB000P087

·        शाखा :- PUNE CANTONMET BRANCH

·        इ. 5 वी बँक खाते नाव :- MSCE PUP EXAM

·        इ. 5 वी बैंक खाते क्रमांक - 6891795521

·        इ. 8 वी बैंक खाते नाव :- MSCE PSS EXAM

·        इ. 8 वी बैंक खाते क्रमांक -6891795780

 
4. सन फेब्रुवारी 2017 परीक्षेच्या प्रमाणपत्र / गुणपत्रकांची Soft Copy संबंधित शाळेच्या ई-मेलवर पाटविण्यात येईल. त्यामुळे अर्जामध्ये अचूक ई-मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
5. सन फेब्रुवारी 2017 पूर्वीच्या परीक्षांचे दुबार गुणपत्रक अथवा प्रमाणपत्र टपालाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे पाठविण्यात येईल.

Monday, December 27, 2021

शिष्यवृत्ती परीक्षा दुबार गुणपत्रक व प्रमाणपत्र मागणी करण्यासाठी विहीत कार्यपध्दती

शिष्यवृत्ती परीक्षा दुबार गुणपत्रक व प्रमाणपत्र मागणी करण्यासाठी विहीत कार्यपध्दती
 
1. संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांचे सही शिक्क्यासह शिफारस पत्र.
2. विद्यार्थ्याचा आसन क्रमांक व परीक्षेचे वर्ष किंवा प्रवेशपत्राची साक्षांकित प्रत.
3. रूपये 100/- प्रति प्रमाणपत्र / गुणपत्रक याप्रमाणे शुल्काचा भरणा प्रत्यक्ष परीक्षा परिषद कार्यालयात किंवा खालील बँक खात्यात जमा करून त्याची पावती अर्जासोबत जोडावी.

·        बँकेचे नाव :- INDIAN BANK

·        IFS CODE :- IDIB000P087

·        शाखा :- PUNE CANTONMET BRANCH

·        इ. 5 वी बँक खाते नाव :- MSCE PUP EXAM

·        इ. 5 वी बैंक खाते क्रमांक - 6891795521

·        इ. 8 वी बैंक खाते नाव :- MSCE PSS EXAM

·        इ. 8 वी बैंक खाते क्रमांक -6891795780

 
4. सन फेब्रुवारी 2017 परीक्षेच्या प्रमाणपत्र / गुणपत्रकांची Soft Copy संबंधित शाळेच्या ई-मेलवर पाटविण्यात येईल. त्यामुळे अर्जामध्ये अचूक ई-मेल आयडी नमूद करणे आवश्यक आहे.
5. सन फेब्रुवारी 2017 पूर्वीच्या परीक्षांचे दुबार गुणपत्रक अथवा प्रमाणपत्र टपालाने संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांच्या नावे पाठविण्यात येईल.

सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांतील राहीलेल्या उर्वरित सूट्या जाहीर जिल्हा परिषद प्राथमिक लातूर*

*सन 2021-22 या शैक्षणिक वर्षांतील राहीलेल्या उर्वरित सूट्या जाहीर जिल्हा परिषद प्राथमिक लातूर


Saturday, December 25, 2021

शिक्षक व मुख्याध्यापक यांना खूप उपयोगी लिंक

*_🛑 चला होऊया तंत्रस्नेही,,सदर पोस्ट Save * करून ठेवा._*
*_➡️ आपल्या मोबाईलवरून केवळ Missed काॅल करा व SBI बँक balance व Ministatement चेक करा.👇_*📱📱
http://bit.ly/3yhUnmB
*_➡️ शालार्थ-प्रत्येक महिन्याची सॅलरी स्लिप कशी पाहावी.?👇_*
http://bit.ly/3ANKexV
*_➡️ शाळेची ऑनलाईन कामे करत असताना शिक्षकांसाठी महत्त्वाच्या दहा वेबसाईट_* 👇
http://bit.ly/3g9JsDP
*_➡️ 1ली ते 8वीसाठी मूल्यमापन / वर्णनात्मक नोंदी_*👇
http://bit.ly/3CXWpdI
*_➡️ NMMS परीक्षा स्वरूप व संपूर्ण माहिती.👇_*
http://bit.ly/3k38wym
*_➡️ Whatsapp वर मिळवा कोरोना लसीकरण प्रमाणपत्र कसे मिळवावे.?👇_*
http://bit.ly/3AC6afk
___________________________________
*_🛑 शिक्षक व मुख्याध्यापकांसाठी महत्वाची वेबसाईट गुगल सर्च करा_*👇
www.zppstech.com
*_महाराष्ट्र शिक्षक पॅनल_*
_इतर शैक्षणिक ग्रुपमध्ये पाठवा._🙏

भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, उत्कृष्ट संसदपटू व कवि, लेखक, पत्रकार, संपादक कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏* *( २५ डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील लेखमाला एकूण 5 भागात खास आपल्यासाठी

*भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न, उत्कृष्ट संसदपटू व कवि कै. अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🌹👏👏👏👏👏* 
*( २५ डिसेंबर रोजी भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती आहे. त्यानिमित्ताने त्यांच्यावरील लेखमाला एकूण 5 भागात खास आपल्यासाठी...)* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग एक )* 

अटल बिहारी वाजपेयी हे भारतीय राजकारणातलं एक निर्मळ आणि शुद्ध व्यक्तिमत्व. धर्म, जातपात, भाषा आदींच्या पलीकडे खऱ्या अर्थाने जाऊन अटलजींनी काम केले. राजकारणात ४५ वर्षे घालवून सुद्धा त्यांचे विरोधक देखील एकही आरोप त्यांच्यावर करू शकले नाहीत. मेणाहूनि मऊ आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेदू ऐसे. भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी. या तुकाराम महाराजांच्या उक्ती अटलजींच्या व्यक्तिमत्वाचं सार्थ वर्णन करतात. त्यांच्या या स्वभावाचे आणि निष्कलंक चारित्र्याचे मूळ त्यांच्यावर बालपणी झालेल्या सुसंस्कारात आहे. 

ग्वाल्हेर येथे त्यांचे शिक्षण झाले असले तरी उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे त्यांचे मूळ गाव. याच ठिकाणी त्यांचे आजोबा आणि पणजोबा राहत होते. त्यांचे आजोबा आणि पणजोबा हे अत्यंत विद्वान आणि धार्मिक होते. त्याच संस्कारात अटलजींचे वडील कृष्णबिहारी वाढले.अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म २५ डिसेंबर १९२४ रोजी झाला. कवी, लेखक, पत्रकार, राजकीय नेते असंअष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या अटलजींचा एका छोट्या राजकीय कार्यकर्त्यापासून ते पंतप्रधानपदापर्यंतचा झालेला प्रवास  थक्क करणारा आहे. त्यांचे वडील कृष्णबिहारी हे संस्कृत,हिंदी आणि इंग्रजी या तीनही भाषांचे उत्तम जाणकार तर होतेच, पण ते प्रख्यात कवीही होते. त्यांचेच काव्यगुण जणू वारशाच्या रूपाने अटलजींमध्ये उतरले. कृष्णबिहारी हे व्यवसायाने शिक्षक होते. त्यांच्या करड्या नजरेखाली अटलजींचे बालपण गेले. 

अटलजींच्या कवितांचं जेव्हा जेव्हा कौतुक केलं जाई, तेव्हा तेव्हा ते त्याचं सारं श्रेय आपल्या वडलांना देत असत. त्यांच्यापुढे मी काहीच नाही असे ते म्हणायचे. अटलजींचं नावही मोठं अर्थपूर्ण आहे. अटलबिहारी या नावातच विरोधाभास आहे. अटल म्हणजे न ढळणारा आणि बिहारी म्हणजे स्थिर नसलेला किंवा भ्रमण करणारा. राजकारणाच्या क्षेत्रातला हा अढळ तारा होता, आणि साहित्याच्या प्रातांत सतत मुशाफिरी करणारे हे व्यक्तिमत्व होते. अटलजींच्या बालपणीच्या आठवणी या त्यांच्या निसर्गरम्य आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या छोट्याशा बटेश्वर गावाशी निगडित आहेत. आपल्या बालपणीच्या आठवणी जागवताना ते तेथील वातावरणाचा अतिशय रम्य उल्लेख करतात. ' आओ मनकी गाठे खोले ' या कवितेत ते म्हणतात, 

यमुना तट, टिले रेतीले 

घास फूस का घर डाँडे पर,

गोबर से लीपे आँगन मे, 

तुलसी का बिरवा, घंटी स्वर 

माँ के मुहसे रामायणके दोहे- चौपाई रस घोले !

