सन २०२२- २३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत
शैक्षणिक सत्रात मुलांना प्रवेश देत असताना मुलांचे किमान वय किती असावे. किती वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुलांना इयत्ता पहिली, ज्युनियर केजी सिनियर केजी प्ले ग्रुप / नर्सरी यामध्ये प्रवेश द्यावा याबात एक वाक्यता येण्यासाठी शासनामार्फत नुकताच शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. या शासन निर्णयानुसार बालकाचे किमान वय किती असावे .याबाबतच्या स्पष्ट सूचना देण्यात आलेल्या आहेत. महाराष्ट्र शासन प्राथमिक शिक्षण संचालनालय यांच्यामार्फत निर्गमित करण्यात आलेले हे पत्रक आहे ते प्रथम आपण पाहू या.
विषय:- सन २०२२- २३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत.
संदर्भ १. शासन निर्णय क्रमांक: आरटीई २०१८/प्र.क्र.१८० / एस. डी.- १. दिनांक १८/०९/२०२०.
२. शासन निर्णय क्रमकः- आरटीई-२०१९/प्र.क्र.९९९ / एस.डी.- १ दिनांक २५/०७/२०१९
उपरोक्त संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन २०२२-२३ या शैक्षणिक सत्रात शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत खालील प्रमाणे सुचना देण्यात येत आहे. शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्याबाबत दिनांक १८/०९/२०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. त्यामुळे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यातील जन्म असलेल्या बालकांच्या प्रवेशाबाबत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये अडचणी निर्माण होत आहे. म्हणून मानिव दिनांक बदलामुळे य विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून शैक्षणिक वर्ष सन २०२२-२३ साठी किमान वयोमर्यादा माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक आहे.
माहे ३१ डिसेंबर २०२२ अखेर पुढील प्रमाणे वय असणे आवश्यक
वयोमर्यादा
31 डिसे 22 रोजीचे किमान वय
1 - प्ले ग्रुप / नर्सरी
१ ऑक्टोबर २०१८- ३१ डिसेंबर २०१९
2-ज्युनियर केजी
१ ऑक्टोबर २०१७ - ३१ डिसेंबर २०१८
3-सिनियर केजी
१ ऑक्टोबर २०१६ - ३१ डिसेंबर २०१७
4-इयत्ता १ ली
१ ऑक्टोबर २०१५ ३१ डिसेंबर २०१६
पूर्व प्राथमिक शिक्षणासाठी प्रवेशाच्या वयाबाबत लवचिकता आहे, किती वर्षासाठी पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यावे, कोणत्या वयामध्ये प्रवेश घ्यावा व कोणत्या वर्गात प्रवेश घ्यावा हे सर्वस्वी पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे. शाळांनी पूर्व प्राथमिक साठी कमी-जास्त वयाचे कारण देवून प्रवेश नाकारणे अपेक्षित नाही. सदरील शासन निर्णय दिनांक १८/०९/२०२० मुख्यतः इयत्ता १ ली मध्ये प्रवेशासाठी लागू आहे. शासनाने उक्त शासन निर्णयानुसार किमान वयोमर्यादा निश्चित करून दिलेली आहे. कमाल वयोमर्यादा निश्चित केलेली नाही. कमाल वयोमर्यादेमध्ये लवचिकता ठेवण्यास हरकत नाही.
आरटीई २५ टक्के प्रवेशाबाबत ऑनलाईन पोर्टलवर वयोमर्यादा निश्चित केल्यानंतर आपणांस यथावकाश कळविण्यात येईल. त्यामुळे वयोमर्यादेबाबत सर्व शाळांना आपल्यास्तरावरून कळविण्यात यावे जेणेकरुन या कार्यालयाकडे वयोमर्यादेबाबतच्या कोणत्याही तक्रारी येणार नाहीत.
No comments:
Post a Comment