Pages

सुस्वागतम .... या ब्लॉगला भेट देणाऱ्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे .

Monday, June 6, 2022

आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा ९ जून रोजी शिर्डी येथे





*आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभा ९ जून रोजी शिर्डी येथे*

 प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची राज्य कार्यकारिणी सभेचे आयोजन  गुरुवारी ९ जून रोजी शिर्डी येथील  जिल्हा परिषदेच्या पिंपळवाडी रोडवरील मराठी  शाळेत आयोजन करण्यात आले आहे, सभेच्या अध्यक्षस्थानी राज्य अध्यक्ष रामदास सांगळे यांची तर मार्गदर्शक म्हणून शिक्षक नेते  अंकुश काळे , महिला आघाडी राज्य प्रमुख मुक्ता पवार, सुषमा राऊत मारे,माध्यमिक विभागाचे राज्य प्रमुख गजानन वाळके पाटील ,  नितीन कोळी, राज्य नेते माधव लातुरे, के सी गाडेकर ,भिवाजी कांबळे, उत्तम पवार, यांची प्रमुख उपस्थिती  राहणार आहे, सभेला राज्यातील सर्व जिल्हा शाखेचे जिल्हाध्यक्ष ,सचिव, महिला आघाडी, माध्यमिक विभाग पदाधिकारी सह प्रमुख सर्व पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहेत,या सभेत  राज्यातील शिक्षकांचे विविध प्रकारचे प्रलंबित प्रश्नांवर ठराव पास करून पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार आहेत यामध्ये प्रामुख्याने शिक्षकांच्या सार्वत्रिक बदल्या, आंतर जिल्हा बदल्या, जुनी पेन्शन,शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षकांची रिक्त पदे पदोन्नतीने भरणे, प्रशाला शिक्षक यांची बदली प्रक्रिया राबविणे व रिक्त पदे भरणे, सन २०१८-१९ मध्ये विस्थापित शिक्षक यांना न्याय मिळणे, नवीन शिक्षक भरती प्रक्रिया राबविणे राज्यातील शिक्षकांचे रिक्त पदे भरणे ,  वर्ग दोन चे सर्व रिक्त पदे भरणे , निवडश्रेणी प्रशिक्षण ऑफ लाईन घेणे,  असे विविध प्रश्नांवर सखोल  उहापोह होऊन ठराव मंजूर करून शासनदरबारी पाठपुरावा करण्यात  येणार आहेत , किंवा राज्यव्यापी आंदोलनाची दिशा ठरवून सरकाचे लक्ष वेधले जाईल असा निर्णय सभेत घेण्यात येणार आहे. याचबरोबर सभेत लातूरजिल्ह्यातील शिक्षकांचे ...... प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक व्हावी याबाबत सभेत आंदोलनाची दिशा ठरवून  पाठपुरावा करण्यात येईल तसेच राज्यातील विविध जिल्हा शाखांचे कामकाज आढावा व राज्य शाखा विस्तार करण्यात येणार आहेत अशी माहिती आदर्श शिक्षक समितीचे राज्य महासचिव अंजुम पठाण यांनी दिली आहे, सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन राज्य शाखेच्या वतीने अंजुम पठाण, नितीन कोळी, गिरीश नाईकडे, रवींद्र अंभोरे, लक्ष्मण काटेकर,  अनिल मूलकवार, रामकीसन लटपटे, जयाजी भोसले, राजेंद्र नवले, उत्तम पवार , भिवाजी कांबळे,  आर आर जोशी,  लातूर जिल्हा अध्यक्ष श्री चंदू घोडके, सरचिटणीस वाल्मिक पंदे, कार्याध्यक्ष बापूराव चामले, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर बडगे, गंगाधर बिरादार व सुर्यकांत बोईनवाड आदींच्या वतीने करण्यात आले आहे

No comments:

Post a Comment