आओ मनकी गाठे खोले !

अटलजींच्या कवितेत तेथील वातावरण खऱ्या अर्थाने जिवंत होते. वडिलांच्या काव्यगुणांचा वारसा अशा रीतीने त्यांच्याकडे आला. अटलजींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. त्यांची आई अत्यंत धार्मिक वृत्तीची आणि साध्या स्वभावाची गृहिणी होती. मात्र ती सुगरणही होती. आईच्या हातचे पदार्थ खायला अटलजींना अतिशय आवडत. अटलजी निरनिराळया खाद्यपदार्थांचे चाहते होते. पण तरीही आईच्या हाताची चव त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी होती. अटलजींचे पुढील शिक्षण ग्वाल्हेरला झाले. ग्वाल्हेरच्या बारा गोरखी येथील गोरखी गावी सरकारी उच्चमाध्यमिक शाळेत त्यांनी प्राथमिक शिक्षण पुर्ण केले त्यानंतरचे शिक्षण घेण्याकरीता ग्वाल्हेर  मधील व्हिक्टोरिया काॅलेज (आताचे लक्ष्मीबाई काॅलेज) मधे प्रवेश घेतला. हिंदी, इंग्लिश आणि संस्कृत विषयांमधे विशेष प्राविण्याने ते उत्तीर्ण झाले.याच सुमारास समर्पित संघ प्रचारक नारायणराव तरटे यांच्या संपर्कात ते आले आणि त्यांच्या प्रेरणेतून अटलजी संघकार्याशी जोडले गेले ते कायमचेच. नारायणराव तरटे हे अटलजींपेक्षा वयाने फार मोठे नव्हते. पण तरीही या दोघांचे गुरुशिष्याचे नाते अलौकिक असे होते. अटलजी त्यांना मामू म्हणत. याच नारायणरावांना अटलजी एक दिवस भारताचे पंतप्रधान होतील असा विश्वास होता. 

नारायणराव यांना अटलजी यांनी षष्ठ्यब्दीपूर्ती निमित्ताने एक पत्र पाठवले होते. अतिशय सुंदर अशा या पत्रात अटलजींनी आपले जीवन कसे असावे याचे फार सुंदर वर्णन केले आहे. ते म्हणतात ' बम्बई से प्रकाशित नवनीत ने दिवाली अंक के लिये पूछा था की मेरी मनोकामना क्या है ! पता नही आपके बौद्धिक वर्ग के भाव मुझे कैसे स्मरण आ  गये और मैने कह दिया : हसते हसते मरना और मरते मरते हसना यही मेरी मनोकामना है. '

य दरम्यान अटलजींवरील संघकार्याच्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या होत्या. ते एक उत्तम वक्ता आणि कवी म्हणून देखील नावारूपास येत होते.  याच कालावधीत त्यांनी लिहिलेली ' हिंदू तनमन, हिंदू जीवन, रग रग हिंदू मेरा परिचय ' ही कविता सगळ्या संघ स्वयंसेवकांना इतकी स्फूर्तिदायक वाटली की ती सर्वत्र म्हटली जाऊ लागली. ते जिथे जात तिथे त्यांना ही कविता म्हणण्याचा आग्रह होऊ लागला. बरेचदा अटलजी संघ कार्यासाठी कॉलेजचे तास बुडवून जात. हे जेव्हा त्यांच्या वडलांना कळे तेव्हा वडील रागावत. अटलजी त्यांना म्हणत तुम्ही माझे मार्क्स बघा, मग बोला. आणि खरंच अटलजी संघ कार्यासाठी वेळ देऊनही अभ्यासात कुठेही मागे पडत नसत. 

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव* 

 *०३/१२/२०२०* 

( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )
➖➖➖➖➖➖➖➖
*उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग दोन )* 

अटलजी ग्वाल्हेरच्या कॉलेजातून हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी या तीनही विषयात विशेष प्राविण्य मिळवून उत्तीर्ण झाले. अशा हुशार आणि होतकरू विद्यार्थ्यांना तेव्हा ग्वाल्हेर संस्थानची शिष्यवृत्ती मिळत असे. ती अटलजींना सुद्धा मिळाली. पण अशा विद्यार्थ्यांना ग्वाल्हेर संस्थानात काही काळ नोकरी करावी लागे. पण अटलजी ज्या निष्ठेने संघाच्या माध्यमातून देशसेवेचे कार्य करीत होते, ते पाहून त्यांच्यासाठी ही अट  शिथिल करण्यात आली. या पुढील शिक्षणासाठी अटलजींनी कानपूरला जाण्याचे ठरवले. कानपूरला जाऊन एकाच वेळी एम ए आणि एल एल बी करण्याचा त्यांचा मानस होता. 

पण यावेळी एक गमतीदार गोष्ट घडली. अटलजींच्या वडलांनी देखील त्यांच्या सोबत लॉ ला प्रवेश घेण्याचे ठरवले. एकाच वेळी वकिलीचे शिक्षण घेणारे हे बहुधा पहिलेच पिता पुत्र असावेत. ते एकत्र एकाच होस्टेलवर राहत आणि एकाच वर्गात बसत. त्यामुळे सगळ्यांचे लक्ष ही जोडी आकर्षून घेत असे. एम ए च्या परीक्षेत अटलजींनी विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळवला. पण एक आश्चर्याची गोष्ट घडली. त्यांचे वडील वकिलीची परीक्षा पास झाले. अटलजी मात्र त्यात अयशस्वी झाले. त्याला कारणही तसेच होते. या काळात मुस्लिम लीगच्या ' डायरेक्ट ऍक्शन ' मुळे देशातील वातावरण गढूळ झाले होते. हिंदू-मुस्लिम जातीय सलोखा धोक्यात आला होता. हिंदूंवर अत्याचार होत होता. देश फाळणीच्या उंबरठयावर उभा होता. 

अशा वेळी संघाचे जातीय सलोख्यासाठी प्रयत्न सुरु होते. हिंदू समाजाचे मनोधैर्य टिकून राहावे यासाठी संघ प्रयत्नशील होता. गोळवलकर गुरुजी सर्वांना सहकार्यच आवाहन करीत होते. अशा वेळी अटलजींसारखी देशभक्त व्यक्ती केवळ अभ्यासात रमणे शक्यच नव्हते. खरं तर त्यांना वकिलीसोबतच पी एच डी पण करायचं होतं. पण भारतमातेला जणू त्यांच्यासारख्या तरुणांची गरज होती. भारतमातेच्या सेवेप्रित्यर्थ लॉ आणि पी एच डी या आपल्या दोन्ही स्वप्नांवर अटलजींनी जाणीवपूर्वक पाणी सोडले आणि संघकार्यासाठी वाहून घेतले. 

ते लखनौ जवळील संडीला गावी आले. इथे त्यांची प्रकृती बरी नसताना त्यांनी कामाला सुरुवात केली. याच काळात त्यांची प्रसिद्ध कविता ' अमर आग है ' लिहिली गेली. या कवितेतून त्यांच्या भावनांना अटलजींनी वाट करून दिली आणि देशभक्तीची ही आग प्रत्येक हृदयात पेटवण्यासाठी ते सतत कार्यरत राहिले. 

कोटि कोटि आकुल हृदयोमे 

सुलग रही है जो चिंगारी, 

अमर आग है, अमर आग है !

