Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, January 3, 2022

तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*



*तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी*

 *तिवटग्याळ .........  दिनांक 3/1/2022  रोजी तिवटग्याळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कोविड - 19 व सोशल डिस्टंश नियमांचे पालन करुन मोठ्या उत्साहाने क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. प्रथम शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे , शाळेतील शिक्षक शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार  यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून जयंती साजरी केली. तद्नंतर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे व शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर   यांनी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सविस्तर माहिती दिली. तदनंतर शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना थोर व्यक्ती यांच्या पोशाख परीधान करून सर्व विद्यार्थाच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारित सर्व विद्यार्थ्यांनी माहिती सांगितली . इयत्ता निहाय विद्यार्थाना पोशाखात सर्व विद्यार्थी दिसून आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेतील शिक्षीका श्रीमती अंजली लोहारकर व आभारप्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे   यांनी मानले. या वेळी शाळेतील सर्व विद्यार्थी, शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वर बडगे, शाळेतील शिक्षिका श्रीमती अंजली लोहारकर, अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती पूजा बिरादार व मदतनीस श्रीमती भागाबाई बिरादार व अन्य जण उपस्थित होते*


































































No comments:

Post a Comment