ही देशभक्तीची आग त्यांच्या हृदयात सतत धगधगत होती. याच कालावधीत ' राष्ट्रधर्म ' या मासिकाच्या संपादनाची जबाबदारी त्यांच्यावर पडली. एका अगदी  खोलीत त्यांच्यासोबत अटलजी इतर काही संघ कार्यकर्त्यांसोबत राहू लागले. अटलजी खाण्याचे जरी शौकीन होते तरी याकाळात मिळेल ते जेवण स्वीकारून त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. यावेळी पाञ्चजन्य या मासिकाच्या संपादनाची जबाबदारीही त्यांच्यावर आली. संघकार्य करीत असताना अटलजींवर संघाच्या एकात्मभावाचा अतिशय चांगला परिणाम झाला. संघामध्ये जातपात, भेदभाव आदींना स्थान नव्हते. या सगळ्या गोष्टींनी प्रभावित होऊन अटलजींनी आपल्या गळ्यातील जानवे काढून टाकले. त्यांचे वडील त्यांना याबाबत बोलले, तरी त्यांनी आपला निर्णय बदलला नाही. कोणत्याही चांगल्या गोष्टींची सुरुवात स्वतःपासून होते यावर अटलजींचा ठाम विश्वास होता. कोणतीही गोष्ट इतरांना सांगण्याआधी ते स्वतः ती आचरणात आणत असत. 

अटलजींच्या विचारात स्पष्टता असे. त्याचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. देशातील मुस्लिम लीगने निर्माण केलेले वातावरण पाहून गोळवलकर गुरुजींनी देशातील मुस्लिमांसंदर्भात एक  विधान केले होते. त्यावेळी त्या विधानावरून वाद निर्माण झाला होता. यावेळी इंदिराजी उपस्थित होत्या. त्यांना गोळवलकर गुरुजींचे विधान अजिबात मान्य नव्हते. त्या अटलजींना म्हणाल्या, ' याचा अर्थ या देशात मुस्लिमांना स्थान नाही. ' अटलजी म्हणाले ' असे त्यांनी कुठे म्हटले आहे हे मला दाखवा. ' इंदिराजी म्हणाल्या की गोळवलकर गुरुजींच्या मते मुसलमानांनी राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायला हवे. याचा अर्थ त्यांना या देशात स्थान नाही. अटलजींनी इंदिराजींना फार सुंदर स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, ' यात चूक ते काय राष्ट्रीय प्रवाहात सामील होणे याचा अर्थ त्यांना या देशात स्थान नाही असा होत नाही. या देशाचे नागरिक म्हणून राष्ट्रीय प्रवाहात सामील व्हायलाच हवे. राष्ट्रीय प्रवाह ओळखता यायला हवा. त्याबाबतच मतभेद असतील तर मग बोलणेच व्यर्थ ! ' या अटलजींच्या तर्कशुद्ध उत्तरावर इंदिराजींना काही बोलता आले नाही. 

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव* 
 *६. १२/. २०२०* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा )*
➖➖➖➖➖➖➖➖
Vishwas Deshpande:
 *उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग तीन )* 

राजकारणासारख्या रुक्ष वातावरणात राहूनही अटलजींनी आपली काव्यप्रतिभा कधी कोमेजू दिली नाही. त्यांच्यातला लेखक आणि कवी त्यांच्यातल्या राजकारणी व्यक्तीला सदैव मार्गदर्शन करीत राहिला. त्यामुळे इतर राजकारणी व्यक्तींप्रमाणे अटलजींनी बोलताना कधी आपली मर्यादा ओलांडली नाही. देशभक्ती तर त्यांच्या नसानसात भिनली होती. १९४२ च्या आंदोलनात त्यांनी भाग घेतला. त्यात त्यांना अटकही झाली होती. पुढे ज्या संघाचं काम ते करीत होते, त्या संघावरही बंदी आली.  पण अटलजी विचलित झाले नाहीत. आपल्या ' कदम मिलाकर चलना ' होगा या कवितेत ते म्हणतात 
बाधाए आती हैं आए, 
घिरे प्रलय की घोर घटाए 
पावोंके नीचे अंगारे 
सिर पर बरसे यदी ज्वालाये, 
निज हाथोंसे हसते हसते,
आग लगाकर जलना होगा !
कदम मिलाकर चलना होगा !
हाच बाणा आणि हीच आग त्यांनी आयुष्यभर पेटती ठेवली. वेगळे वागणे त्यांना शक्यच नव्हते. याच सुमाराला अटलजी एक प्रभावी वक्ता म्हणून प्रसिद्धीस येत होते. आपल्या विदवत्तापूर्ण वक्तृत्वाने त्यांनी संघामध्ये एक वेगळी छाप पाडली होती. १९५७ चा तो काळ होता. लोकसभेच्या निवडणुकीसाठी अटलजींसारख्या फर्ड्या वक्त्यावर संघाची मदार होती. त्यामुळे अटलजींना बलरामपूर, लखनौ आणि मथुरा या तीनही मतदारसंघातून उभे करण्याचा निर्णय घेण्यात आला. घागरा नदीच्या काठी असलेले बलरामपूर हे नेपाळ यात्रेतील एक महत्वाचे ठिकाण होते. या ठिकाणी थांबून यात्रेकरू पुढे जात असत. अशा या बलरामपूरला जातीय वादाचे ग्रहण लागले होते. या ठिकाणी मुस्लिम धर्मीय जमीनदारांचे वर्चस्व होते. हे जमीनदार गोरगरीब हिंदू जनतेला भयंकर त्रास देत असत, पिळवणूक करीत असत. येथे त्यांची दहशत एवढी वाढली होती की हिंदूंना शंख, घंटा इ वाजविण्यासही बंदी होती. त्यामुळे या मुस्लिम जमीनदारांविरुद्ध जनतेत असंतोष होता. लखनौ आणि मथुरा येथील मतदारसंघात अटलजींचा पराभव झाला पण बलरामपूरमध्ये हिंदूंमधील असंतोषाचा फायदा त्यांना मिळाला आणि अटलजी १,१८,३६० मतांनी दणदणीत विजय मिळवून  निवडून आले आणि अशा रीतीने संसदेत त्यांचा प्रवेश झाला. 
यावेळी संसदेत गोविंद वल्लभ पंत, पं नेहरू, मौलाना आझाद, जगजीवन राम या सारखे दिग्गज आणि अनुभवी नेते निवडून आलेले होते. या तुलनेत अटलजी नवीन आणि अननुभवी होते. पण आपल्या वक्तृत्वाच्या जोरावर त्यांनी या नेत्यांना देखील प्रभावित केले होते. त्यांचे प्रांजळ आणि परखड विचार, ओघवती आणि मंत्रमुग्ध करणारी अभ्यासपूर्ण भाषाशैली यामुळे त्यांनी सगळ्यांची मने जिंकली. स्वतः पंडित नेहरूंनी अटलजींचे कौतुक करून त्यांना शाबासकी दिली. 
यानंतर १९६२ च्या लोकसभा निवडूणुकीत मात्र अटलजी निवडून येऊ शकले नाहीत. स्वतंत्र भारताच्या दृष्टीने हा कालखंड अत्यंत महत्वाचा होता. या काळात चीनचे आक्रमण, लाल बहादूर यांच्यासारख्या कर्तबगार नेत्याचे पंतप्रधान पदावर आरूढ होणे, ताशकंद कराराच्या वेळी त्यांचा दुर्दैवी मृत्यू होणे या सारख्या वेगवान घटना घडत होत्या. अशा वेळी अटलजींसारखी व्यक्ती संसदेत असणे ही काळाची गरज होती. पण निवडून न आल्याने त्यांना ही संधी मिळू शकली नाही. याची खंत त्यांच्या संवेदनशील मनाला कायम होती. याची उणीव त्यांनी पुढे भरून काढली. असे असले तरी १९६२ आणि १९६८ या दोन्ही वर्षी ते राज्यसभेत सदस्य म्हणून होतेच. 
अटलजींचं वक्तृत्व श्रोत्यांना खिळवून ठेवत असे. त्यामध्ये त्यांचा रामायण, महाभारत या सारख्या ग्रंथांचा सखोल अभ्यास दिसून त्यात ते कोट्या इतक्या मार्मिक पद्धतीने करीत की समोरच्याची हसून हसून पुरेवाट होत असे. या जोडीला त्यांचे प्रभावी हातवारे यात भर घालत. मात्र श्रोत्यांना विनोदातून ते सहज गंभीर वस्तुस्थितीकडे घेऊन जात. जबाबदारीची जाणीव करून देत. विरोधी पक्षीयांच्या डोळ्यायेई. तुलसी रामायणाचाही त्यांच्यावर प्रभाव होता. त्यांची भाषाशैली ओघवती असे. सभेच्या सुरुवातीपासूनच ते श्रोत्यांना खिळवून ठेवत. कोणाचेही नाव न घेता समोरचा जर चुकला असेल तर ते त्याच्या डोळयांत झणझणीत अंजन घालत आणि तेही कुठलीही मर्यादा न सोडता. त्यांच्या वक्तृत्वाचा एक किस्सा येथे सांगण्यासारखा आहे. 
१९७० च्या सुमारास पुण्यात त्यांची एक जाहीर सभा झाली होती. त्यावेळी त्यांनी मध्य प्रदेशातील सरकारचा एक गमतीदार किस्सा सांगितला. त्यावेळी मध्य प्रदेशात काँग्रेसचं सरकार स्थापन झालं होतं. मध्य प्रदेशातील प्राथमिक वर्गात अंकलिपीचं एक पुस्तक लावलेलं होतं. त्या पुस्तकात ' ग ' गणपतीचा असं दिलेलं होता. तेव्हा काही सदस्यांनी या गोष्टीला हरकत घेतली. कारण त्यांची तथाकथित धर्मनिरपेक्षता आड येत होती. पाठ्यपुस्तक मंडळाच्या सदस्यांनी ठरवलं की गणपती हटवून दुसरं काहीतरी त्या जागी टाकायचं. मंडळाचे सदस्य त्यासाठी शोध घेऊ लागले. त्यांना शोध घेता घेता एक प्राणी आढळला. तो म्हणजे गाढव. त्यांनी गणपती हटवला आणि गाढवाला त्या जागी विराजमान क

ेलं. वाजपेयींनी आपल्या मिश्किल शैलीत या घटनेचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले, ' गणेशजी बुद्धी की देवता हैं और गधा मूर्खता का प्रतीक. लेकिन इनको गधा चलता हैं, गणेशजी नही. गणेशजीका  तिरस्कार और गधे का पुरस्कार...यही हैं इनकी सरकार. ' ( क्रमशः पुढील भाग शुक्रवारी )

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* 
 *०९/१२/२०२०* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा )*
➖➖➖➖➖➖➖➖

*उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग चार )* 

अटलजींसारखा नेता म्हणजे भारतमातेला लाभलेलं दुर्मिळ रत्न..! राजकारणातल्या दलदलीत राहूनही हे कमळ फुलत राहिलं. त्यांचं सगळं जीवन म्हणजे कमलपत्रासारखं निर्लेप, निर्मोही. पाण्यात राहूनही पाण्यापासून अलिप्त, चिखल, दलदलीत राहूनही त्या सगळ्यांपासून अलिप्त. केवळ आनंद देणं हेच त्याचं काम. हे कमलपुष्प भारतमातेच्या चरणी जन्मापासूनच अर्पित झालं होतं, म्हणून तर अटलजी आजन्म अविवाहित राहिले. आपलं सगळं आयुष्य या महापुरुषाने भारतमातेच्या सेवेत व्यतीत केलं. 

अनेकांच्या जीवनात चढउतार येतात, अपयशाचे कडू घोटही घशाखाली रिचवावे लागतात. तसे अटलजींनीही रिचवले. अनेकदा त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आणिबाणीसारख्या प्रसंगी कारागृहात राहावे लागले. या काळात तब्येतीच्या अनेक तक्रारींनाही तोंड द्यावे लागले.

 की घेतले न हे व्रत अंधतेने । लब्धप्रकाश इतिहास निसर्ग माने 
जे दिव्य, दाहक म्हणूनी असावयाचे । बुद्ध्याची वाण धरिले करी हे सतीचे।।

या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कवितेतील ओळींप्रमाणे हे सतीचे वाण त्यांनी हेतुपुरस्सर स्वीकारले होते,  त्यामुळे कधी पश्चाताप करण्याची वेळ त्यांच्यावर आली नाही. 

परिस्थितीच्या मागणीनुसार १९७७ मध्ये जनसंघाचे विलीनीकरण जनता पक्षात करण्यात अटलजींचा पुढाकार होता. पुढे मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार स्थापन झाले, त्यात अटलजी परराष्ट्रमंत्री होते. या काळात त्यांनी या पदावर अतिशय प्रभावीपणे काम करून आपल्या नेतृत्वशैलीची वेगळी छाप उमटवली. परंतु ज्या पद्धतीने जनता पक्षाचे राजकारण आणि कामकाज सुरु होते, त्यावर अटलजी नाराज होते. त्यामुळे १९८० मध्ये त्यांनी जनता पक्षाचा राजीनामा देऊन भारतीय जनता पार्टी या नावाचा नवा पक्ष स्थापन केला. या पक्षाचे ते अध्यक्ष झाले. अटलजींनी फार थोड्या कालावधीत भारतीय जनता पक्षाला सत्तेच्या सिंहासनापर्यंत पोहोचवले. अर्थात त्यांच्या जोडीला लालकृष्ण अडवाणी, नानाजी देशमुख, पं दिनदयाळजी उपाध्याय यांसारखे दिगग्ज नेते होते. पण अटलजींच्या नेतृत्वावर सर्वांचीच मदार होती. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी, पं दिनदयाळजी उपाध्याय यांच्यानंतर त्यांची पोकळी भरून काढणारा एकमेव ध्येयवादी, समर्पित नेता म्हणजे अटलजी. 

अटलजी एकंदर तीन वेळा भारताचे पंतप्रधान झाले. मात्र त्यांचा सुरुवातीचा म्हणजे पहिल्या पंतप्रधानपदाचा काळ अल्पजीवी ठरला. त्यांनी सरकार चालवण्यासाठी किंवा सत्तेला चिकटून राहण्यासाठी कोणत्याही तडजोडी केल्या नाहीत. हे सरकार त्यामुळे फक्त तेरा दिवस चालले. पुन्हा दुसऱ्या वेळी अटलजी १९९८ मध्ये पंतप्रधान झाले. हे सरकार तेरा महिने पदावर होते. पण नियतीने पुन्हा तेरा ऑक्टोबर १९९९ मध्ये अटलजींना पुन्हा पंतप्रधान होण्याची संधी दिली. यावेळी मात्र त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ यशस्वी रित्या पूर्ण केला. पंतप्रधान म्हणून पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करणारे त्यांच्या नेतृत्वातील हे पहिलेच बिगर काँग्रेसी सरकार होते. या काळात अटल सरकारने अनेक महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेतले. त्यांचा उल्लेख पुढे येईलच. पण त्यापूर्वी त्यांनी विरोधी पक्षनेता म्हणून काम करताना, परराष्ट्रमंत्री म्हणून काम करताना घेतलेले निर्णय त्यांच्या दूरदर्शीपणाची साक्ष देतात. त्यातील एकदोन गोष्टी पाहणे महत्वाचे आणि रंजक ठरेल. 

राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी श्रीलंकेत मदतीसाठी शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला होता. हे जेव्हा अटलजींना कळले, तेव्हा ते विचारात पडले. ते उद्गारले, ' प्रभू रामचंद्रानंतर श्रीलंकेत सेना पाठवणारे राजीवजीच निघाले. पण हे त्यांचं धोरण मला दूरदर्शीपणाचं वाटत नाही. ' अटलजींचे उदगार सार्थ होते हे नंतर सिद्ध झालं. भारत श्रीलंका संबंध सुधारले तर नाहीतच, पण या निर्णयापोटी राजीव गांधींना आपल्या प्राणांचं मोल चुकतं करावं लागलं. पण राजीव गांधींच्या अकाली निधनाने कवीमनाचा हा नेता हळहळला. ते म्हणाले,

 ' जन्म के साथ मरण जुडा है. लेकिन जब मृत्यू सहज नही होती... भरी जवानी में किसी जीवनपुष्प को चिता के राख मे बदल देती है... एक षडयंत्र का परिणाम होती है, तो परिवारवाले किस तरह से उस वज्रपात को सहें  ?'

नरसिंहराव पंतप्रधान असतानाची एक घटना आहे. काँग्रेसच्या काही खासदारांनी काँग्रेसच्याच चार मंत्र्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करून तसे पत्र नरसिंहरावांना पाठवून पक्षाला घरचा आहेर दिला होता. भारतीय जनता पक्षाच्या काही खासदारांना सरकारला कोंडीत पकडण्याची ही नामी संधी आहे असे वाटले आणि ते अटलजींकडे आले. अटलजींना ही बातमी सांगून त्यांनी हा प्रश्न सभागृहात उपस्थित करावा अशी विनंती केली. पण अटलजींनी त्याला नकार दिला. ते खासदार आश्चर्यचकित झाले. अटलजी असे का म्हणत आहेत हे त्यांना कळेना. संसदेतील शून्य प्रहराला अजून काही अवधी बाकी होता.

अटलजी त्या खासदारांना म्हणाले, ' ज्यांनी त्या मंत्र्यांवर आरोप केले, त्यांच्यापैकी कोणी तुम्हाला भेटतो का ते पहा आणि शक्य झाल्यास त्यांच्याकडून त्या पत्राची प्रत मिळवा. ' परंतु त्या खासदारांना ना ते आरोप करणारे खासदार भेटले ना त्या पत्राची प्रत मिळू शकली. एखादी बातमी केवळ वृत्तपत्रात आली म्हणून ती खरी मानून चालणाऱ्यांपैकी अटलजी नव्हते. म्हणूनच त्यांच्या शब्दाला  विश्वासार्हता आणि वजन प्राप्त झाले होते. 

 *© विश्वास देशपांडे, चाळीसगाव* 
 *११-१२-२०२०* 
 *प्रतिक्रियेसाठी ९४०३७४९९३२* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )
➖➖➖➖➖➖➖➖
*उगवतीचे रंग* 

 *भारतरत्नावली* 

 *अजातशत्रू नेता : अटलबिहारी वाजपेयी ( भाग पाच - अंतिम )* 

मोरारजी देसाई सरकारच्या काळात परराष्ट्रमंत्री पदाची जबाबदारी अटलजींकडे देण्यात आली. दोन वर्षांच्या या मंत्रिपदाच्या कारकीर्दीत अटलजींनी भारत -चीन आणि भारत - पाक संबंध सुधारण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. १९७९ मध्ये ते चीन भेटीवर गेले. १९६२च्या युद्धानंतर दोन देशांदरम्यान संबंध सुधारण्याचा हा प्रयत्‍न होता. त्यांनी नंतर पाकिस्तानलाही भेट दिली. त्याआधी १९७१च्या युद्धानंतर भारत व पाक दरम्यान चर्चा आणि व्यापार ठप्प होता.
अटलजींनी निःशस्त्रीकरण परिषदेत देशाचे प्रतिनिधित्व केले आणि भारताच्या अणुकार्यक्रमाचे जोरदार समर्थन केले. विदेशमंत्री म्हणून १९७७च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदी भाषेबद्दल प्रेम असलेल्या अटलजींनी हिंदीतच भाषण करण्याचे ठरवले. राष्ट्रसंघात हिंदीला मान्यता नव्हती. त्यामुळे हिंदीत भाषण करताना त्यांना अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागला. पण ते मागे हटले नाहीत. त्यांना इतका आनंद झाला की ते म्हणाले 

 *गुंजी हिंदी विश्वमें* 
 *स्वप्न हुआ साकार* 
 *राष्ट्रसंघ के मंचसे* 
 *हिंदी की जयकार* !

अटलजींनी आपल्या कार्यकाळात पुढील काही अत्यंत महत्वाची कामे केली. 11 आणि 13 मे 1998 ला पोखरण येथे पाच भुमिगत परमाणु परिक्षण विस्फोट करून अटल बिहारी वाजपेयींनी भारताला परमाणु शक्ती संपन्न देश घोषित केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत गोपनीयरित्या पार पाडली गेली. या भारताने टाकलेल्या यशस्वी आणि धाडसी पावलांमुळे पाश्चिमात्य राष्ट्रांना धक्का बसून त्यांनी अनेक अटी भारतावर लादल्या. पण वाजपेयी सरकारने या सर्व गोष्टींचा खंबीरपणे सामना केला. 

19 फेब्रुवारी 1999 ला पाकिस्तान समवेत चांगले संबंध प्रस्थापित करण्याकरता पुढाकार घेत सदा.ए.सरहद नावाने दिल्ली ते लाहौर बस सेवा सुरू करण्यात येऊन स्वतः वाजपेयी पाकिस्तानला जाऊन आले. भारत पाक संबंध सुरळीत करण्यासाठी पुढाकार घेतला. महत्वाची शहरे महामार्गांनी जोडण्यासाठी स्वर्णिम चतुर्भुज परियोजना कार्यान्वित केली.  100 वर्षांपेक्षा अधिक जुना असलेला कावेरी जलविवाद सोडविला.
देशातील सर्व विमानतळांचा आणि राष्ट्रीय महामार्गांचा विकास केला: कोकण रेल्वे व नव्या टेलीकाॅम नितीची सुरूवात करून पायाभूत विकास करण्याकरीता पाऊले उचलली.आर्थिक सल्लागार समिती, व्यापार व उद्योग समिती, राष्ट्रीय सुरक्षा समितीची रचना केली त्यामुळे कामांचा वेग वाढला. याशिवाय लोकहिताच्या दृष्टीने अनेक महत्वाची कामे तडीस नेली. 

अटलजी म्हणजे एक कवी मनाचा राजकारणी. संगीत, कलांचा आस्वाद घेणारा एक रसिक. काव्यशास्त्र विनोदात रमणारा एक जिंदादिल माणूस...राजकारणाच्या धामधुमीतही अटलजींची काव्य आणि लेखन प्रतिभा कार्यरत होती. मेरी संसदीय यात्रा, मेरी इक्यावन कविताये, संकल्प काल, शक्ती से शांती, फोर डीकेड्स इन पार्लमेंट, कैदी कविराज की कुंडलिया आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. जीवनाबद्दल एका कवितेत सुरेख भाष्य करतात 

 *जन्म मरण का अविरत फेरा* 
 *जीवन बंजारो का डेरा* 
 *आज  यहाँ कल कहाँ कुच है* 
 *कौन जानता किधर सवेरा...* 

भविष्याचा वेध घेणारी त्यांची नजर सर्व समाजाला आणि दिशाहीनांना नवी दिशा देत होती.

 *हम पडाव को समझे मंझिल* 
 *लक्ष्य हुआ आँखो से ओझल* 
 *वर्तमान के  मोहजाल मे* 
 *आनेवाला कल न भुलाए* 
 *आओ फिरसे दिया जलाएँ* ...

आपल्या वाणीनं  सार्वजनिक सभा आणि संसद गाजवणारे अटलजी  तसे मितभाषी होते. त्यांना निसर्गात रमायला,  निसर्गाची विविध रुपं बघायला आवडायची.  ते संगीताचेत्यांचा छंद होता. गीत रामायण ऐकायला त्यांना अतिशय आवडायचं. त्यामुळे बाबुजींशी म्हणजेच सुधीर फडकेंशी त्यांची खास मैत्री होती. भीमसेन जोशींनाही ऐकायला ते अतिशय उत्सुक असत. भीमसेन जोशींची खास मैफिल वाजपेयी पंतप्रधान असतानापुण्यात झाली होती. पण कवी मनाच्या अटलजींनी कारगिल युद्धाच्या वेळी कणखर भूमिका घेतली. 

 *दांव पर सब कुछ लगा है* 
 *रुक नही सकते, टूट  सकते है* 
 *मगर हम  झुक नही सकते*... 

ते आपल्या कवितांबद्दल बोलताना  म्हणतात 

’’माझ्या कविता म्हणजे युध्दाची घोषणा करण्यासारख्या आहेत ज्यात हारण्याची भिती नाही, माझ्या कवितांमधे सैनिकाला हरण्याची भिती नाही तर जिंकण्याची आस असेल. माझ्या कवितांमधे भिती चा आवाज नव्हें तर जिंकण्याचा जयघोष असेल.’’

अटलजींना आपल्या आयुष्यात अनेक मोठमोठे सन्मानाचे पुरस्कार लाभले. या विद्वान, कवी मनाच्या आणि स्वच्छ चारित्र्याच्या नेत्याचा गौरव 25 डिसेंबर 2014 ला भारताचा सर्वोच्च पुरस्कार ’’भारतरत्न’’  देण्यासाठी देऊन करण्यात आला. भारताचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी स्वतः 27 मार्च 2015 ला अटलजींच्या घरी त्यांना हा पुरस्कार देण्याकरता गेले.

 *अटलजींना मिळालेला सर्वात मोठा पुरस्कार म्हणजे त्यांनी भारतवासीयांच्या हृदयात कायमचे आदराचे स्थान मिळाले आहे.*

 हीच खरी त्यांच्या कामाची पावती आहे. २५ डिसेंबर हा *अटलजींचा जन्मदिवस गुड गव्हर्नन्स डे अर्थात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो.* आजच्या काळात खरी गरज अटलजींसारख्या स्वच्छ, चारित्र्यवान, अभ्यासू आणि निष्कलंक नेत्यांची आहे. अटलजी आज जरी आपल्यात नसले तरी जीवन कसं जगावं याचा आदर्श त्यांनी आपल्या उदाहरणातून घालून दिला आहे. ज्यांना वाजपेयींना समजून घ्यायचं असेल त्यांनी त्यांच्या विविध विषयावर केलेल्या अभ्यासपूर्ण भाषणांचा जरूर अभ्यास करावा. 

©️ *विश्वास देशपांडे, चाळीसगाव.* 
 *१३-१२-२०२०* 
 *प्रतिक्रियेसाठी क्र ९४०३७४९९३२* 
( *कृपया लेख नावासहित शेअर करावा* )
➖➖➖➖➖➖➖➖

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली शैक्षणिक बातमी

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची दैनिक वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली शैक्षणिक बा






























Friday, December 24, 2021

निवडश्रेणी संदर्भातील माहिती पात्रता व निकष

*अनेक शिक्षकांच्या मागणीस्तव 👇👇* 

◾ *निवडश्रेणी संदर्भातील* *माहिती पात्रता व  निकष* 

 *निवडश्रेणीसाठी शिक्षकांच्या अर्हता ,अनुभव, पात्रता*CV

--------------------------
https://m.facebook.com/story.php?story_fbid=110970550853890&id=106479051303040
--------------------------
▪️बऱ्याच शिक्षक बंधू भगिनींच्या आग्रहास्तव माहिती सादर▪️
 *संदर्भ* - शासन निर्णय 2 सप्टेंबर 1989,शासन निर्णय 1 डिसेंबर 1999,शासन निर्णय 29 जून 2002,शासन निर्णय 15 जुलै 2016
 *राज्यातील* *शिक्षकांसाठी* *शिक्षकांना* *निवडश्रेणीसाठी* *अर्हता*
1) *प्राथमिक शिक्षक(वर्ग 1 ते 8 ,D.Ed पात्रता धारक)* :- पदवि प्राप्त करणे आवश्यक (B.A, B.Com,B.Sc), 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर वरीष्ठवेतनश्रेणीचे प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा
2) *माध्यमिक शिक्षक* (वर्ग 9 ,10 वि B.Ed पात्रता):- 
वरीष्ठवेतन श्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा,पदवीधर शिक्षकांनी *पदव्यूत्तर पदवी  करणे आवश्यक आहे* 
उदा-अ) *B.A B.Ed* *धारकांनी* M.A/M.Ed/M.A(Edu) 
ब) *B.Com B.Ed धारकांनी* M.Com/M.Ed/M.A(Edu)
क) *B.Sc B.Ed धारकांनी* M.Sc /M.Ed/M.A(Edu)
 *टीप* - ज्या शिक्षकांना अध्यापनाच्या विषयांची पदव्यूत्तर पदवी किंवा तत्सम अर्हता बहिस्थ:रित्या संपादन करता येत नाही त्या ठिकाणी *M.Ed /M.A शिक्षणशास्त्र ( Edu* ) ही पदवी ग्राह्य धरण्यात येते ( *शासन निर्णय* *15 जुलै 2016* ) 
 *टीप* - *B.Sc B.Ed ( *Bio किंवा Math* ) यांनी *इतर विषयात इतिहास,मराठी,समाजशास्त्र इ MA केले असेल तर ग्राह्य धरले जात नाही* .
3) *उच्च माध्यमिक शिक्षक*:-(11,12 वि) उच्च माध्यमिक शिक्ष( M.A B.Ed/ M.Sc B.Ed/M.Com B.Ed) उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालय/अध्यापक विद्यालयातील शिक्षकांना 12 वर्षाचे वरीष्ठवेतनश्रेणी प्रशिक्षण पूर्ण केलेले असावे,एकाच वेतनश्रेणीत 24 वर्षे सेवा, *M.Phil / P.hd / M.Ed* /संगणकातील पदव्युतर पदवी *MS - ACITIT* इ अर्हता आवश्यक राहील.
4) *विशेष शिक्षक* :-
अ) *शारीरिक शिक्षक* :- *SSC, HSC व  एक वर्षे शारीरिक* *शिक्षण अभ्यासक्रम  प्रमाणपत्र* *धारकांना B.P.Ed ही अर्हता तर B.P.Ed धारकांनी M.P.Ed* ही अर्हता प्राप्त करावी
ब) *हिंदी शिक्षक*:- SSC,HSC धारकांनी संबधित विषयातील पदवी अथवा समकक्ष  व पदवी धारकांनी  संबंधित *पदव्युत्तर* वा *समकक्ष अर्हता* धारण करावी
क) *संगीत शिक्षक*:- मॅट्रिक/SSC असलेल्या *संगीत विशारद शिक्षकांनी* संबंधित *विषयातील* *पदवी* तर *पदवीधर* *शिक्षकांनी* संबंधित विषयातील पदव्युत्तर अर्हता धारण करावी
ड) *चित्रकला शिक्षक*:- DTC किंवा DMC किंवा ATD अशी अर्हता धारण करणाऱ्यानी *आर्ट मास्टर* ( *AM* ) प्रमाणपत्र तसेच G.D.आर्ट किंवा BFA पदवी( रेखा/रंगकला/उपयोजित कला/ शिल्पकला व प्रतिमान) अर्हता धारकांनी कला क्षेत्रातील *आर्ट मास्टर प्रमाणपत्र पदवी* ( *AM* ) किंवा *कला* *शिक्षणशास्त्र पदविका* ( *D.Ed* ) अशी अर्हता धारण करावी.
अध्यापक विद्यालय-अध्यापक विद्यालय त शिक्षकांची नेमणूक M.A/M.Sc, M.Ed ही आहे त्यामुळे वेगळी degreeघेण्याची आवश्यकता नाही .वरिष्ठ वेतनश्रेणी ही कालबध्द वेतनश्रेणी आहे , *टीप* - *Ded* *पात्रता* *धारक* *जे* *शिक्षक* *माध्यमिक* *शाळेत* 5 ते 7 वर प्रथम नियुक्ती झालेली आहे त्यात 12 वर्षा नंतर वरीष्ठवेतनश्रेणी मिळाली आहे त्यानंतर पदवीधर शिक्षक (25%) म्हणून नियुक्ती झाली असेल व 12 वर्षे झाले असेल तर निवडश्रेणीस पात्र नाही कारण वेतनश्रेणीत बदल झाला त्यामळे त्याना पदवीधर शिक्षकाची वरीष्ठवेतनश्रेणी मिळेल.
 *एक बाब लक्षात ठेवा एकाच वेतनश्रेणीमध्ये 12 वर्षे झाले तरच वरीष्ठवेतनश्रेणी व  24 वर्षे सेवा झाली असेल तरच निवडश्रेणी निवडश्रेणी संवर्गातील वरीष्ठवेतनश्रेणी मधील सेवाजेष्ठता नुसार 20 % पदांना मिळते सरसकट मिळत नाही तर माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापक यांना द्विस्तरीय वेतनश्रेणी आहे त्यांना निवडश्रेणी देय नाही*...
➖➖➖➖➖➖➖➖

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साने गुरुजी यांची जयंती साजरी*

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत साने गुरुजी यांची जयंती साजरी*























*तिवटग्याळ . - आज  दिनांक 24/12/2021 रोजी कोविड - 19 नियमांचे पालन करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे  साने गुरुजी यांची जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली . प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार यांनी साने गुरूजी च्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी केली उपस्थित सर्वांनी अभिवादन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आज साने गुरुजी यांचा जन्म दिवस असल्याने आपण आज त्यांची जयंती साजरी करत आहे असे सांगितले व  साने गुरुजी यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती देण्यात दिली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व  शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर,अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व शाळेतील सर्व विद्यार्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी मानले*

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा*

*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रीय गणित दिन साजरा*











*तिवटग्याळ - आज  दिनांक 22/12/2021 रोजी कोविड - 19 नियमांचे पालन करुन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिवटग्याळ ता उदगीर जिल्हा लातूर येथे गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस उत्साहाने साजरा करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना आज गणित तज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्म दिवस आहे. हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले व श्रीनिवास रामानुजन यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती देण्यात आली व हा दिवस राष्ट्रीय गणित दिन म्हणून साजरा केला जातो असे सांगितले. तद्नंतर शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीच्या  विद्यार्थाना गणित पेटीत असलेल्या वेगवेगळ्या साहित्याचे प्रदर्शन भरविण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी बेरीज वजाबाकी गुणाकार भागाका तसेच अपूर्णांक अशा विविध गणिती पट्टया मांडणी केली. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व  शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर यांनी मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर व शाळेतील सर्व विद्यार्थी आदी जणांच्या उपस्थितीत राष्ट्रीय गणित दिन साजरा करण्यात आला.*

बोळेगाव बु ता.शि.अनंतपाळ जिल्हा लातूर येथे आजादी का अमृतमहोत्सव उत्साहाने साजरा







Tuesday, December 21, 2021

श्रीनिवास रामानुजन थोडक्यात जीवन परिचय...

*श्रीनिवास रामानुजन*

*थोडक्यात जीवन परिचय....*

*श्रीनिवास रामानुजन (जन्म : तिरोड-तंजावर, २२ डिसेंबर १८८७; - कुंभकोणम, २६ एप्रिल १९२०) भारतीय गणितज्ञ होते. रामानुजन हे अलौकिक गणिती होते. रामानुजन हे गणिताचा विचार करीत असे. झोपेतही बहुधा त्यांचा मेंदू गणिताचाच विचार करत असे म्हणूनच ते झोपेतून जागे होताच अवघड अशी गणिती सूत्रे लिहून टाकत. त्यांच्या वडिलांचे नाव के. श्रीनिवास व आईचे नाव कोमलताम्मा तसेच पत्नीचे नाव एस जानकीअम्मा होते* .

                           *या महान गणितज्ञाने वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणम  माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धान्त सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. रामानुजन यांना गणिताचं इतकं वेड होतं की ते गणित सोडून इतर विषयाचा अभ्यास नीट करत नसत. परिणामी अकरावीला एकदा आणि बारावीला दोन वेळा ते नापास झाले*.

                              *रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात १९११ साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. १९१३ साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रो. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते. लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते १७ मार्च १९१४ रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. इंग्लंडला गेल्यावर रामानुजन यांची तब्येत खराब झाली. रामानुजन यांना इंग्लंडमधील एका हॉस्पिटलमध्ये दाखल केले. तेव्हा त्यांना भेटण्यासाठी जी.एच . हार्डी एका मोटारीतून गेले, त्या मोटारीचा क्रमांक होता १७२९. हार्डीनी रामानुजन यांना ही गोष्ट सांगताना मोटारीचा क्रमांक बोरिंग होता असं सांगितले. तेव्हा तत्काळ रामानुजन यांनी 'नाही तो क्रमांक बोरिंग नव्हता, उलट तो एक खूपच चांगला नंबर आहे. ही दोन वेगवेगळ्या घनांच्या बेरजेने येणारी सगळ्यात लहान संख्या आहे.' असं सांगितलं*.
*१२३+१३=१७२९आणि १०३+९३=१७२९*.
*तेव्हापासून १७२९ या संख्येला हार्डी - रामानुजन संख्या म्हटले जात* .

                     *१९१४ ते १९१७ या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. १९१८ साली रॉयल सोसायटीने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत*.

                      *रामानुजन यांची जयंती राष्ट्रीय गणित दिवस म्हणून साजरी केली जाते. गणिताच्या क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे रामानुजन फाईन आर्ट्स मध्ये नापास झाले होते, यावर कुणाचा विश्वास बसणार नाही. त्याकाळी कागदाची किंमत जास्त असल्याने रामानुजन पाटीवर गणित सोडवायचे. काही काळानंतर त्यांनी वहीवर गणित सोडवण्यास सुरुवात केली. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांनी लिहिलेल्या तीन वह्या समोर आल्या. एका वहीमध्ये ३५१ पाने होती. त्यांत १६ धडे सहज वाचता येतील व समजतील असे होते. मात्र काही मजकूर विस्कळीत,अस्पष्ट होता. दुसऱ्या वहीमध्ये २५६ पाने होती. त्यातील २१ स्पष्ट होती, तर १०० पानांवरील मजकूर समजण्यासारखा नव्हता . तिसऱ्या वहीमध्ये ३३ पाने अव्यवस्थित होती* .

*मृत्यू*

               *१९१९ साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी – एप्रिल २७, १९२० रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचेच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले*.
--------------------------
#माहितीस्तोत्र Wikipedia
*श्री ज्ञानेश्वर बडगे उदगीर तथा जिल्हा उपाध्यक्ष आदर्श शिक्षक समिती लातूर*
--------------------------



*शास्त्रज्ञांची शाळा स्तरावर जयंती साजरी करण्यासाठी उपयुक्त माहिती जन्म, मृत्यू आणि लावलेला शोध*

*शास्त्रज्ञांची शाळा स्तरावर जयंती साजरी करण्यासाठी उपयुक्त माहिती जन्म, मृत्यू आणि लावलेला शोध*





गणितोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा*

*गणितोत्सव निमित्त प्रश्नमंजुषा*
=======================
*📚🛑जि प कें प्रा शा एकुरगा🛑📚*
💐💐💐💐💐💐💐💐
*(१)लहानात लहान दोन अंकी संख्या कोणती ?*
*(२) मोठ्यात मोठी एक अंकी संख्या कोणती ?*
*(३) लहानात लहान एक अंकी नैसर्गिक संख्या कोणती ?*
*(४) मोठ्यात मोठी दोन अंकी संख्या कोणती ?*
*(५) लहानात लहान तीन अंकी संख्या कोणती ?*
*(६) मोठ्यात मोठी तीन अंकी संख्या कोणती ?*
*(७) मोठ्यात मोठी नैसर्गिक संख्या कोणती ?*
*(८) एक शतक म्हणजे किती एकक  ?*
*(९) १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक दशकस्थानी किती वेळा येतो ?*
*(१०)  १ ते १०० पर्यंत ० (शून्य ) हा अंक किती वेळा येतो ?*
*(११) १  ते  १०० पर्यंत १ हा अंक किती वेळा येतो ?*
*(१२)  १ ते १०० पर्यंत  २ ते ९ अंक  हे प्रत्येकी किती वेळा येतात ?*
*(१३) १ ते १०० पर्यंत १ हा अंक शतकस्थानी किती वेळा येतो ?*
*(१४) १ ते १०० या संख्यांमध्ये एक अंकी संख्या एकूण किती आहेत ?*
*(१५) १ ते १०० संख्यांमध्ये दोन अंकी संख्या एकूण किती आहेत ?*
*(१६) १ ते १०० या संख्यांमध्ये तीन अंकी संख्या एकूण किती आहेत ?*
*(१७) १ दशक म्हणजे किती एकक ?*
*(१८)  १ शतक म्हणजे किती दशक ?*
*(१९)   १ ते १० पर्यंतच्या एकूण संख्यांची बेरीज किती ?*
*(२०)  १ ते १०० पर्यंत ९ हा अंक किती वेळा येतो ?*
*(२१) १ते १० संख्यांची बेरीज किती?*
*(२२) ३१ते ४० संख्यांची बेरीज किती ?*
*(२३)१ ते १०० संख्यांची बेरीज किती ?*
*(२४)५७ ते ६६ संख्यांची बेरीज किती ?*
*(२५) १ ते १०० मध्ये एकूण सम संख्या किती आहेत ?*
*(२६)१ ते १०० मध्ये विषम संख्या किती आहेत ?*
*(२७)१ ते २० मधील सम संख्यांची बेरीज किती ?*
*(२८) १ ते ४० मधील विषम संख्यांची बेरीज किती ?*
*(२९)१ ते १०० मध्ये वर्ग संख्या किती आहेत? व कोणत्या?*
*(३०) १ ते १०० मध्ये त्रिकोणी संख्या किती आहेत?व कोणत्या?*
*(३१) १ ते १०० मध्ये मूळ संख्या किती आहेत ? व कोणत्या ?*
*(३२)१ ते १०० मध्ये संयुक्त संख्या किती आहेत ?*
*(३३) कोणती संख्या मूळसंख्या व संयुक्त संख्या नाही ?*
*(३४) कोणती मूळसंख्या सम संख्या आहे?*
*(३५) एक अंकी एकूण संख्य किती आहेत?*
*(३६) दोन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*
*(३७) तीन अंकी एकूण संख्या किती आहेत ?*
*(३८) चार अंकी एकूण संख्या किती आहेत?*
*(३९) पाच अंकी एकूण संख्या किती आहेत ?*
*(४०) एक अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*
*(४१) दोन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*
*(४२)तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*
*(४३) चार अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*
*(४४) पाच अंकी सर्वात लहान संख्या कोणती आहे ?*
*(४५) एक अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*
*(४६) दोन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*
*(४७) तीन अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*
*(४८) चार अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*
*(४९) पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती आहे ?*
*(५०) १ ते १०० मध्ये जोडमुळ संख्या किती आहेत ?*
*(५१) सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे ?*
*(५२)सर्वात मोठी नैसर्गिक संख्या कोणती आहे ?*
*(५३)सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे ?*
*(५४) सर्वात मोठी पूर्ण संख्या कोणती आहे ?*
*(५५) सर्वात लहान पूर्णांक संख्या कोणती आहे ?*
*(५६) सर्वात मोठी पूर्णांक संख्या कोणती आहे ?*
*(५७)१५४ ते १६३ मधील संख्यांची बेरीज किती ?*
*(५८)७ ची क्रमवार संख्या कोणती आहे ?*
*(५९) ७९ च्या मागील संख्या कोणती आहे ?*
*(६०)३९९ च्या पुढील संख्या कोणती आहे ?*
*(६१)मूळ रोमन संख्या किती ? व कोणत्या आहेत?*
*(६२)१ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात काशी लिहिली जाते ?*
*(६३) ४० ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*
*(६४) ९० ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*
*(६५)७८९ ही संख्या रोमनसंख्या चिन्हात कशी लिहितात ?*
*(६६)CMLXXXIX ही रोमनसंख्या कोणती संख्या दर्शविते ?*
*(६७)७५ चा वर्ग किती ?*
*(६८) २९ चा वर्ग किती ?*
*(६९) ५६ चा वर्ग किती ?*
*(७०)१ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर ?*
*(७१)१ फूट म्हणजे किती इंच ?*
*(७२) १ यार्ड म्हणजे किती फूट ?*
*(७३)  १ गुंठा म्हणजे किती चौरसफुट?*
*(७४)१ एक्कर म्हणजे किती आर ?*
*(७५)१ मिनिटांचे सेकंद किती ?*
*(७६)१तासाचे सेकंद किती ?*
*(७७) १ दिवसाचे तास किती ?*
*(७८)१ आठवड्याचे दिवस किती ?*
*(७९)१ वर्षाचे दिवस किती ?*
*(८०)लीप वर्षाचे दिवस किती ?*
*(८१) २९ दिवस कोणत्या महिन्यात येतात ?*
*(८२)१ वर्षाचे आठवडे किती ?*
*(८३)१ तप म्हणजे किती वर्षे ?*
*(८४)१ किलो म्हणजे किती ग्रॅम ?*
*(८५)१ क्विंटल म्हणजे किती किलोग्रॅम ?*
*(८६)१टन म्हणजे किती क्विंटल ?*
*(८७)१ ग्रॅम म्हणजे किती डेसिग्रॅम ?*
*(८८)१ लीटर म्हणजे किती सेंटीलीटर ?*
*(८९) पाऊण किलोग्रॅम म्हणजे ग्रॅम ?*
*(९०) सव्वा किलो म्हणजे किती ग्रॅम ?*
*(९१)साडे सात किलोमीटर म्हणजे किती मीटर ?*
*(९२)१ डझन म्हणजे किती वस्तू(नग)?*
*(९३) १ रिम म्हणजे किती कागद ?*
*(९४)१ रिम म्हणजे किती दस्ते ?*
*(९५)२५४०७ या संख्येत ५ ची स्थानिक किंमत किती ?*
*(९६) २५४०७ या संख्येत ५ ची दर्शनी किंमत किती ?*
*(९७)५८६ X ९९९ = किती ?*
*(९८)७ च्या पाढयातील  संख्यांची बेरीज किती ?*
*(९९)पंचाकोनाच्या  सर्व कोनांची बेरीज किती ?*
*(१००)३,२,७,४ हे अंक एकदाच वापरून तयार होणाऱ्या ४अंकी संख्यांची बेरीज किती ?*

सन २०२२- २३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत

सन २०२२- २३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत





शैक्षणिक सत्रात मुलांना प्रवेश देत असताना मुलांचे किमान वय किती असावे. किती वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलांना इयत्ता पहिली, ज्युनियर केजी सिनियर केजी प्ले ग्रुप / नर्सरी यामध्ये प्रवेश द्यावा याबात एक वाक्यता येण्यासाठी शासनामार्फत नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार बालकाचे किमान वय किती असावे .याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेले हे पत्रक आहे ते प्रथम आपण पाहू या. 

विषय:- सन २०२२- २३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.
संदर्भ १. शासन निर्णय क्रमांक: आरटीई २०१८/प्र.क्र.१८० / एस. डी.- १. दिनांक १८/०९/२०२०.
२. शासन निर्णय क्रमकः- आरटीई-२०१९/प्र.क्र.९९९ / एस.डी.- १ दिनांक २५/०७/२०१९
उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.
माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक
  
वयोमर्यादा
31 डिसे 22 रोजीचे किमान वय

1 - प्ले ग्रुप / नर्सरी
१ ऑक्टोबर २०१८- ३१ डिसेंबर २०१९
 
2-ज्युनियर केजी
१ ऑक्टोबर २०१७ - ३१ डिसेंबर २०१८

3-सिनियर केजी
१ ऑक्टोबर २०१६ - ३१ डिसेंबर २०१७
 
4-इयत्ता १ ली
१ ऑक्टोबर २०१५ ३१ डिसेंबर २०१६
 
पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.
आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर आपणांस यथावकाश कळविण्यात येईल. त्यामुळे वयोमर्यादेबाबत सर्व शाळांना आपल्यास्तरावरून कळविण्यात यावे जेणेकरुन या कार्यालयाकडे वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत.